VIDEO : मैं अपनी झांसी नहीं दूँगी, कंगनाच्या ‘मणिकर्ण‍िका’चा दमदार ट्रेलर

Nupur Chilkulwar

Nupur Chilkulwar |

Updated on: Jul 05, 2019 | 4:49 PM

मुंबई : बॉलिवूडची क्वीन कंगना रणावतचा बहुप्रतिक्षित “मणिकर्ण‍िका : द क्वीन ऑफ झांसी” या चित्रपटाचा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. या चित्रपटात कंगना झाशीच्या राणीची भूमिका साकारत आहे. क्वीन चाहते मोठ्या आतुरतेने या चित्रपटच्या ट्रेलरची वाट बघत होते. हा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. मणिकर्ण‍िकाचा ट्रेलर खूप जबरदस्त आहे. या चित्रपटाच्या सुरुवातीलाच एक डायलॉग आहे, […]

VIDEO : मैं अपनी झांसी नहीं दूँगी, कंगनाच्या 'मणिकर्ण‍िका'चा दमदार ट्रेलर

मुंबई : बॉलिवूडची क्वीन कंगना रणावतचा बहुप्रतिक्षित “मणिकर्ण‍िका : द क्वीन ऑफ झांसी” या चित्रपटाचा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. या चित्रपटात कंगना झाशीच्या राणीची भूमिका साकारत आहे. क्वीन चाहते मोठ्या आतुरतेने या चित्रपटच्या ट्रेलरची वाट बघत होते. हा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे.

मणिकर्ण‍िकाचा ट्रेलर खूप जबरदस्त आहे. या चित्रपटाच्या सुरुवातीलाच एक डायलॉग आहे, ‘अंग्रेजी सरकार गिद्धों की तरह झांसी पर नजर गाडे बैठी है, अगर झांसी को सही समय रहते उत्तराधिकारी नही मिला तो ये झांसी कों भी हडप लेंगे’ आणि यानंतर होते मणिकर्ण‍िका म्हणजेच कंगनाची एन्ट्री. राजकन्या असली तरी मणिकर्ण‍िका ही इतर राजकन्यांपेक्षा वेगळी आहे, ती सुंदर आहे, पण सोबतच ती शस्त्रविद्देत पारंगतही आहे. मणिकर्ण‍िका ही झाशीची राणी लक्ष्मी बाई बनते, ती कशा प्रकारे इंग्रजांशी लढते, आपल्या राज्याला इंग्रजांपासून वाचवण्यासाठीचा तिचा लढा या चित्रपटात दाखवण्यात आला आहे, त्याची एक झलक आपल्याला या ट्रेलरमध्ये बघायला मिळते आहे.

या चित्रपटात कंगना मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात कंगनाचा अॅक्शन पॅक्ड अवतार प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. कंगना पहिल्यांदाच एका योद्धाची भूमिका साकारते आहे. त्यामुळे तिच्यासाठी हा चित्रपट खूप महत्त्वाचा आणि तेव्हढाच आव्हानात्मकही ठरला. या चित्रपटातील कंगनाचा लक्ष्मी बाईचा गेटअप जबरदस्त आहे. मात्र कंगनाच्या या भव्य भूमिकेसमोर तिचा आवाज कमी पडत असल्याचं ट्रेलर बघत असताना प्रकर्शाने जाणवतं.

या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सर्वत्र फक्त आणि फक्त कंगना दिसत आहे. पण या चित्रपटात आणखी काही बडे कलाकार काम करत आहेत. यामध्ये अंकिता लोखंडे, सुरेश ओबेराय, कुलभूषण खरबंदा, अतुल कुलकर्णी, वैभव तत्ववादी, डॅनी, अमित बेहल, विक्रम कोच्चर, राजीव काचरू, प्राजक्ता माळी यांसह इतर कलाकार आहेत.

सुरुवातीला या चित्रपटाचे दिग्दर्शन कृष करत होते, मात्र मणिकर्ण‍िकाच्या वादानंतर त्यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनातून काढता पाय घेतला. त्यानंतर कंगनाने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची सुत्रे आपल्या हातात घेतली.

हा चित्रपट येत्या वर्षी 25 जानेवारीला प्रदर्शीत होणार आहे.

इथे पहा “मणिकर्ण‍िका : द क्वीन ऑफ झांसी”चा ट्रेलर :

 

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI