लॉकडाऊन राहणारच, मात्र टप्प्याटप्प्याटप्याने अर्थव्यवस्थेला गती देणार : अजित पवार

लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढला आहे. अशा परिस्थितीत अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी राज्य सरकार (Maharashtra planning to boost economy) काही पावलं उचलत आहे.

लॉकडाऊन राहणारच, मात्र टप्प्याटप्प्याटप्याने अर्थव्यवस्थेला गती देणार : अजित पवार
Follow us
| Updated on: Apr 18, 2020 | 11:54 AM

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊनची मुदत 3 मेपर्यंत वाढवण्याचा (Maharashtra planning to boost economy) निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आधी 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आलेला लॉकडाऊन आपोआपच 3 मेपर्यंत वाढला आहे. अशा परिस्थितीत अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी राज्य सरकार (Maharashtra planning to boost economy) काही पावलं उचलत आहे. त्यानुसार 20 एप्रिलपासून काही घटकांना सशर्त परवानगी देणार आहे. लॉकडाऊन राहणारच, मात्र टप्प्याटप्प्याटप्याने अर्थव्यवस्थेला गती देणार, असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं.

लॉकडाऊन तीन मेपर्यंत वाढवला असून रेल्वे, मेट्रो, सार्वजनिक वाहतूक, सण, उत्सव, जाहीर कार्यक्रमासारखे बहुतांश व्यवहार यापुढेही बंद राहणार आहेत. राज्यात टाळेबंदीचे काटेकोर पालन यापुढेही सुरु राहील, त्याचबरोबर नागरिकांच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण व्हाव्यात, जनतेला आरोग्य सुविधा मिळाव्यात, शेतीची, मशागतीची कामे वेळेवर सुरु व्हावीत, अर्थव्यवस्थेला चालना मिळावी यासाठी कोरोनासंदर्भातील मार्गदर्शक नियमावली आणि आदेशांचे काटेकोर पालन करण्याच्या अटींवरच काही बाबींना मर्यादित स्वरुपात परवानगी देण्यात आली आहे. सोमवारी, 20 एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.

देशात जाहीर टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने काल मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. नागरिकांनी त्याचं काटेकोर पालन करावं, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केल आहे. मार्गदर्शक नियमावलीनुसार ग्रामीण भागातील उद्योग, निवडक व्यवसाय, व्यापारी आस्थापनांना कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या अटींवर परवानगी देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

राज्यात टाळेबंदीची मुदत वाढवण्यात आली असली तरी नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा यापुढेही नियमित सुरु राहील, त्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी दिला आहे. नागरिकांना, कोरोना प्रसार रोखण्यासाठी घरातच थांबावं, घराबाहेर पडू नये, सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असं आवाहनही केलं आहे.

उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, टाळेबंदीसंदर्भात केंद्राच्या सूचनांचे राज्यात काटेकोर पालन करण्यात येत आहे. टाळेबंदी लागू असली तरी जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीला परवानगी आहे. दवाखाने, हॉस्पिटल, औषधांची दुकाने, पॅथोलॉजी सेंटर, ॲम्बुलन्स सेवा सुरु आहेत. शेतीच्या मशागतीच्या कामांवरही कोणतही बंधन नाही. शेती आणि शेती उद्योगाशी संबंधीत सर्व कामे, दुकाने, व्यवहार सुरक्षिततेची काळजी घेऊन सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तूर, कापूस, हरभरा खरेदी योजना देखील सुरु राहणार आहे. दूधव्यवसाय, पशुपालन, मत्स्योद्योगविषयक कामांनाही परवानगी आहे. रोजगार हमी योजनेची कामे सुरु राहणार आहेत. अनाथालये, वृद्धाश्रम आदी सामाजिक संस्थांचं कामकाजही सुरु राहील. अंगणवाड्या बंद असल्या तरी बालकांना पोषणआहार घरपोच दिला जाणार आहे. शाळा, कॉलेज बंद असली तरी ऑनलाईन शिक्षणाला प्रोत्साहन देण्यास सांगण्यात आले आहे. बँका, वित्तीय संस्थांचे व्यवहार सुरु राहणार असले तरी नागरिकांनी तिथे गर्दी करु नये, असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

राज्यातील कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी टाळेंबंदीला सर्वांनी सहकार्य करावं, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन व्यक्तींमध्ये अंतर राखावं, घरातूनच काम करा, घरातंच रहा, सुरक्षित रहा, टाळेबंदीचं पालन करा, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

20 एप्रिलपासून काय काय सुरु होऊ शकतं?

  • लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात अतिरिक्त औद्योगिक घटकांसह, शेतीविषयक बाबी, बांधकाम क्षेत्र यांना अधिक सूट देण्यात आली आहे.
  • सराकारी कार्यालयांमध्ये 10 टक्के शासकीय कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य असेल.
  • मंत्रालयात येण्या-जाण्यासाठी ‘एस.टी.’ आणि ‘बेस्ट’ची विशेष बस सुविधा असेल.
  • जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरु राहणार.
  • जीवनावश्यक वस्तूंची मालवाहतूक करणारे ट्रक आणि ट्रक गॅरेजही सुरु असेल.
  • शेती विषयक कामं, कीटकनाशके, खते विक्री दुकानं मत्स्यव्यवसाय, सिंचन प्रकल्प, मनरेगाची कामं सुरु राहणार.
  • डिजीटल व्यवहार सुरु राहणार.
  • आयटी सेवा आणि कॉल सेंटरमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थितीची मुभा असेल.
  • कुरिअर सेवा सुरु असेल.
  • ऑनलाइन शिक्षण सुरु असेल.
  • सरकारी कार्यालयं सुरु असतील.
  • आरोग्य सेवा सुरु असतील.
  • लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या लोकांसाठी राहण्याची व्यवस्था करणारी हॉटेल आणि तोरण टाईम सेंटर सुरु राहतील.
  • इलेक्ट्रिशिअन, प्लंबर, मोटार मेकॅनिक, पार्टी सुविधा देणारे कर्मचारी काम करु शकतील.
  • लॉकडाऊनच्या काळात 20 एप्रिलपासून या सर्व गोष्टी सशर्त सुरु राहणार आहेत.

केंद्राच्या नियमावलीनुसार लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात काय सुरु राहणार?

लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात अत्यावश्यक सेवा, शेती संबंधित कामं, आरोग्य सेवा, मेडिकल, रुग्णालय, नर्सिंग होम, दवाखाने, पॅथलॅब आणि औषधाशी संबंधित सर्व कामं सुरु राहतील. त्यासोबत बँका आणि एटीएमही सुरु राहणार आहेत.

केंद्राच्या नियमावलीनुसार लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात काय बंद राहणार ?

आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय विमानवाहतूक, ट्रेन, मेट्रोसेवा, बससेवा, सर्व शैक्षणिक संस्था, औद्योगिक आणि कमर्शिअल कामे, हॉटेल, टॅक्सी, ऑटोरिक्षा, सायकल रिक्षा, चित्रपट गृह, शॉपिंग, कॉम्प्लेक्स, व्यायामशाळा, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, स्वीमिंग पूल, बार, कोणताही सार्वजनिक कार्यक्रम, सर्व धार्मिक कार्यक्रम बंद राहणार आहेत.

संबंधित बातम्या 

Lockdown 2 : शेती, डिजीटल व्यवहार, आयटी सेवा सशर्त सुरु, 20 एप्रिलपासून काय काय सुरु होऊ शकतं?

Corona | राज्यात दिवसभरात 31 रुग्णांची कोरोनावर मात, बाधितांची संख्या 3320 वर

पुण्यात 580 जणांना कोरोना संसर्ग, 47 जणांचा मृत्यू, हॉटस्पॉट ठरलेल्या भवानी पेठेसह कोठे किती रुग्ण?

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.