‘एका नाकपुडीतील पाणी दुसऱ्या नाकपुडीतून बाहेर’, पुण्यातील डॉक्टरांचा जलनेती प्रयोग नेमका काय?

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जलनेतीचा उपाय परिणामकारक असल्याचा दावा पुण्यातील डॉक्टर धनंजय केळकर यांनी केलाय (Jalneti treatment on corona by Dr Kelkar).

'एका नाकपुडीतील पाणी दुसऱ्या नाकपुडीतून बाहेर', पुण्यातील डॉक्टरांचा जलनेती प्रयोग नेमका काय?
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Jul 06, 2020 | 2:09 PM

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्रच वाढतोय. कोरोनावरील लस अजूनही उपलब्ध नाही. कोरोनावरील लस कधी येणार याबाबतही सध्या केवळ अंदाजच लावले जात आहेत. अशा परिस्थितीत कोरोना प्रादुर्भाव रोखणं मोठं आव्हान आहे. मात्र, हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जलनेतीचा उपाय परिणामकारक असल्याचा दावा पुण्यातील डॉक्टर धनंजय केळकर यांनी केलाय (Jalneti treatment on corona by Dr Kelkar). जलनेतीचा उपचार घेतल्यास नाकातून होणारा कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात रोखता येईल, असा दावा डॉक्टर केळकर यांनी केला आहे. ते दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात हा उपचार देतात.

जलनेती म्हणजे कोमट पाण्याने नाक आतील बाजूने धुण्याची पद्धत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा सर्वाधिक धोका नाकातून श्वसनाद्वारे होण्याचा मानला जातो. त्यामुळे याच ठिकाणी कोरोना विषाणूंना रोखल्यास कोरोना व्हायरसची बाधा होते. मात्र, जिथून सर्वाधिक संसर्ग होतो तो नाकाचा आतील भाग धुतल्यास या व्हायरसचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात आणता येईल.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज! 

या उपचाराने कोरोना विषाणू नाहीसा होणार नाही, मात्र त्याचे प्रमाण नक्कीच कमी होते, असा दावा डॉक्टर केळकर यांनी केलाय. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल. लक्षण विरहित कोरोना होईल, असंही डॉक्टर केळकर यांनी म्हटलं. डॉक्टर केळकर यांनी आपल्या या जलनेतीच्या उपचाराचा उपयोग रुग्णालयातील काही डॉक्टर नर्स आणि सफाई कर्मचारी यांच्यावरही केला. त्यांनी अशाप्रकारे 600 जणांवर उपचार केला. यापैकी कुणालाही कोरोनाचा प्रादुर्भाव झाला नाही.

गेल्या 3 महिन्यांपासून सकाळ आणि संध्याकाळ दोन वेळी हे कर्मचारी जलनेती करतात. दुसरीकडे जलनेती न केलेल्या दोन ते अडीच हजार कर्मचाऱ्यांपैकी 22 जणांना कोरोना झाल्याचा दावा डॉक्टर केळकर यांनी केलाय. जलनेती करण्यासाठी फक्त 30 ते 40 सेकंदाचा वेळ लागत असल्याची माहिती डॉक्टर केळकर यांनी दिली.

हेही वाचा : 

पुण्यात महापौरांपाठोपाठ उपमहापौर आणि सहा नगरसेवकांना कोरोनाची लागण, दोन खासदार, चार आमदार क्वारंटाईन

घरात दुसरा मोबाईल पडून आहे? विद्यार्थ्यांसाठी दान करा, पुणे झेडपीचा भन्नाट उपक्रम

मास्क न घातल्यास 10 हजार दंड, केरळचा निर्णय, 2021 पर्यंत निर्बंध

Jalneti treatment on corona by Dr Kelkar

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें