Sushant Singh Rajput | दिवाळीच्या दिवशी सुशांतची आठवण, घराबाहेर दिवे लावताना चाहते भावूक!

सुशांतच्या स्मरणार्थ शुक्रवारी त्याची एक चाहती त्याच्या मुंबईतील घराबाहेर पोहोचली. या ‘लेडी फॅन’ने सुशांतच्या स्मरणार्थ त्याच्या घराबाहेर दिवा लावला.

Sushant Singh Rajput | दिवाळीच्या दिवशी सुशांतची आठवण, घराबाहेर दिवे लावताना चाहते भावूक!
Harshada Bhirvandekar

|

Nov 14, 2020 | 1:46 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) यांच्या मृत्यूला आता 5 महिने पूर्ण झाले आहेत. सीबीआय, एनसीबी, ईडी सगळ्या संस्था त्याच्या मृत्यूचा उलगडा करण्यात गुंतले आहेत. आज दिवाळीच्या (Diwali 2020) दिवशी सुशांतच्या चाहत्यांना त्यांची खूप आठवण येत असल्याचे दिसून येत आहे. दिवाळीच्या खास दिवशी काही चाहत्यांनी सुशांतच्या घराबाहेर दिवा लावला आहे. सुशांतच्या स्मरणार्थ शुक्रवारी त्याची एक चाहती त्याच्या मुंबईतील घराबाहेर पोहोचली. या ‘लेडी फॅन’ने सुशांतच्या स्मरणार्थ त्याच्या घराबाहेर दिवा लावला (Lady Fan Light diyas at Sushant singh rajput’s house on Diwali).

सुशांत सिंह राजपूतची बहीण श्वेता सिंह कीर्ती यांनी या महिला फॅनचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोत सुशांतची ही फॅन हातात दिवा घेऊन त्याची अपार्टमेंट ‘मॉन्ट ब्लँक’च्या बाहेर उभी आहे. हे चित्र पोस्ट करताना श्वेता सिंह कीर्ती यांनी लिहिले की, ‘हो, आम्हाला या व्यवस्थेवर ठाम विश्वास आहे आणि आम्ही न्याय मिळेपर्यंत आवाज उठवत राहू’.

सीबीआयचा तपास अंतिम टप्प्यात

गळफास घेत सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी मुंबईतील आपल्या राहत्या घरी आयुष्य संपवले. मात्र, त्याच्या चाहत्यांसह कुटुंबियांनीदेखील ही हत्या असल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले आहे. आता या प्रकरणातील सीबीआय तपास अंतिम टप्प्यात आहे. एम्सच्या अहवालात सुशांतचा मृत्यू फाशी आणि गुदमरल्यामुळे झाला असल्याचे म्हटले आहे (Lady Fan Light diyas at Sushant singh rajput’s house on Diwali).

त्याच वेळी, या प्रकरणात ड्रग्स अँगल समोर आला आहे. ज्यानंतर बॉलिवूडचे अनेक मोठे स्टार या प्रकरणात अडकल्याचे लक्ष्यात आले. यानंतर एनसीबीने धडक कारवाई करण्यास सुरुवात केली. याप्रकरणी एनसीबीने दीपिका पादुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत, श्रद्धा कपूर, अर्जुन रामपाल यांची चौकशी देखील केली. तर, सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांना अटक केली होती. यापैकी रियाला सध्या जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर, शौविक अद्याप तुरुंगात आहे.

सुशांतच्या बहिणीची न्यायाची मागणी

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Actor Sushant Singh Rajput) आत्महत्येनंतर त्याची बहीण श्वेतासिंह कीर्ती ही सतत सुशांतला न्याय मिळावा, यासाठी प्रयत्नशील आहे. गेल्या कित्येक दिवसात तिने अनेक डिजिटल मोहिमा राबविल्या, ज्याला लोकांचा पाठिंबाही मिळाला आहे. श्वेताने सुशांतच्या चाहत्यांचे नाव ‘एसएसआर वॉरियर्स’ असे ठेवले आहे. याशिवाय तिने ‘#SSRWarriors’ ट्रेंड केला आहे, जो वापरून चाहते सुशांतसाठी सतत न्यायाची मागणी करत आहेत.

(Lady Fan Light diyas at Sushant singh rajput’s house on Diwali)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें