मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या मोकाट बकालेच्या अटकेची मागणी, ३० सप्टेंबरला मोर्चा

या बाबतीत नाशिकचे आयजी बी जी शेखर यांनी जे पत्र काढलं होतं, त्यातील एकही पुर्तता न झाल्याने सकल मराठा समाजात संताप आहे.

मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या मोकाट बकालेच्या अटकेची मागणी, ३० सप्टेंबरला मोर्चा
Follow us
| Updated on: Sep 29, 2022 | 10:54 PM

अनिल केऱ्हाळे, TV9 मराठी, जळगाव : जळगाव शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात येणार आहे. स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले याला अटक करा, त्याला पोलीस दलातून निलंबित नव्हे, तर बडतर्फ करा, अशी मागणी सकल मराठा समाजाने केली होती. पण पंधरावाडा उलटूनही किरणकुमार बकालेला अटक करण्यात पोलिसांना अपयश आलं आहे.अखेर मागणीनंतर पोलिसांकडून हालचाल दिसत नसल्याने, जळगाव शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, हा मोर्चा शनिवारी ३० सप्टेंबर रोजी निघणार आहे. या मोर्चात ५० हजार मराठा बांधव सहभागी होतील असा दावा मोर्चाच्या आयोजकांनी केला आहे.या मोर्चाला जिल्हातूनच नव्हे तर राज्यभरातून सकल मराठा समाजातील बांधव उपस्थित राहणार असल्याचं आयोजकांनी म्हटलं आहे.

सकल मराठा समाजाची मागणी पूर्ण न झाल्याने, सकल मराठा समाज ५० हजार लोकांचा मोर्चा काढणार आहे, खरंतर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा मोर्चा निघू नये म्हणून प्रयत्न करायला हवा होता. यासाठी कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी किरणकुमार बकाले यांना अटक करुन हा मोर्चा टाळता आला असता.

नाशिक आयजी बीजी शेखर यांचं आश्वासनाचं काय झालं?

दुसरीकडे तपासाचा अहवाल अजून आलेला नाही, हा तपास कोण करणार आहे, हे देखील स्पष्ट झालेलं नाही. या बाबतीत नाशिकचे आयजी बी जी शेखर यांनी जे पत्र काढलं होतं, त्यातील एकही पुर्तता न झाल्याने सकल मराठा समाजात संताप आहे.

स्थानिक गुन्हे शाखेची टीम अजूनही बरखास्त केलेली नाही

किरणकुमार बकाले हा स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षकपदी होते. मात्र त्यांच्या निलंबनानंतर त्याची टीम बरखास्त करणे देखील गरजेची होतं, यानंतर नवी टीम स्थापन करावी लागते, पण असा कोणताही निर्णय घेतला गेला नाही. किरणकुमार बकालेच्या टीमचेच सदस्य किरणकुमारला अटक करायला कसे धजावतील हा प्रश्न होता. यामुळे किरणकुमार बकाले अजूनही मोकाट असल्याची चर्चा पोलीस दलात दबक्या आवाजाने आहे.

पोलीस अधिक्षकांच्या आदेशाला स्थगिती का?

किरणकुमार बकाले यांच्या जागी प्रभारी म्हणून स्थानिक गुन्हे शाखेला एका पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती, पण जळगाव पोलीस अधिक्षक प्रवीण मुंढे यांच्या या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. यावरुन डॉ.प्रवीण मुंढे यांना निर्णय स्वांतत्र्य नाही का असा देखील सवाल विचारला जात आहे.

किरणकुमार बकाले हा सतत बाहेरुन जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय, दिवसामागून दिवस जात असल्याने पुरावे संपवणे, नष्ट करणे, संबंधित पुराव्यात मतं बदलवणे यात त्याला वेळ मिळत असल्याचं म्हटलं जात आहे. पोलीस दलातील कोणता मोठा अधिकारी किरणकुमार बकालेला मदत करतोय, यावर देखील जळगाव शहरात चर्चा सुरु आहे.

Non Stop LIVE Update
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.