AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना संपवण्यासाठी राम मंदिर भूमिपूजनापर्यंत रोज हनुमान चालिसा म्हणा : प्रज्ञासिंह ठाकूर

प्रज्ञासिंह ठाकूर यांनी ट्विटरवर देशातील नागरिकांना 5 ऑगस्टपर्यंत दररोज 5 वेळा हनुमान चालिसाचं पठण करण्याचं आवाहन केलं आहे. (Bjp MP Pragya Thakur says recite hanuman chalisa to fight corona virus).

कोरोना संपवण्यासाठी राम मंदिर भूमिपूजनापर्यंत रोज हनुमान चालिसा म्हणा : प्रज्ञासिंह ठाकूर
| Edited By: | Updated on: Aug 04, 2020 | 5:10 PM
Share

भोपाळ : भाजप खासदार प्रज्ञासिंह ठाकूर पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. अयोध्येतील राम मंदिरातच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम 5 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. त्याचअनुषंगाने प्रज्ञासिंह ठाकूर यांनी ट्विटरवर देशातील नागरिकांना 5 ऑगस्टपर्यंत दररोज 5 वेळा हनुमान चालिसाचं पठण करण्याचा आग्रह केला आहे. देशातून कोरोनाचं उच्चाटन करण्यासाठी हा एक अध्यात्मिक प्रयत्न आहे, असं प्रज्ञासिंह ठाकूर म्हणाल्या आहेत (Bjp MP Pragya Thakur says recite hanuman chalisa to fight corona virus).

“देशात कोरोनाला संपवण्यासाठी आणि लोकांच्या चांगल्या आरोग्यासाठी एक अध्यात्मिक प्रयत्न करुया. 5 ऑगस्टपर्यंत आपापल्या घरी दररोज संध्याकाळी सात वाजता पाच वेळा हनुमान चालीसा म्हणा. या कार्यक्रमाचा समारोप 5 ऑगस्ट रोजी घरात दिवा लावून रामलल्लाच्या आरतीने करा”, असं आवाहन प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केला (Bjp MP Pragya Thakur says recite hanuman chalisa to fight corona virus).

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“भोपाळमध्ये 25 जुलै ते 4 ऑगस्ट असा दहा दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाचा हा प्रयत्न आहे. प्रशासन कोरोना रोखण्यासाठी ज्याप्रकारे प्रयत्न करत आहे त्याचप्रकारे आपणही एक प्रयत्न करुया. आपण अध्यात्मिक प्रयत्न करुया. आपण 25 जुलैपासून 5 ऑगस्टपर्यंत दररोज संध्याकाळी 7 वाजता हनुमान चालिसाचं 5 वेळा पठण करुया”, असा आग्रह प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केला.

“भोपाळमधील लॉकडाऊन 4 ऑगस्टला संपेल. पण आपण 5 ऑगस्ट रोजी या कार्यक्रमाचा समारोप करु. प्रभू रामचंद्रांच्या आशीर्वादानेच अयोध्येत 5 ऑगस्ट रोजी भव्य राम मंदिराचं भूमीपूजन आहे. आपण सर्व 5 ऑगस्ट हा दिवस दिवाळीसारखा साजरा करुया. 5 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7 वाजता दिवा लावून हनुमान चालिसाचं पठण करुया. या कार्यक्रमाचा व्हिडीओ आपण फेसबूकवरही व्हायरल करु. देशभरातील नागरिकांनी एका सुरात हनुमान चालिसाचं पठण केलं तर निश्चितच देशात कोरोना रोखण्यासाठी मदत होईल”, असा दावा प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केला.

दरम्यान, जगभरात कोरोनावर लस शोधण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. तर दुसरीकडे अनेकजण कोरोनावर उपचारबाबत वेगवेगळे दावा करत आहेत. दोन दिवसांपूर्वी केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला होता. त्या व्हिडीओत त्यांनी हातात पापडचं पॅकेट पकडलं होतं. ते पॅकेट ‘भाभीजी पापड’ कंपनीचं आहे. हे पापड खाल्यावर कोरोना होत नाही किंवा बाधित रुग्ण कोरोनामुक्त होतो, असा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर आता प्रज्ञासिंह ठाकूर यांचा व्हिडीओ समोर आला आहे.

हेही वाचा :

‘भाभीजी पापड’ खा आणि कोरोनामुक्त व्हा, केंद्रीय राज्यमंत्र्यांचा दावा

भारताने मैत्रीचा हात पुढे केला, पण पाकिस्तानने पाठीत खंजीर खुपसला : पंतप्रधान मोदी

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.