AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IAS ते Scientist; ‘या’ आहेत गलेलठ्ठ पगार देणाऱ्या देशातील टॉप 5 सरकारी नोकऱ्या

'सरकारी नोकरी म्हणजे आयुष्यात स्थिरता' अशी भारतीयांची मानसिकता आहे. सरकारी नोकरीत पगार चांगला मिळतोच, सोबतच अनेक सुविधादेखील मिळतात. त्यामुळे भारतीयांचा सरकारी नोकऱ्यांकडे अधिक ओढा असतो.

IAS ते Scientist; 'या' आहेत गलेलठ्ठ पगार देणाऱ्या देशातील टॉप 5 सरकारी नोकऱ्या
ministry of defence recruitment 2021
| Updated on: Dec 14, 2020 | 5:06 PM
Share

मुंबई : भारतात सरकारी नोकऱ्यांबाबत (Government Jobs) लोकांमध्ये कमालीची क्रेझ आहे. देशात जेव्हा-जेव्हा सरकारी नोकऱ्यांसाठी भर्ती निघते तेव्हा देशातील युवक-युवती त्यामध्ये लाखोंच्या संख्येने भाग घेतात. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रचंड मेहनतही घेतात. ‘सरकारी नोकरी म्हणजे आयुष्यात स्थिरता’ अशी भारतीयांची मानसिकता आहे. तसेच सरकारी नोकरीत पगार चांगला मिळतोच, सोबतच अनेक सुविधादेखील मिळतात. त्यामुळे भारतीयांचा सरकारी नोकऱ्यांकडे अधिक ओढा असतो. खासगी नोकऱ्यांमध्ये या गोष्टी मिळणं अवघड असतं. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला गलेलठ्ठ पगार देणाऱ्या सरकारी नोकऱ्यांबाबत माहिती देणार आहोत. (Know about top 5 Highest paying Government Jobs in india)

सिव्हिल सर्व्हिस अधिकारी (Civil Service Officer)

सिव्हिल सर्व्हिस अधिकाऱ्याची नोकरी म्हणजे देशातील सर्वात प्रतिष्ठित नोकरी मानली जाते. ही नोकरी मिळविण्यासाठी यूपीएससी (UPSC) परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते. या परीक्षेचे तीन टप्पे असतात तिन्हीमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर सिव्हिल सर्व्हिसेस ऑफिसरची नोकरी मिळते, ज्यात आयएएस, आयपीएस, आयएफएस इत्यादी नोकऱ्यांचा समावेश आहे. या अधिकाऱ्यांचा पगार अनुभव आणि रँकच्या आधारावर ठरवला जातो. आयएएस अधिकाऱ्याला तब्बल 2 लाख रुपयांचे वेतन मिळते.

संरक्षण अधिकारी (Defense Officer)

एनडीए, सीडीएसच्या आधारावर डिफेन्स विभागात (संरक्षण विभागात) उच्चपदस्थ अधिकारी बनणार्‍या लोकांना खूप मोठा पगार मिळतो. संरक्षण अधिकार्‍यांना पगारासह मोठ्या प्रमाणात अतिरिक्त सुविधादेखील दिल्या जातात. या विभागातील अगदी सुरुवातीचा पगार 60 हजार रुपयांहून अधिक असतो. सोबतच अनेक प्रकारचे भत्तेदेखील मिळतात.

पीएसयू मध्ये नोकरी (Public sector undertakings)

सार्वजनिक क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये पीएसयू क्षेत्रातील नोकरीदेखील बेस्ट मानली जाते. या क्षेत्रात विविध कंपन्यांचा सहभाग आहे ज्या उमेदवारांना चांगला पगार देतात. या क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना वार्षिक 10 ते 12 लाख रुपयांचे पॅकेज (मासिक 80 हजार ते 1 लाख रुपये पगार) दिले जाते. तसेच त्यांना इतर सुविधादेखील पुरवल्या जातात.

वैज्ञानिक (Scientist)

सर्वांनाच कल्पना आहे की, जे लोक इस्रो किंवा इतर संशोधन केंद्रांत वैज्ञानिक म्हणून काम करतात त्यांनादेखील सरकार मोठ्या प्रमाणात वेतन देतं. विविध प्रोजेक्ट्सवर काम करणाऱ्या वैज्ञानिकांना पगाराव्यतिरिक्त प्रोजेक्ट शुल्कदेखील दिले जाते. वैज्ञानिकांनाही अनेक सुविधा पुरवल्या जातात.

डॉक्टर, प्राध्यापक (Doctor, Professor)

आयएएस, सरंक्षण अधिकारी, वैज्ञानिकांप्रमाणे सरकारी डॉक्टर आणि प्राध्यापकांनाही मोठा पगार दिला जातो. त्यांनादेखील पगारासह शासकीय सुविधा दिल्या जातात. त्यांना मासिक 50 ते 90 हजार रुपयांपर्यंत पगार मिळतो. डॉक्टरांना याहून अधिक पगार मिळतो.

संबंधित बातम्या 

रेल्वे भरतीची तयारी करताय? मग बोर्डाच्या ह्या गाईडलाईन्स वाचलात का?

इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेसची मुख्य परीक्षा फेब्रुवारी महिन्यात, जाणून घ्या संपूर्ण माहिती

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.