Kerala Plane Crash : केरळ विमान दुर्घटना, बचाव कार्यातील 22 जणांना कोरोनाची लागण

या 22 जणांमध्ये स्थानिक पोलीस अधिकारी आणि जिल्ह्याच्या आयुक्तांचाही समावेश आहे.

Kerala Plane Crash : केरळ विमान दुर्घटना, बचाव कार्यातील 22 जणांना कोरोनाची लागण

केरळ : केरळच्या कोझिकोडमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेदरम्यान बचाव (Kozhikode Plane Crash) कार्य करणाऱ्या 22 जणांना कोरोना झाल्याची माहिती आहे. मलप्पुरमच्या आरोग्य अधिकाऱ्याने याबाबतची माहिची दिली. या 22 जणांमध्ये स्थानिक पोलीस अधिकारी आणि जिल्ह्याच्या आयुक्तांचाही समावेश आहे. बचाव कार्य पूर्ण झाल्यानंतर सर्वांना क्वारंटाईन करण्यात आलं होतं, असंही आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं (Kozhikode Plane Crash).

यापूर्वी या दुर्घटनेत वाचवण्यात आलेल्या दोन प्रवाशांना कोरोना संसर्ग झाल्याची माहिती होती. त्यामुळे या प्रवाशांना बाहेर काढणाऱ्या सीआयएसएफच्या 30 जवानांना शनिवारी 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आलं होतं.

“दुर्घटनेत मृत्यू झालेल्या प्रवाशांपैकी एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह होता. त्याशिवाय, आणखी एक प्रवाशाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. खबरदारी म्हणून त्या सर्व जवानांना वेगळं ठेवण्यात आलं आहे, जे दुर्घटनास्थळी प्रवाशांच्या मदतीसाठी उपस्थित होते”, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.

गेल्या आठवड्यात केरळच्या वंदे भारत मिशनअंतर्गत दुबईहून येणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेस विमानाची अपघात झाला. हे विमान कोरोनामुळे दुबईत अडकलेल्या लोकांना भारतात परत आणत होतं.

दुर्घटनेवेळी विमानात 190 प्रवासी होते. लँडिंग करताना हा विमान रनवेवरुन घसरला त्यामुळे ही दुर्घटना घडली. यामध्ये पायलटसह 19 जणांचा मृत्यू झाला आणि अनेकजण गंभीररीत्या जखमी झाले होते.

Kozhikode Plane Crash

संबंधित बातम्या :

Kerala Plane Crash Photos: केरळमध्ये विमानाचा थरकाप उडवणारा अपघात, 30 फूट खाडीत कोसळून दोन तुकडे

Published On - 5:08 pm, Fri, 14 August 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI