वर्धा-हिंगोलीत प्राणी क्वारंटाईन करण्याची वेळ, साडेतीन हजार गुरांना लम्पी त्वचारोग

वर्धा जिल्ह्यात तब्बल 3 हजार 628 लंम्पी स्कीन डिसीजबाधित जनावरांची नोंद आतापर्यंत घेण्यात आली आहे.

वर्धा-हिंगोलीत प्राणी क्वारंटाईन करण्याची वेळ, साडेतीन हजार गुरांना लम्पी त्वचारोग

वर्धा / हिंगोली : एकीकडे माणसांवर कोरोना विषाणूने हल्ला केला (Lumpy Skin Disease) असताना गोवंशाना ‘लंम्पी स्कीन डिसीज’ या विषाणूजन्य आजाराचा संसर्ग होत आहे. वर्धा जिल्ह्यात तब्बल 3 हजार 628 लंम्पी स्कीन डिसीजबाधित जनावरांची नोंद आतापर्यंत घेण्यात आली आहे. त्यापैकी 2 हजार 518 जनावरांनी त्यावर मात केली आहे. सद्यस्थितीत 1 हजार 110 अॅक्टिव्ह रुग्ण असल्याचे सांगण्यात येते (Lumpy Skin Disease).

‘लंम्पी स्कीन डिसीज’ या विषाणूचा संसर्ग झालेल्या जनावरांच्या त्वचेवर छोट्याछोट्या गाठी येतात. अशातच जनावर अन्नपाणी सेवन करण्याचे सोडतात. काही जनावरांचा या विषाणूजन्य आजारामुळे मृत्यूही झाला आहे. त्यामुळे गौपालकांनी खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या जनावरांना प्रतिबंधात्मक लस असलेली ‘गोट फॉक्स वॅक्सिन’ टोचून घ्यावी, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

47,500 लसींची खरेदी

‘लम्पी स्कीन डिसीज’या विषाणूच्या प्रसाराला अटकाव घालण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने शेष फंडातून तीन लाखांचा निधी खर्च करुन 47 हजार 500 नग ‘गोट फॉक्स’ ही प्रतिबंधात्मक लस खरेदी केली आहे. सध्या ही लस जिल्ह्यातील प्रत्येक पशुवैद्यकीय दवाखान्यात उपलब्ध असून बुधवार 2 सप्टेंबरपासून जिल्ह्यात लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेचा शुभारंभ पिंपळगाव (माथनकर) येथून करण्यात आला.

हिंगोलीतही लम्पी विषाणूचं थैमान

हिंगोलीत आता जनावरांनाही क्वारंटाईन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. लम्पी या त्वचा रोगाचा प्राण्यांवर प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकरी आता जनावरांनाही गोठ्यात सोशल डिस्टन मेटेंन करुन बांधत आहेत.

संपूर्ण हिंगोली जिल्ह्यातील गाई, बैलासह हजारो जनावरे या लम्पी आजाराच्या विळख्यात सापडले आहे. आता लम्पीच्या रुपाने नव संकट शेतकऱ्यांपुढे ऊभे ठाकलं आहे. योग्य माहितीच्या अभावाने हा आजार मोठ्या प्रमाणात पसरत आहे. मात्र, घाबरायचे कुठले ही कारण नाही वेळीच उपचार केल्यानंतर हा आजार लवकर बरा होत असल्याच पशु वैद्यकीय अधिकारी सांगत आहेत (Lumpy Skin Disease).

कोरोना रोगाच्या संकटामूळे मागील 5 महिन्यापासून दुधाचे भाव कमी झाले आणि जनावरांची खरेदी विक्रीसुद्धा बंद झाली आहे. त्यामुळे शेतकरी पशुपालकाचे खुप आर्थिक नुकसान होत आहे. ‘लम्पी स्कीन डिसीज’ या आजारावर पशुसंवर्धनने लस काढावी आणि सरकारने दुधाला वाढीव भाव देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

लम्पी स्कीन रोगाची लक्षणं कशी ओळखाल?

– सुरुवातीला भरपूर ताप येणे

– डोळ्यातून व नाकातून पाण्याचा स्त्राव होणे

– चारा कमी खाणे

– पाणी पिणे बंद करणे किंवा कमी पाणी पिणे

– दुग्ध उत्पादनांत घट होणे

– पायावर सूज येऊन जनावरे लंगडणे

– अंगावर गुदी येणे यासह इतर

लम्पी स्कीन रोगाचे नियंत्रण कशे करावे

– गोठा आणि परिसर स्वच्छ ठेवावा

– गोठा हवेशीर असावा

– परिसरात पाणी साचणार नाही ह्याची दक्षता घ्यावी

– रोगग्रस्त जनावराचा मृत्यू झाल्यास मृतदेह 08 फूट खोल खड्यात पुरावा

Lumpy Skin Disease

संबंधित बातम्या :

थायलंडमध्ये विकसित चाऱ्याची नेवाशात लागवड, सोमेश्वररावांना लॉकडाऊनमध्ये चार लाखांचा नफा

झेंडूला प्रतिकिलो विक्रमी 150-200 रुपयांचा दर, साताऱ्यातील शेतकऱ्याचं माळरानावर 3 महिन्यात 5 लाखांचं उत्पन्न

Published On - 3:11 pm, Thu, 3 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI