AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आसाममध्ये पुराचं थैमान सुरुच, 128 जणांचा मृत्यू, 26 लाखापेक्षा अधिक लोकांना फटका

आतापर्यंत आसाममध्ये 23 जिल्ह्यांमधील 26 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे, तर 128 जणांचा मृत्यू झालाय. (Latest Updates of Assam Flood).

आसाममध्ये पुराचं थैमान सुरुच, 128 जणांचा मृत्यू, 26 लाखापेक्षा अधिक लोकांना फटका
| Updated on: Jul 27, 2020 | 8:01 AM
Share

दिसपूर : आसाममधील पूरस्थिती अधिक गंभीर होताना दिसत आहे (Assam floods). आतापर्यंत आसाममध्ये 23 जिल्ह्यांमधील 26 लाख लोकांना याचा फटका बसला आहे (Latest Updates of Assam Flood). लाखो लोकांना पुरामुळे विस्थापित करुन सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. राज्यात रविवारी आणखी 5 नागरिकांचा पुरामुळे मृत्यू झाला. आसामध्ये पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 128 जणांचा मृत्यू झाला आहे.

आसाम राज्य आपत्ती निवारण विभागाने (ASDMA) दिलेल्या पूरस्थितीच्या माहितीवरुन बारपेटा आणि कोकराझार जिल्ह्यांमध्ये रविवारी प्रत्येकी दोन नागरिकांचा मृत्यू झाला. याशिवाय मोरीगाव जिल्ह्यात देखील एकाचा मृत्यू झाला. आसाममध्ये पूर आणि इतर पुराशी संबंधित कारणांमुळे 102 तर भूस्खलनामुळे 26 जणांचा मृत्यू झाला.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

आसाममध्ये आतापर्यंत 24.76 लाखपेक्षा अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. सर्वाधिक फटका गोलपाडा भागाला बसला आहे. येथे जवळपास 4.7 लाखांपेक्षा अधिक लोकांना विस्थापित करावं लागलं. राज्यात 101 बचाव होड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मागील 24 तासात जिल्हा प्रशासनाने आणि स्थानिक लोकांनी 188 जणांना वाचवले आहे. शनिवारपर्यंत (25 जुलै) 27 जिल्ह्यांमधील 26.37 लाखांपेक्षा अधिक जणांना पुराचा फटका बसला आहे.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

दरम्यान, आसाममधील पुरग्रस्तांसाठी मदतकार्य सुरु आहे. देशभरातून पुरग्रस्तांविषयी काळजी व्यक्त केली जात आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी देखील आसामधील पुराची स्थिती जाणून घेतली आहे.

हेही वाचा :

कोरोना संपवण्यासाठी राम मंदिर भूमिपूजनापर्यंत रोज हनुमान चालिसा म्हणा : प्रज्ञासिंह ठाकूर

Ayodhya Ram Mandir | अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजन दहा दिवसांवर, नागपुरातून पवित्र माती आणि पाणी रवाना

‘भाभीजी पापड’ खा आणि कोरोनामुक्त व्हा, केंद्रीय राज्यमंत्र्यांचा दावा

Latest Updates of Assam Floods

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.