Corona Live : हल्दीराम असो वा कुठलाही राम, सूचना न पाळणाऱ्यांवर कारवाई करु : गृहमंत्री

Corona Live : हल्दीराम असो वा कुठलाही राम, सूचना न पाळणाऱ्यांवर कारवाई करु : गृहमंत्री

[svt-event title=”नागपूर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांची संख्या 50 टक्क्यांवर आणणार, तुकाराम मुढेंचा निर्णय” date=”19/03/2020,6:10PM” class=”svt-cd-green” ] नागपूर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांची संख्या 50 टक्क्यांवर आणणार, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंकडून परिपत्रक जारी, आळीपाळीने अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयात यावे, प्रलंबित कामे उपस्थितीच्या दिवशी पूर्ण करा [/svt-event]

[svt-event title=”22 मार्चपासून भारतातील आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द” date=”19/03/2020,5:36PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”देशातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा 4 वर” date=”19/03/2020,5:05PM” class=”svt-cd-green” ] देशातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा 4 वर, पंजाबमध्ये एकाचा मृत्यू, यापूर्वी कर्नाटक, दिल्ली आणि महाराष्ट्रात प्रत्येकी एक रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू

[/svt-event]

[svt-event title=”कोरोना रोखण्यासाठी कल्याण-डोंबिवलीतील सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश” date=”19/03/2020,4:58PM” class=”svt-cd-green” ] कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कल्याण डोंबिवलीतील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडून इतर सर्व दुकाने 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय, कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याचे आदेश, आदेशाचं पालन न करणाऱ्या व्यवसायिकांवर कलम 188 अंतर्गत कायदेशीर कारवाईचा इशारा [/svt-event][svt-event title=”पश्चिम रेल्वेवर एसी लोकल 31 मार्चपर्यंत बंद” date=”19/03/2020,3:20PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”शिक्षकांना दहावी, बारावी बोर्डाचे पेपर घरुन तपासण्याची परवानगी द्या, काँग्रेस पदाधिकाऱ्याची मागणी ” date=”19/03/2020,3:19PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाब आणि पश्चिम बंगालमध्ये उद्यापासून सार्वजनिक वाहतूक बंद” date=”19/03/2020,2:48PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”साताऱ्यात दोन कोरोना संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल ” date=”19/03/2020,2:45PM” class=”svt-cd-green” ] साताऱ्यात दोन कोरोना संशयित रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सौदी अरेबिया आणइ शारजाह या ठिकाणाहून हे दोघे प्रवास करुन आलेले आहेत. दोन रुग्णांना सर्दी ताप असल्याने घशातील स्त्रावांचे नमुने पुण्यातील एनआयव्ही लॅबला पाठवले. [/svt-event]

[svt-event title=”उस्मानाबाद जिल्ह्यातील सलून पाच दिवस बंद राहणार ” date=”19/03/2020,2:42PM” class=”svt-cd-green” ] उस्मानाबाद जिल्ह्यातील सलूनची दुकाने पाच दिवस बंद राहणार आहेत. 20 मार्च ते 24 मार्चपर्यंत सलून दुकानं बंद असणार. महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. [/svt-event]

[svt-event title=”मुंबईत पश्चिम रेल्वेवरील एसी लोकल मार्चअखेरपर्यंत बंद” date=”19/03/2020,2:36PM” class=”svt-cd-green” ] मुंबई : पश्चिम रेल्वेवर एसी लोकल 31 मार्चपर्यंत बंद, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय, नॉन-एसी लोकल नेहमीप्रमाणे धावणार [/svt-event]

[svt-event title=”आपण फेज २ मध्ये आहोत ३ मध्ये आपल्याला जायचं नाही – राजेश टोपे ” date=”19/03/2020,1:22PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 49 वर : आरोग्य मंत्री” date=”19/03/2020,1:19PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हातावर “होम क्वारनटाईन” शिक्के असणाऱ्या 6 रेल्वे प्रवाशांना बोरिवली स्टेशनवर उतरवलं” date=”19/03/2020,1:03PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”एक दिवसआड नव्हे, 100 टक्के बंद, दादरमधील व्यापाऱ्यांचा मोठा निर्णय” date=”19/03/2020,11:54AM” class=”svt-cd-green” ] दादर व्यापारी संघटनेचा स्तुत्य निर्णय, गर्दी टाळण्यासाठी दादरमध्ये 100% लॉकडाऊन करण्याचा व्यापारी संघटनेचा निर्णय, गुढीपाडव्यापर्यंत दादरमधील 1000 दुकानं पूर्णत: बंद राहणार, प्रशासनानं एक दिवसाआड दुकानं बंद ठेवण्याचे आदेश दिले होते, मात्र व्यापारी संघटनेनं स्वत:हून पुढाकार घेत 100% दुकाने गुढीपाडव्यापर्यंत बंद ठेवणार असल्याचा निर्णय घेतला. जी उत्तर वॉर्ड ऑफिसमध्ये पत्र देऊन व्यापारी संघटनेनं कळवला निर्णय. [/svt-event]

[svt-event title=”शासकीय कार्यालयांना एसी न वापरण्याच्या सूचना ” date=”19/03/2020,11:49AM” class=”svt-cd-green” ] राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांना एसी न वारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कार्यालयात गरजेपुरते कमीतकमी एसीचा वापर करावा, असंही सांगितले जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांनी हे आदेश दिले आहेत. एसीच्या थंड वातावरणात कोरोना विषाणू अधिक काळ जिवंत राहतात आणि गरम तापमानात हे विषाणू लवकर सुकत असल्याचे म्हटले आहे. [/svt-event]

[svt-event title=”रत्नागिरीत कोरोनाच्या पाश्वभूमीवर जिल्ह्यातील हॉटेल, बार, टपऱ्या बंद होणार ” date=”19/03/2020,11:44AM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरीत आजपासून हॉटेल, बार, टपऱ्या बंद करण्यात येणार आहे. जिवनावश्यक वस्तुंची दुकाने सोडून इतर सर्व दुकानं बंद केली जाणार आहेत. पुढील पाच दिवसात जिल्ह्यातील एसटी सेवा टप्प्याटप्प्याने बंद केली जाणार आहे. त्यासोबत जिल्ह्यातील धार्मिक कार्यक्रमही बंद केले जाणार आहे. बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करणार आहे. परदेशातून आलेल्या व्यक्तींची माहिती लपवण्याचा प्रयत्न केल्यास संपुर्ण कुटुंबावर गुन्हे दाखल करणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली. [/svt-event]

[svt-event title=”दादर, महिममधील दुकानं बंद करण्यासाठी महापालिकेचे पथक रस्त्यावर ” date=”19/03/2020,11:21AM” class=”svt-cd-green” ] दादर, माहिममधील दुकानं बंद करण्यासाठी महापालिकेची पथकं रस्त्यावर उतरली आहेत. दुकानदारांनी आदेश पाळले नाहीत तर कारवाई करु, असं अधिकाऱ्यांनी सांगितले. दादरमधील सुविधा सेंटर, आयडियलच्या गल्लीतली दुकानं अजूनही सुरुच आहेत. त्यामुळे पालिका अधिकारी रस्त्यावर उतरुन बंद करण्याचे आवाहन करत आहेत. एक दिवस आड दुकानं सुरु करण्यासा सांगितले जात आहे. [/svt-event]

[svt-event title=”ICSE आणि CBSE बोर्डाच्या परीक्षा लांबणीवर” date=”19/03/2020,11:10AM” class=”svt-cd-green” ] ICSE आणि CBSE बोर्डाच्या परीक्षा लांबणीवर,परीक्षेच्या नव्या तारखा 31 मार्चनंतर जाहीर करणार, कोरोना विषाणूचा फटका ICSE आणि CBSE बोर्डालाही बसला आहे [/svt-event]

[svt-event title=”दिल्लीसह देशातील 115 पॅसेंजर रेल्वे गाड्या रद्द ” date=”19/03/2020,10:27AM” class=”svt-cd-green” ] कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने 115 गाड्या रद्द केल्या आहेत. दिल्लीसह देशातील 115 पॅसेंजर रेल्वे गाड्यांचा यामध्ये समावेश आहे. [/svt-event]

[svt-event title=”नाशिकमध्ये स्वाईन फ्लूचे चार रुग्ण ” date=”19/03/2020,9:44AM” class=”svt-cd-green” ] कोरोनाचे सावत असताना शहरात स्वाईने फ्लूचे चार रुग्ण सापडले आहेत. 6 संशियत रुग्ण रुग्णालयात दाखल झाले असून यातील चार बाधित रुग्ण आहेत. गेल्यावर्षी स्वाईन फ्लूमुळे 11 जणांचा मृत्यू झाला होता. [/svt-event]

[svt-event title=”ठाणे जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, तंबाखू, सिगारेटवर बंदी” date=”19/03/2020,9:33AM” class=”svt-cd-green” ] कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तंबाखूजन्य पदार्थ आणि सिगारेटवर बंदी घातली आहे. [/svt-event]

[svt-event title=”आशिया खंडातील मोठी एपीएमसी बाजारपेठ बंद ” date=”19/03/2020,9:24AM” class=”svt-cd-green” ] आशियातील सर्वात मोठी एपीएमसी बाजारपेठही बंद ठेवण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि गर्दी टाळण्यासाठी ही बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. दिवसाला या बाजारपेठेत 1200 गाड्यांची आवक असते. [/svt-event]

[svt-event title=”नाशिकमध्ये मंगल कार्यालयांवर बंदी, स्टॉल आणि टपऱ्याही बंद” date=”19/03/2020,9:20AM” class=”svt-cd-green” ] नाशिकमध्ये मंगल कार्यालयांवर आजपासून बंदी घालण्यात आली आहे. आजपासून स्टॉल आणि टपऱ्या देखील बंद करण्यात आल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीबाबत 31 मार्च नंतर होणार निर्णय घेण्यात येणार आहे. [/svt-event]

[svt-event title=”विरार-चर्चगेट लोकल ट्रेनमधील गर्दी ओसरली ” date=”19/03/2020,9:10AM” class=”svt-cd-green” ] कोरोना या संसर्गजन्य विषाणूचे जागतिक संकट बनले आहे. कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. गर्दीचे ठिकाण टाळण्यासाठी राज्यसरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. पण सर्वात जास्त गर्दीचे ठिकाण म्हणजे लोकल ट्रेन आहे. कोरोना हा संसर्गजन्य विषाणू लोकलच्या गर्दीतून वाढू शकतो असा संशय प्रत्येकाच्या मनात आहे. त्यामुळे गर्दी कमी नाही झाली तर कठोर निर्णय घ्यावे लागतील असे सांगितले होते. पश्चिम रेल्वे वरील विरार ते चर्चगेट ही लोकल नेहमी तुडुंब भरून जात होती. पण कोरोना रोखण्यासाठी लोकल ट्रेनमधील गर्दीही ओसरली आहे. [/svt-event]

[svt-event title=”जिल्हाधिकऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली, नागपूरमध्ये उपहारगृह, स्नॅक्स सेंटर सुरु” date=”19/03/2020,9:00AM” class=”svt-cd-green” ] नागपुरातील घंतोली परिसरात काही उपहारगृह आणि स्नॅक्स सेंटर सर्रासपणे सुरु आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेश असूनही दुकान सुरु ठेवल्याने त्यांच्यावर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आजपासून रेस्टॉरंट, पानटपरी, चहाची दुकानं बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. [/svt-event]

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI