महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशला निघालेले आठ मजूर अपघातात बळी, तर यूपीत सहा मजुरांना बसने चिरडले

महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशला निघालेल्या मजुरांच्या ट्रकची बसला जोरदार धडक बसली. या दुर्घटनेमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला (Madhya Pradesh Uttar Pradesh laborers Killed in Accidents)

महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशला निघालेले आठ मजूर अपघातात बळी, तर यूपीत सहा मजुरांना बसने चिरडले

भोपाळ : लॉकडाऊनच्या काळात परराज्यात अडकल्यामुळे घराची वाट धरणाऱ्या मजुरांवर पुन्हा काळाने घाला घातला आहे. महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशला निघालेल्या स्थलांतरित मजुरांच्या ट्रकला मध्य प्रदेशात अपघात झाला. यामध्ये आठ जणांना प्राण गमवावे लागले. उत्तर प्रदेशमध्ये बसखाली चिरडून सहा मजुरांचा मृत्यू झाला. (Madhya Pradesh Uttar Pradesh laborers Killed in Accidents)

कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊन दरम्यान घरी परतणाऱ्या देशभरातील कामगारांचे अपघात होण्याच्या घटना समोर येत आहेत. औरंगाबादमध्ये रेल्वेखाली चिरडून 16 मजुरांचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना होऊन आठवडाही उलटला नसताना यूपी-एमपीमध्ये घडलेल्या घटनेने देश हादरला आहे.

महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशला निघालेल्या मजुरांच्या ट्रकची बसला जोरदार धडक बसली. या दुर्घटनेमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला, तर 50 हून अधिक मजूर जखमी झाले आहेत. मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यात हा भीषण अपघात झाला. जखमी मजुरांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दुसरीकडे, बिहारला जाणाऱ्या स्थलांतरित कामगारांचा उत्तर प्रदेशमध्ये बसखाली चिरडून मृत्यू झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. मुझफ्फरनगर-सहारनपूर महामार्गावरुन चालणार्‍या सहा मजुरांना भरधाव बसने चिरडले. घळौली चेकपोस्टजवळ रात्री उशिरा हा अपघात झाला. या प्रकरणी अज्ञात बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Madhya Pradesh Uttar Pradesh laborers Killed in Accidents)

हेही वाचा : Aurangabad Train Mishap | औरंगाबादच्या जीवघेण्या रेल्वे ट्रॅकवर नेमकं काय घडलं?

मालवाहू ट्रेनखाली चिरडून 16 मजुरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये गेल्या शुक्रवारी घडली. रात्रीच्या वेळेस रेल्वे रुळावरच विश्रांती घेण्यासाठी झोपलेल्या मजुरांचा पहाटेच्या सुमारास करुण अंत झाला. जालन्यातील स्टील कंपनीत काम करणारे मजूर मूळचे मध्य प्रदेशातील रहिवासी होते.

(Madhya Pradesh Uttar Pradesh laborers Killed in Accidents)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI