Sushant Singh Rajput Suicide : आभासी आवाजही ऐकू यायचे, घाबरलेली मैत्रीण निघून गेली, सुशांतसोबत काय काय घडलं?

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Updated on: Jun 15, 2020 | 2:01 PM

सुशांतने हा टोकाचा निर्णय घेण्यासारखं त्याच्या आयुष्यात नेमकं काय घडलं होतं, असा प्रश्न अनेकांना पडला (Journey of Actor Sushant Singh Rajput before Suicide).

Sushant Singh Rajput Suicide : आभासी आवाजही ऐकू यायचे, घाबरलेली मैत्रीण निघून गेली, सुशांतसोबत काय काय घडलं?

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर एकच खळबळ उडाली. एम. एस. धोनी – द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटासह अनेक हिट चित्रपट देणाऱ्या सुशांतने वयाच्या 34 व्या वर्षी आत्महत्या केल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. यानंतर सुशांतने हा टोकाचा निर्णय घेण्यासारखं त्याच्या आयुष्यात नेमकं काय घडलं होतं, असा प्रश्न अनेकांना पडला (Journey of Actor Sushant Singh Rajput before Suicide). प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते महेश भट्ट यांच्या सहकारी लेखिका सुऱ्हिता सेनगुप्ता यांनी नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत यावरच अनेक मोठे खुलासे केले आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या आयुष्यातील मागील वर्षभरातील घडामोडींविषयी त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. यावरुन सुशांत सिंहच्या मानसिक स्थितीचा बराच अंदाज लावता येत आहे.

लेखिका सुऱ्हिता सेनगुप्ता म्हणाल्या, “सडक- 2 मध्ये रोल मिळावा म्हणून सुशांत महेश भट्ट यांना भेटायला आला होता. त्या दोघांमध्ये लगेचच गप्पा सुरु झाल्या. कारण सुशांत एक चांगला गप्पा मारणारा व्यक्ती होता. जगातील कुठल्याही विषयावर बोलू शकायचा. अगदी क्वांटम फिजिक्सपासून ते सिनेमापर्यंत, कशावरही तो बोलायचा. या गप्पांमध्ये महेश भट्ट यांना सुशांतच्या अवस्थेचा अंदाज आला. त्यांना त्याची अवस्था परवीन बाबीसारखीच झाल्यासारखं वाटलं. महेश भट्ट यांनी ती अवस्था पाहिली होती. यावर औषध गोळ्यांशिवाय इतर कुठल्याच गोष्टीचा पर्याय नाही महेश भट्ट यांना माहित होतं.”

“सुशांत एवढा नैराश्याच्या गर्तेत असतानाही त्याची मैत्रीण रिया त्याच्यासोबत राहिली होती. त्यानं औषध गोळ्या घ्याव्यात म्हणून तिनं पूर्ण प्रयत्न केले, पण तो नकार द्यायचा. गेल्या वर्षभरात सुशांतनं स्वत:ला जगापासून वेगळं करुन घेतलं होतं. इतर कुणाशी त्याच्या संपर्कात नव्हतं. रिया जोपर्यंत ती सर्व परिस्थिती सहन करू शकत होती, तोपर्यंत त्याच्यासोबत होती. मात्र, एक वेळ अशी आली की, सुशांतला आवाज ऐकू यायला लागले. त्याला असं वाटायला लागलं की, लोक त्याचा खून करण्याचा प्रयत्न करतायत,” असंही सेनगुप्ता यांनी सांगितलं.

“अनुराग कश्यप आता माझा खून करण्यासाठी येईल”

सुऱ्हिता सेनगुप्ता म्हणाल्या, “एकेदिवशी सुशांत घरात अनुराग कश्यपची फिल्म पहात होता आणि तो रियाला म्हणाला, की मी कश्यपच्या फिल्मची ऑफर नाकारलीय. तो आता माझा खून करण्यासाठी येईल. रिया या प्रकाराने खूप घाबरली आणि तिला त्याच्यासोबत राहण्याची भीती वाटू लागली. महेश भट्ट यांनी देखील रियाला त्याच्यासोबत राहून आता उपयोग होणार नाही, उलट तु राहिली तर तुझंही मानसिक आरोग्य बिघडले असं सांगितलं. यानंतरही रिया सुशांतची बहिणी येईपर्यंत थांबली. त्याच्या बहिणीने देखील तिच्या पातळीवर सर्वोत्तम प्रयत्न केले आणि सुशांतला बरं वाटावं म्हणून प्रयत्न केले. मात्र, सुशांत कुणाचंही ऐकण्याच्या पलिकडे गेला होता. तो त्याचे औषधं देखील घेत नव्हता.”

मागील महिनाभरात तर सुशांत त्याच्या मानसिक तुरुंगातच अडकला होता. तो कुणालाही त्याच्यापर्यंत पोहचू देत नव्हता. तो खोल, अधिक खोल रुतत होता, असंही सुऱ्हिता सेनगुप्ता यांनी नमूद केलं.

संबंधित बातम्या :

Sushant Singh Suicide | सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने बॉलिवूड हादरलं, हळहळलं आणि कोसळलं!

Sushant Singh Rajput | सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या, शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं?

Sushant Singh Rajput | अंधुक भूतकाळ अश्रूवाटे ओघळतोय, आईच्या आठवणीतील सुशांतची अखेरची पोस्ट

Sushant Singh Rajput | चार दिवसापूर्वी मॅनेजरची इमारतीवरुन उडी, आज सुशांतचा गळफास

Sushant Singh Rajput suicide | सुशांतच्या आत्महत्येचं वृत्त धोनी पचवू शकेल का? धोनीच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा

Sushant Singh Rajput | अब शहर भर जिक्र मेरी खुदकुशी का.. संजय राऊत-उद्धव ठाकरेही हळहळले

Sushant Singh Rajput | सुशांतपूर्वी आत्महत्या केलेले कलाकार, दिग्गजांच्या Suicide ने बॉलिवूड शोकसागरात

Sushant Singh Rajput Chhichhore | शेवटच्या सिनेमात आत्महत्या न करण्याचा मंत्र, आठ महिन्यांनी स्वत:चं जीवन संपवलं

सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर अंकिता लोखंडेला धक्का, दुसऱ्या क्षणी फोन ठेवला

Sushant Singh Rajput | गळ्यावर दोरीचा व्रण, सुसाईड नोट नाही, सुशांतच्या आत्महत्येचं प्राथमिक कारण पोलिसांनी सांगितलं!

Sushant Singh Rajput suicide | मैत्रिणीसोबत नव्या फ्लॅटचा शोध, सहकाऱ्याने फोन न उचलणे, दाटून आलेलं नैराश्य ते गळफास

Sushant Singh Rajput suicide LIVE UPDATE | सुशांतचं पार्थिव कूपर रुग्णालयात

Journey of Actor Sushant Singh Rajput before Suicide

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI