इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी अध्यक्ष जनरल (निवृत्त) परवेज मुशर्रफ (former Pakistan president Gen (Retd) Pervez Musharraf) यांना फाशीची शिक्षा सुनावणारे पेशावर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश वकार सेठ (Peshawar High Court Chief Justice Waqar Seth) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ते 58 वर्षांचे होते. इस्लामाबाद येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. पाकिस्तानच्या सरकारी अधिकाऱ्यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. (Judge who sentenced Pervez Musharraf to death has died because of Corona)