मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला लतादीदींची साद; दीपावली पर्वावर म्हणाल्या…

दीपावली पर्वावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केलेल्या आवाहनाला ज्येष्ठ गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांनी प्रतिसाद दिला आहे. लतादिदींनी ट्विटर अकाऊंटवरुन आपल्या चाहत्यांना तसेच राज्यातील जनतेला दिवाळीनिमित्त फटाके न फोडण्याचे आवाहन केले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला लतादीदींची साद; दीपावली पर्वावर म्हणाल्या...
Follow us
| Updated on: Nov 08, 2020 | 5:07 PM

मुंबई : दीपावली पर्वावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहनाला गान सम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांनी प्रतिसाद दिला आहे. लतादिदींनी ट्विटर अकाऊंटवरुन आपल्या चाहत्यांना तसेच राज्यातील जनतेला दिवाळीनिमित्त फटाके न फोडण्याचे आवाहन केले आहे. तसेच फटाके फोडण्याऐवजी दिवे लावून दीपोत्सव साजरा करावा, असं लतादिदी म्हणाल्या आहेत. (Lata Mangeshkar responded to Uddhav Thackeray appealed to use less firecrackers)

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देणे गरजेचे आहे. दीपावली पर्वावर सर्वांनी फटाके कमी फोडावेत. आपण प्रदूषण रोखायला हवे. आपण सर्व प्रकाशपर्व साजरे करु. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. सर्वांनी मास्क वापरावा. प्रत्येकाने आपल्या आणि आपल्या परिवाराची काळजी घ्यावी.” असे लता मंगेशकर म्हणाल्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेशी आज (8 नोव्हेंबर) संवाद साधला यावेळी “दिवाळी आली आहे, गर्दी वाढत चालली आहे. सर्व व्यवहार सुरळीत होत आहेत. अशावेळी खबरदारी घेणं गरजेचं आहे. आपण सर्वांनी जिद्द, आत्मविश्वास, शिस्तीने कोरोनाची लाट आटोक्यात आणली. पण आपण खबरदारी घेणं गरजेचं आहे. सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवू नका, रोषणाई करा. आजूबाजूला त्रास होणार नाही, याची काळजी घेऊन प्रदूषण होणार नाही असे फटाके फोडा. पोलीस, महसूल, आरोग्य सेवक, डॉक्टर अत्यंत तणावाखाली जनतेसाठी लढत आहेत. कोरोनाविरोधात लढण्यासाठी आता आपल्याजवळ मास्कशिवाय दुसरं शस्त्र नाही,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, लॉकडाऊननंतर राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. राज्यात अनेक गोष्टी पूर्णपणे सुरु करण्यात आल्या आहेत. तर काही ठिकाणी ही 50 टक्के क्षमतेवर सुरु आहेत. राज्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्याचे दिसत आहे. मात्र सर्वांनी जबाबदारीने वागण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

संबंधित बातम्या :

CM Uddhav Thackeray | राज्यात फटाक्यांवर बंदी नाही, पण प्रदूषण करणारे फटाके टाळा, मुख्यमंत्र्यांचं आवाहन

मला तुमच्यावर आणीबाणी लादायची नाही, पण फटाक्यांच्या धुराने कोरोना वाढू शकतो, आतापर्यंतची मेहनत वाया जाईल: मुख्यमंत्री

मिठागरात मिठाचा खडा टाकू नका; टीकेची पर्वा न करता कामं करणारच; मुख्यमंत्र्यांचा निर्धार

(Lata Mangeshkar responded to Uddhav Thackeray appealed to use less firecrackers)

Non Stop LIVE Update
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.