भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर जैशचा म्होरक्या मसूद अजहरला आानंदाच्या उकळ्या, ऑडिओ टेप जारी

दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरची एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. त्यात तो काश्मिरी तरुणांना भडकावण्याचं काम करत असल्याचं दिसून येत आहे. त्याचप्रमाणे भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर मसूदला आनंदाच्या उकळ्याही फुटत असल्याचं पाहायला मिळत आहे.

भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर जैशचा म्होरक्या मसूद अजहरला आानंदाच्या उकळ्या, ऑडिओ टेप जारी
Follow us
| Updated on: Oct 27, 2020 | 10:44 AM

नवी दिल्ली: FATAच्या ब्लॅकलिस्टमधून पाकिस्तान बाहेर आल्यानंतर लगेच दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरची एक ऑडिओ रेकॉर्डिंग समोर आली आहे. या ऑडिओ टेपमध्ये मसूदचा एक संदेश आहे. यात मसूदने अफगाणिस्तानला जिहादचा सर्वात मोठा कारखाना म्हटलं आहे. त्यामुळं जैश-ए -मोहम्मदने पाकिस्तानच्या सहाय्यानं अफगाणिस्तानात काश्मीरमध्ये पाठवण्यात येणाऱ्या दहशतवाद्यांचं प्रशिक्षण केंद्र बनवल्याचं मसूदच्या या ऑडिओ टेपमधून स्पष्ट होत आहे. (leader of terrorist organization Jaish e Mohamad Masood Azhars audio recording)

“जिहादचा सर्वात मोठा ‘महाज’ अफगाणिस्तान. जिहादचा सर्वात मोठा कारखाना अफगाणिस्तान, जिहादचा इस्लामी नकाशा अफगाणिस्तान, या काळातील जिहादची आई अफगाणिस्तान, २० लाखापेक्षा जास्त जिहादींचा अड्डा अफगाणिस्तान, जगातील तीन महासत्तांना धूळ चारणारा अफगाणिस्तान, जिहाद-ए-काश्मीरला आपल्या रक्ताने उजवळणारा अफगाणीस्तान, नाटोला गुडघे टेकायला लावणारा अफगाणिस्तान, असं असताना काळजीचं कारण काय?” अशी दर्पोक्ती करणारी मसूदची ऑडिओ टेप समोर आला आहे.

काश्मीरमधील जैशच्या कटाचा उलगडा

मसूद अजहरच्या ऑडिओ टेपमधून काश्मीरमधील मोठ्या दहशतवादी हल्ल्याच्या कटाचा उलगडा झाला आहे. त्याने भारताला पोकळ धमकी देताना “तारीख का बम एक बारुदी सुरंग की तरह मिट्टी के अंदर दफन हुआ है. ये अचानक फटेका, इंडियाके तमाम फौजी काश्मीर में फंस जाएंगे. परेशानी की बात ये होगी की इतने सारे कैदियों का क्या किया जाये”, असं म्हटलं आहे. (leader of terrorist organization Jaish e Mohamad Masood Azhars audio recording)

काश्मिरी तरुणांना भडकवण्याचा प्रयत्न

जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर आणि काश्मीरमधील दहशतवाद्यांचा मोठ्या प्रमाणात खात्मा झाल्यानंतर मसूद अजहर आता काश्मिरी तरुणांना भडकवण्याचं काम करत आहे. “काश्मीर में शोहादा-ए-किराम बसते हैं. ये इस मिट्टी में इसलिए दफन हुए की इनका खमीर इसी मिट्टी से उठाया गया था. अब वो जेरो जमीन बडी-बडी हुकुमतों के मालिक हैं. हमें इसमें जरा बराबर शक नहीं, कश्मीर की खुशीसी हकीकत वो फरेबी टॉफी थी, जो इनके मुंह में देकर इनसे इनकी आज़ादी छीन रही थी, अब वो धोखा खत्म हुआ.” अशा शब्दात मसूद काश्मिरी तरुणांना भडकवण्याचा प्रयत्न या ऑडिओ टेपच्या माध्यमातून करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

भारत-चीन तणाव, मसूदला आनंदाच्या उकळ्या

लडाख सीमेवर भारत-चीन तणावाचा आनंद जैशचा म्होरक्या मसूद अजहरला झाल्याचं या टेपवरुन दिसून येत आहे. भारत आणि चीनमध्ये युद्ध व्हावं अशी त्याची अपेक्षा आहे. “चीन आणि भारत युद्धाच्या तोंडावर उभे आहेत. पण भारताची भीती हे युद्ध पुढे सरकू देत नाही”, असं मसूदने म्हटलं आहे.

मसूद अजहरची ही ऑडिओ टेप आता समोर आल्यानंतर भारत सरकार याबाबत काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

सीमेवर 250-300 दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत, भारतीय जवान डाव उधळणार : आर्मी कोअर कमांडर

देशातील इंचभर जमीनही बळकावू देणार नाही; राजनाथ सिंह यांचा चीनला इशारा

leader of terrorist organization Jaish e Mohamad Masood Azhars audio recording

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.