दहशत माजविण्यासाठी स्थानिक गावगुंडाकडून घरातील सामान, गाड्यांची तोडफोड, कल्याण पूर्वेतील प्रकार

स्थानिक गाव गुंडाकडून घरात घुसून तोडफोड, लूटपाट आणि परिसरातील उभ्या असलेल्या सहा गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे.

दहशत माजविण्यासाठी स्थानिक गावगुंडाकडून घरातील सामान, गाड्यांची तोडफोड, कल्याण पूर्वेतील प्रकार

कल्याण : कल्याण पूर्वेतील खडेगोळवली परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला (Kalyan East Crime) आहे. स्थानिक गाव गुंडाकडून घरात घुसून तोडफोड, लूटपाट आणि परिसरातील उभ्या असलेल्या सहा गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी तपास सुरु केला आहे (Kalyan East Crime).

कल्याणमध्ये काल बंदूकीचा धाक दाखवित ज्वेलर्स दुकानदाराला लुटल्याची घटना घडली. त्याला चार तास उलटत नाही तोच ही दुसरी घटना घडल्याने कल्याणमध्ये खळबळ उडाली आहे. त्यामुळे नागरीकांमध्ये दहशत पसरली आहे. कल्याण पूर्वेतील खडेगोळवली परिसरात राहणारे रवी म्हात्रे आणि त्यांची पत्नी लता म्हात्रे हे पार्किंग चालवितात. त्याठिकाणी त्यांची वडापावची गाडीही आहे. काल रात्री काही स्थानिक तरुण या परिसरात एका आईसक्रीमवाल्याकडून जबरदस्तीने पैसे मागत होते, असा आरोप आईसक्रीम चालक कैलास तेली यांनी केला आहे. तेली यांनी मदतीसाठी बाजूला उभ्या असलेल्या लता म्हात्रे यांना आवाज दिला. लता म्हात्रे यांनी पैसै उकळणाऱ्या तरुणांना विरोध केला.

या प्रकरणी कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलीस ठाण्यात तक्रार दिली म्हणून रात्रीच्या वेळी दहा ते पंधरा गावगुंडांनी म्हात्रे यांच्या घरात घुसून हल्ला केला. घरातील सामानाची तोडफोड केली. घरात काही दागिने आणि रोकड होती. तीही या दरम्यान लंपास केली. इतकेच नाही तर परिसरात उभ्या असलेल्या टेम्पो, मारुती व्हॅन, जीप, रिक्षा आदी सहा गाड्यांची तोडफोडही केली. या घटनेमुळे पीडित कुटुंब आणि परिसरातील नागरीक दहशतीखाली असून पोलिसांनी या प्रकरणात ठोस कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे (Kalyan East Crime).

काही तरुणांनी पिण्यासाठी पाणी मागितले. पाणी दिले गेले नाही म्हणून रागात गाड्यांची तोडफोड झाली आहे. तशी तक्रार आली आहे. चौकशी अंती दोषींविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असं कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक शाहूराजे साळवे यांनी सांगितलं.

मात्र, कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदिवली परिसरातील ज्वेलर्सला बंदूकीचा धाक दाखवून लूटण्याची घटना काल घडली. या घटनेच्या चार तासाच्या अवधीनंतर तोडफोडची दुसरी घटना कल्याणमध्ये घडली आहे. त्यामुळे कल्याण पूर्वेत चालले काय, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

Kalyan East Crime

संबंधित बातम्या :

पिंपरीत शौचालयाच्या टाकीत सापडला अज्ञात मृतदेहाचा सांगाडा, पोलीस तपास सुरू

टोळी युद्धातून नागपूरमध्ये दोघांची हत्या?; मृतदेह रस्त्यावर फेकल्याने खळबळ

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI