नव्या वेब सीरिजसाठी कपिल शर्मा 20 कोटी घेणार?

द कपिल शर्मा' शोच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला प्रसिद्ध कॉमेडियन अभिनेता कपिल शर्मा आता लवकरच एका वेब सीरिजमध्ये दिसणार आहे.

नव्या वेब सीरिजसाठी कपिल शर्मा 20 कोटी घेणार?

मुंबई : ‘द कपिल शर्मा’ शोच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला प्रसिद्ध कॉमेडियन अभिनेता कपिल शर्मा आता लवकरच एका वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या वेब सीरिजसाठी त्याने एक-दोन नव्हे तर 20 कोटी रुपये घेतल्याचा दावा अभिनेता कृष्णा अभिषेकने केला आहे. ‘द कपिल शर्मा’ शोच्या एका भागात कृष्णाने हा गौप्यस्फोट केला आहे. मात्र, नंतर ही केवळ गंमत असल्याचं नंतर सांगण्यात आले.(Kapil sharma charging 20 crore for new web series)

कॉमेडियन कपिल शर्मा टीव्ही इंडस्ट्रीचे एक प्रसिद्ध नाव आहे. त्याने केवळ टेलिव्हिजनवर आपली क्षमता सिद्ध केली नाही, तर बॉलिवूड सेलिब्रिटींमध्येही तो खूप लोकप्रिय आहे. कपिल लवकरच वेब सीरिजच्या माध्यमातून डिजिटलमध्ये पदार्पण करणार आहे, याची चर्चा सर्वत्र आहे. कपिल त्याच्या डिजिटल पदार्पणासाठी 20 कोटी रुपये घेत असल्याचे अलिकडेच कृष्णा अभिषेकने सांगितलं. मात्र तो एक विनोद असल्याचे नंतर सांगण्यात आले. परंतु कपिल शर्मा डिजिटलमध्ये पदार्पणासाठी एवढी मोठी रक्कम घेणार आहे. हे ऐकल्यावर अनेकांना धक्काच बसला. कपिल शर्माच्या अनेक चाहत्यांनी याबद्दल कपिलला विचारण्याचा प्रयत्नही केला, मात्र कपिलकडून कोणतेही उत्तर मिळू शकले नाही. कपिल शर्मा त्याच्या डिजिटल पदार्पणासाठी खरोखरच २० कोटी घेणार आहे का? याचे कुतूहल मात्र त्याच्या चाहत्यांना अजूनही आहे.

संबंधित बातम्या : 

शिवसेना नगरसेवकाकडून कपिल शर्माचे आभार, चार वर्ष जुन्या वादावर पडदा

(Kapil sharma charging 20 crore for new web series)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI