पुण्यात महापौरांपाठोपाठ सहा नगरसेवकांना कोरोनाची लागण, दोन खासदार, चार आमदार क्वारंटाईन

पुण्यात महापौरांपाठोपाठ आता महापालिकेतील विरोधी पक्षनेत्यासह सहा नगरसेवकांना कोरोनाची लागण झाली (Corona infected Pune Deputy Mayor) आहे.

पुण्यात महापौरांपाठोपाठ सहा नगरसेवकांना कोरोनाची लागण, दोन खासदार, चार आमदार क्वारंटाईन

पुणे : पुण्यात महापौरांपाठोपाठ आता महापालिकेतील विरोधी पक्षनेत्यासह सहा नगरसेवकांना कोरोनाची लागण झाली (Corona infected Pune Deputy Mayor) आहे. याशिवाय पुण्यातील दोन खासदार, चार आमदार हे होम क्वारंटाईन झाले आहेत. त्यामुळे शहर आणि परिसरातील राजकीय क्षेत्र धास्तावले आहे. तसेच पालिकेच्या तब्बल 200 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली (Corona infected Pune Deputy Mayor) आहे.

पुणे महापालिकेत मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग झाल्याने पालिका कर्मचारी आणि नगरसेवकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.

नुकतोच पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता सहा नगरसेवक यांना कोरोना झाल्याने अनेक लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक कार्यक्रम कमी केले आहेत. त्यासोबत काहींनी तर घराबाहेर पडणेच बंद केले आहे.

“मला ताप आला होता. त्यामुळे मी कोरोना चाचणी केली. त्यानंतर मला कोरोनाची लागण झाल्याचे सिद्ध झाले. आता माझी तब्येत ठिक आहे आणि माझ्यावर उपचार सुरु आहेत”, असं पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीट करत सांगितले होते.

पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असल्याने महापौर मुरळीधर मोहोळ हे अनेक ठिकाणी भेट देत परिस्थितीचा आढावा घेत होते.

दरम्यान, यापूर्वीही राज्यातील राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. सर्वप्रथम राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली होती. ते कोरोनावर मात करुन घरी परतेल आहेत. त्यानंतर काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनाही कोरोनाची लागण झाली होती. चव्हाणही आता उपचारानंतर सुखरुप घरी परतले आहेत.

राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री यांनाही कोरोनाची लागण झाली होती. नुकतेच ते कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

संबंधित बातम्या :

पुण्याच्या महापौरांपाठोपाठ कुटुंबीयही कोरोनाच्या विळख्यात, मोहोळ कुटुंबातील आठ जणांना लागण

पुण्यात कोरोना बळींची संख्या वाढतीच, एकाच दिवसात तब्बल 31 रुग्णांचा मृत्यू

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *