काश्मीरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक; चार दहशतवाद्यांचा खात्मा, एक पोलीस जखमी

टोलनाक्यावर गुरुवारी पहाटे पाच वाजता दहशतवादी आणि भारतीय जवान आमनेसामने आले. | Jammu and Kashmir

काश्मीरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक; चार दहशतवाद्यांचा खात्मा, एक पोलीस जखमी

श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. आतापर्यंत सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. तर या चकमकीत एक पोलीस कॉन्स्टेबल जखमी झाला आहे. जम्मू-श्रीनगर महामार्गावरील बान   टोलनाक्यावर गुरुवारी पहाटे पाच वाजता दहशतवादी आणि भारतीय जवान आमनेसामने आले. यानंतर दोन्ही बाजूंनी तुफान गोळीबार सुरु झाला. या पार्श्वभूमीवर नागरोटा परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून जम्मू-श्रीनगर महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. (Jammu Kashmir security force udhampur encounter terrorist)

दरम्यान गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जवानांनी नगरोटा भागात जागोजागी बंदोबस्त ठेवला होता. वाहनांची तपासणी केली जात असतानाच ट्रकमधून आलेले दहशतवादी जंगलाकडे पळू लागले. यावेळी जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली.


जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर झालेली ही दुसरी मोठी चकमक आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात महामार्गावर झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराने तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते.


पुलवामामध्ये 12 नागरिक जखमी
पुलवामा येथे बुधवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या (CRPF) बंकरवर ग्रेनेड फेकून हल्ला केला होता. यामध्ये 12 नागरिक जखमी झाले होते. दहशतवाद्यांनी फेकलेला ग्रेनेड बंकरऐवजी रस्त्यावर जाऊन पडला. त्यामुळे नागरिक जखमी झाले.

संबंधित बातम्या:

लडाखमध्ये मायनस 40 डिग्रीतही चीनला आव्हान देणार, थंडीसाठी भारतीय सैन्याची चोख व्यवस्था

Jammu and Kashmir | पुलवाम्यात दहशतवाद्यांचा जवानांवर ग्रेनेड हल्ला, 12 नागरिक जखमी

दिल्लीत मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; ‘जैश’च्या दोन दहशतवाद्यांना अटक

(Jammu Kashmir security force udhampur encounter terrorist)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI