मनसे आमदार राजू पाटील यांच्या कारला विचित्र अपघात, 75 लाखांची कार चक्काचूर

मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांच्या कारला डोंबिवलीत अपघात झाला, सुदैवाने कोणीही जखमी झालं नसून राजू पाटील हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपुरात आहेत.

मनसे आमदार राजू पाटील यांच्या कारला विचित्र अपघात, 75 लाखांची कार चक्काचूर

कल्याण : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार राजू पाटील यांच्या कारला डोंबिवलीमध्ये विचित्र अपघात (MNS Raju Patil Car Accident) झाला. पाटील यांची कार उड्डाणपुलावरून थेट कोकण रेल्वे रुळावर कोसळली. सुदैवाने या अपघातात कोणालाही इजा झालेली नाही. आमदार राजू पाटील सध्या हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपुरात आहेत.

काल (बुधवारी) रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. सुमारे 75 लाख रुपये किमतीच्या अपघातग्रस्त कारचा चक्काचूर झाला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

डोंबिवलीतील एक्सपेरीया मॉल ते काटई टोल नाक्यादरम्यान हा अपघात झाला. कारचा ड्रायव्हर पेट्रोल भरुन येत असताना पलावा सिटी जवळील रेल्वे उड्डाणपुलावरुन त्याचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि कार भरधाव वेगाने खाली कोकण रेल्वे रुळावर कोसळली.

सुदैवाने ड्रायव्हरने गाडीतून वेळीच उडी मारल्याने कोणालाही इजा झाली नाही, मात्र गाडीचा चक्काचूर झाला. अपघातग्रस्त कार ही ‘मुश्तान्ग’ कंपनीची आहे. या गाडीची किंमत 75 लाख रुपये इतकी असल्याची माहिती (MNS Raju Patil Car Accident) आहे.

कोण आहेत राजू पाटील?

प्रमोद उर्फ राजू रतन पाटील यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कल्याण ग्रामीण मतदारसंघातून विजय मिळवला आहे. त्यांना 86 हजार 233 मतं मिळाली होती. त्यांच्याविरोधात शिवसेनेचे रमेश म्हात्रे निवडणूक रिंगणात होते. म्हात्रे यांनी राजू पाटील यांना कडवी झुंज दिली. रमेश म्हात्रे यांना 80 हजार 665 मतं मिळाली होती.

मनसेच्या एकमेव आमदाराला खुद्द राज ठाकरेंकडून खुर्चीची ऑफर

मनसेने या विधानसभा निवडणुकीत एकूण 110 उमेदवारांना निवडणूक रिंगणात उतरवलं होतं. त्यापैकी मनसेला केवळ एकाच जागेवर विजय मिळवता आला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राजू पाटील यांना ‘कृष्णकुंज’वर बोलावून त्यांची भेट घेतली होती. राज ठाकरे यांनी स्वतः राजू पाटील यांचं स्वागत करत त्यांचं अभिनंदन केलं होतं. विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी राजू पाटील यांना स्वतःची खुर्ची देऊ केली होती. मात्र, राजू पाटील यांनी आदराने त्या खुर्चीवर बसण्यास नकार दिला होता.

राज ठाकरेंनी राज्यभरात मोजक्या ठिकाणी सभा घेत मनसेला राज्यातील सक्षम विरोधीपक्ष बनण्यासाठी जनमत मागितलं होतं. मात्र, या निकालात त्यांना केवळ कल्याण ग्रामीण मतदारसंघातच यश आलं. आता राजू पाटील पक्षाची भूमिका कशी मांडतात, याकडे सर्वांचं लक्ष आहे. (MNS Raju Patil Car Accident)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *