लॉकडाऊनचं उल्लंघन, ठाण्याहून 30 कामगार विनापरवाना पालघरमध्ये, ठेकेदारावर गुन्हा दाखल

ठाण्याहून 30 कामगार विना परवानगी पालघरमध्ये दाखल झाले आहेत. हे कामगार पालघर जिल्हा मुख्यालयाच्या कामासाठी आले आहेत

लॉकडाऊनचं उल्लंघन, ठाण्याहून 30 कामगार विनापरवाना पालघरमध्ये, ठेकेदारावर गुन्हा दाखल

पालघर : कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये (Labors Travel) म्हणून राज्यात सध्या लॉकडाऊन (Lockdown Violation) पाळलं जात आहे. या दरम्यान, कुणालाही एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास मज्जाव आहे. तरीही अनेकांना कोरोनाचं गांभीर्य अद्याप कळालेलं नाही. ठाण्याहून 30 कामगार विना परवानगी पालघरमध्ये दाखल झाले आहेत. हे कामगार पालघर जिल्हा मुख्यालयाच्या कामासाठी आले आहेत, अशी माहिती आहे. याप्रकरणी या कामगारांना आणण्याऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल (Labors Travel) करण्यात आला आहे.

पालघर जिल्हा हा ‘रेड झोन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. मात्र, असं असतानाही कोणतीही परवानगी न घेता ठाणे जिल्ह्यातून बसमधून 30 कामगार पालघरमध्ये दाखल झाले. पालघर येथील कोळ गाव परिसरात जिल्हा मुख्यालयाच्या कामासाठी डेकोर होम इंडिया प्रायव्हेट लिमटेड ह्या एजेन्सीद्वारे 30 कामगार आणले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला (Labors Travel).

जिल्हा बंदी असताना जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला धुडकावून हे कामगार पालघरमध्ये आणले गेले. या कामगारांना आणल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आलेली नाही. त्यामुळे पालघर मुख्यालय परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. कोरोनाग्रस्त रुग्ण असलेल्या ठाण्यातून हे कामगार आल्याने पालघरमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा चुकीचा वापर करुन कामगार वाहतूक करणाऱ्या ठेकेदारावर पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, या कामगारांना आणणारी बसही ताब्यात घेण्यात आली आहे.

राज्यात कोरोनाचे 10 हजार 498 रुग्ण

महाराष्ट्रात आज (30 एप्रिल) दिवसभरात तब्बल 583 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 10 हजार 498 वर पोहोचला आहे. विशेष म्हणजे एकट्या मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा 7 हजारांच्या पार गेला आहे. तर पुण्यातील रुग्णांची संख्यादेखील तब्बल 1200 च्या पार गेली आहे.

Labors Travel

संबंधित बातम्या :

राज्यात दिवसभरात तब्बल 583 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 10,498 वर

सोलापुरात महिलेसह 2 चिमुकल्यांची कोरोनावर मात, पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत घरी रवानगी

पोलीस व्हॅनमध्ये TikTok व्हिडीओ करणं भोवलं, कल्याणमध्ये दोघांवर कारवाई

अत्यावश्यक सेवेचा गैरवापर करत मुंबई ते सांगली प्रवास, तरुणीला कोरोनाची लागण, पाच जणांवर गुन्हे

Published On - 11:49 pm, Thu, 30 April 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI