VIDEO : बडी घटिया बाते लिख रहे हो…कंगना पत्रकरावर भडकली

मणिकर्णिका चित्रपटाविषयी नकारात्मक प्रतिक्रिया देणाऱ्या पत्रकाराला ‘तुम तो हमारे दुश्मन बन गए यार….बडी घटिया बाते लिख रहे हो’, असं म्हणत कंगनाने एका पत्रकाराला धारेवर धरलं

VIDEO : बडी घटिया बाते लिख रहे हो...कंगना पत्रकरावर भडकली

मुंबई : आपल्या बेधडक वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असलेली बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणावत पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. रविवारी एका कार्यक्रमात कंगनाचा आणि एका पत्रकराचा चांगलाच वाद झाला. या दोघांच्या वादाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

येत्या 26 जुलैला कंगनाचा ‘जजमेंटल है क्या’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तिने अभिनेता राजकुमार राव याच्यासोबत स्क्रीन शेअर केली आहे. या चित्रपटातील एक गाणे काल (7 जुलै) लाँच करण्यात आले. यावेळी कंगनासोबत राजकुमार राव, चित्रपटाची निर्माती एकता कपूर यांसह दिग्दर्शकही उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये तिने अनेक पत्रकारांशी संवाद साधला. दरम्यान या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने प्रश्न विचारण्यापूर्वी आपले नाव सांगितले. नाव सांगितल्यानंतर कंगना थोडी सावध झाली. त्या पत्रकाराला त्याच्या प्रश्नाचे उत्तर देताना कंगनाने त्याला पूर्वीच्या काही गोष्टींची आठवण करुन दिली. विशेष म्हणजे तिने त्या पत्रकाराला सर्वांसमोर चांगलंच झापले.

कंगनाच्या ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाबाबात संबंधित पत्रकारने बरेच नकारात्मक लिहीले होते. तसेच मणिकर्णिका चित्रपटाविषयी नकारात्मक प्रतिक्रिया देणाऱ्या पत्रकाराला ‘तुम तो हमारे दुश्मन बन गए यार….बडी घटिया बाते लिख रहे हो’, असं म्हणत त्याला धारेवरही धरलं. तसेच या पत्रकाराने “तिच्याविरुद्ध मोहिम सुरु केली असल्याचा आरोप तिने केला.  या पत्रकाराने तब्बल 3 तास व्हॅनिटी व्हॅनमध्ये मणिकर्णिका चित्रपटासाठी मुलाखत घेतली. एवढंच नाही, तर त्याने मला पर्सनल मॅसेजही केले”, असा आरोप केला.

हा आरोप खोडून काढत ‘मी कधीच तुला पर्सनल मॅसेज केलेले नाही. जर मी तुला मॅसेज केले असतील तर मला त्याचा स्क्रीन शॉट दाखव’ असे सांगितले. याला उत्तर देताना तिने तावातावाने ‘हो मी नक्कीच स्क्रीन शॉट शेअर करेन’ असे सांगितले. तसेच या पत्रकाराचे ‘विचार घटिया आहेत’ असा आरोपही त्या पत्रकारावर केला.

कंगनाने फटकारल्यानंतर त्या पत्रकाराने तिला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर तिने मला तुझ्या एकाही प्रश्नाचे उत्तर द्याचे नाही असे रागात सांगितले. दरम्यान, यानंतर संबंधित पत्रकाराने कंगनाचं वागणं चुकीचं असल्याचे म्हटलं. विशेष म्हणजे कंगनाचं हे वागणं पाहून येथे उपस्थित असलेल्या साऱ्याच पत्रकारांना धक्का बसला.

मात्र त्या क्षणी कार्यक्रमाच्या आयोजक आणि सूत्रसंचालकाने हा प्रसंग सावरण्याचा प्रयत्न केला. तसेच राजकुमारनेही कंगनाच्या वागण्याबद्दल माफी मागत “सर्वांना शांत राहण्यास सांगितले. आता आपण ज्यासाठी जमलो आहोत, त्यावर लक्ष केंद्रीत करु. याप्रकरणी नंतर आरामात बोलू”, असे राजकुमारने सांगितले.

मात्र कंगनाची पत्रकाराशी अशा प्रकारच्या वागणुकीमूळे ती पुन्हा एकदा चांगलीच चर्चेत आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. येत्या 26 जुलैला कंगनाचा जजमेंटल है क्या हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI