LIVE : सिंधुदुर्गात बोट उलटून कल्याणच्या महिलेचा मृत्यू

LIVE : सिंधुदुर्गात बोट उलटून कल्याणच्या महिलेचा मृत्यू

[svt-event title=”सिंधुदुर्गात बोट उलटून कल्याणच्या महिलेचा मृत्यू” date=”05/12/2019,3:31PM” class=”svt-cd-green” ] सिंधुदुर्ग : मालवणमध्ये देवबाग संगम खाडीपात्रात पर्यटकांना नेणारी बोट वाऱ्यामुळे उलटली, कल्याण आंबिवलीतील आठ जणांना वाचवण्यात यश, 60 वर्षीय महिलेचा मृत्यू [/svt-event]

[svt-event title=”राज्य सहकारी बँकेत पीएमसी बँक विलीन करण्याचा विचार” date=”05/12/2019,2:19PM” class=”svt-cd-green” ] पीएमसी बँकेच्या खातेदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न, राज्य सहकारी बँकेत पीएमसी बँक विलीन करण्याचा विचार, राज्य सरकारकडून राज्य सहकारी बँकेला विचारणा, गरज पडल्यास आरबीआयशी चर्चा करणार, आर्थिक मदत राज्य सरकार करणार, राज्य सरकारची मोठी भूमिका [/svt-event]

[svt-event title=”पुणे मार्केटला कांद्याचे दर भडकले” date=”05/12/2019,12:49PM” class=”svt-cd-green” ] पुणे मार्केटला कांद्याचे दर भडकले, ठोक बाजारात नवीन कांद 90 ते 110 किलो, तर ठोक बाजारात जुना कांदा 120 ते 130, किरकोळ बाजारात जुना कांदा 170 ते 200 रुपये किलो, पुढील डिसेंबरअखेरपर्यंत कांद्याचे दर चढेच राहिले, पुणे मार्केटला केवळ 40 ते 45 टक्के आवक, इतर वेळेस शंभर ट्रकच्या पुढे असलेली आवक 60 टक्क्यांवर घसरली, सुरुवातीचा दुष्काळ आणि त्यानंतर आलेला ओला दुष्काळ यामुळे कांद्याच्या पिकाचे मोठे नुकसान [/svt-event]

[svt-event title=”रेपो दरात कोणताही बदल नाही” date=”05/12/2019,11:54AM” class=”svt-cd-green” ] आरबीआयकडून रेपो दरात कोणताही बदल नाही, रेपो रेट 5.15 % तर रिव्हर्स रेपो रेट 4.90 टक्के कायम #reporate [/svt-event]

[svt-event title=”धनगर नेते प्रकाश शेंडगे एकनाथ खडसेंच्या भेटीला” date=”05/12/2019,10:03AM” class=”svt-cd-green” ] धनगर नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे अन्य ओबीसी नेत्यांसह एकनाथ खडसे यांची भेट घेणार, आज सकाळी 11.30 वाजता भेटीचं नियोजन, काल खडसेंची पंकजा मुंडे, विनोद तावडेंशी चर्चा [/svt-event]

[svt-event title=”तुर्कीतून 11 हजार टन कांदा आयात करणार” date=”05/12/2019,10:02AM” class=”svt-cd-green” ] भारत सरकार तुर्की देशातून 11000 टन कांदा आयात करणार आहे. भारतात कांद्याचे दर गगनाला भिडले असून यावर नियंत्रणासाठी सरकारचा प्रयत्न आहे. सध्या कांदा 150 रुपये किलोच्या घरात पोहोचला आहे. [/svt-event]

[svt-event title=”पोलिस महासंचालकांची राष्ट्रीय परिषद पुण्यात, उद्धव ठाकरे मोदी-शाहांची भेट घेणार?” date=”05/12/2019,10:01AM” class=”svt-cd-green” ] देशभरातील पोलिस महासंचालकांची तीन दिवसीय राष्ट्रीय पातळीवरील परिषद उद्यापासून पुण्यात सुरू होणार आहे. पुण्यातील बाणेर परिसरातील आयसर संस्थेत ही परिषद होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे 7 आणि 8 तारखेला या परिषदेत पूर्ण वेळ उपस्थित राहणार आहेत. याचदरम्यान महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. [/svt-event]

[svt-event title=”नागरिकत्व संशोधन विधेयकला काँग्रेसचा विरोध ” date=”05/12/2019,10:01AM” class=”svt-cd-green” ] नागरिकत्व संशोधन विधेयकला काँग्रेस लोकसभामध्ये विरोध करणार, काँग्रेस आज नागरिकत्व संशोधन विधेयकाच्या विरोधात संसदभवनात आंदोलन करणार [/svt-event]

[svt-event title=”काँग्रेस नगरसेवक बंटी शेळकेविरोधात गुन्हा” date=”05/12/2019,10:01AM” class=”svt-cd-green” ] नागपुरातील काँग्रेस नगरसेवक बंटी शेळकेविरोधात गुन्हा दाखल, विधानसभा निवडणुकीत मदत न केल्यामुळे मारहाण केल्याची मोंटू मुकरकुटे यांची तक्रार, कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल, बंटी शेळके युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव आहेत [/svt-event]

Published On - 10:05 am, Thu, 5 December 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI