LIVE | सतीश चव्हाणांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जयंत पाटील, धनंजय मुंडे, राजेश टोपे औरंगाबादेत

महाराष्ट्र आणि देशातील प्रत्येक महत्त्वाची घडामोड आणि अपडेटेड बातम्या फक्त एका क्लिकवर

LIVE | सतीश चव्हाणांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जयंत पाटील, धनंजय मुंडे, राजेश टोपे औरंगाबादेत
Nupur Chilkulwar

|

Nov 12, 2020 | 11:39 AM

[svt-event title=”पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भाजपची डोकेदुखी वाढणार,रयत क्रांती संघटनेकडून उमेदवार जाहीर” date=”12/11/2020,11:31AM” class=”svt-cd-green” ] पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भाजपची डोकेदुखी वाढणार, महायुतीतील घटक पक्ष असणाऱ्या रयत क्रांती संघटनेकडूनही पुणे पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर, प्रा. एन.डी चौगुले यांना रयत क्रांती संघटनेकडून उमेदवारी, रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी केली उमेदवारी जाहीर, एन.डी चौगुले आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार [/svt-event]

[svt-event title=”अरुण लाड 1 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार” date=”12/11/2020,11:26AM” class=”svt-cd-green” ] पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरुण लाड 1 वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत [/svt-event]

[svt-event title=”सतीश चव्हाणांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जयंत पाटील, धनंजय मुंडे, राजेश टोपे औरंगाबादेत” date=”12/11/2020,11:17AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : औरंगाबाद पदवीधर मतदार संघाचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, धनंजय मुंडे, आरोग्य मंत्री राजेश टोपे औरंगाबाद विमानतळावर पोहोचले [/svt-event]

[svt-event title=”राष्ट्रवादी उमेदवार सतीश चव्हाण उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक कार्यालयात दाखल” date=”12/11/2020,11:16AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : विधानपरिषद पदवीधर निवडणूक, राष्ट्रवादी उमेदवार सतीश चव्हाण उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक कार्यालयात दाखल [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादेतही आघाडीत बिघाडी कायम, राष्ट्रवादी उमेदवाराला पाठिंबा देण्यावरुन काँग्रेसचे तळ्यात-मळ्यात सुरु” date=”12/11/2020,8:08AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : औरंगाबादेतही आघाडीत बिघाडी कायम, राष्ट्रवादी उमेदवाराला पाठिंबा देण्यावरुन काँग्रेसचे तळ्यात-मळ्यात सुरु, उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेसचा पाठिंबा नाही, पदवीधर निवडणुकीच्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला काँग्रेसचे बडे नेते गैरहजर [/svt-event]

[svt-event title=”निफाडचा किमान पारा घसरला, 8.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची यंदाच्या थंडीच्या हंगामातील नोंद” date=”12/11/2020,8:07AM” class=”svt-cd-green” ] निफाड : निफाडचा किमान पारा घसरला, 8.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची यंदाच्या थंडीच्या हंगामातील नोंद, कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागात नोंद [/svt-event]

[svt-event title=”कोल्हापूर महानगरपालिका अखेर प्रशासकाकडे, महानगरपालिका सभागृहाची मुदत संपल्यानं शासनाचा निर्णय” date=”12/11/2020,8:06AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका अखेर प्रशासकाकडे, महानगरपालिका सभागृहाची मुदत संपल्यानं शासनाचा निर्णय, आयुक्त कांदबरी बलकवडे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती, नगरविकास विभागाने काढले आदेश, पुढील किमान सहा महिने महानगरपालिकेचा कारभार आता प्रशासकाच्या हाती राहण्याची शक्यता, प्रशासक नियुक्तीनंतर आता महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेला ही येणार वेग [/svt-event]

[svt-event title=”नागपूर पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत आघाडीत बिघाडी?, राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार उतरवणार असल्याची शक्यता” date=”12/11/2020,8:05AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : नागपूर पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत आघाडीत बिघाडी?, राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार उतरविणार असल्याची माहिती, राष्ट्रवादी शहर कार्यकारिणीचा निर्णय, पदवीधर मतदार संघासाठी महाविकास आघाडीकडून काँगेसचे अभिजित वंजारी यांच्या नावाच्या घोषणा, दबावतंत्रासाठी राष्ट्रवादी, कडून उमेदवार देण्यात येणार चर्चा [/svt-event]

[svt-event title=”पदवीधर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस, दिग्गज राजकिय पक्षांचे उमेदवार आज भरणार उमेदवारी अर्ज” date=”12/11/2020,8:03AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : पदवीधर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस, दिग्गज राजकिय पक्षांचे उमेदवार आज भरणार उमेदवारी अर्ज, भाजपचे शिरीष बोराळकर आणि राष्ट्रवादीचे सतिष चव्हाण भरणार अर्ज, दिग्गज राजकिय नेतेही आज औरंगाबाद दौऱ्यावर, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील आज औरंगाबादेत, तर भाजपचे पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवेही औरंगाबाद दौऱ्यावर [/svt-event]

[svt-event title=”मनसे शहर उपाध्यक्ष राकेश पाटील हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला बेड्या” date=”12/11/2020,8:02AM” class=”svt-cd-green” ] अंबरनाथ : मनसे शहर उपाध्यक्ष राकेश पाटील हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला बेड्या, आरोपी डी मोहन याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, तब्बल 13 दिवसांनी सापडला डी मोहन, शिवाजीनगर पोलिसांनी केली अटक, आज करणार कोर्टात हजर करणार [/svt-event]

[svt-event title=”नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणूक, भाजप उमेदवार संदीप जोशी आज भरणार उमेदवारी अर्ज” date=”12/11/2020,8:01AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणूक, भाजप उमेदवार संदीप जोशी आज भरणार उमेदवारी अर्ज, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंच्या नेतृत्त्वात आज भाजपचं शक्तीप्रदर्शन, भाजपचे आमदार आणि प्रमुख नेते उपस्थित राहणार, काँग्रेस उमेदवार अभिजीत वंजारी आज भरणार उमेदवारी अर्ज, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत भरणार अर्ज, महाविकास आघाडी आज करणार शक्तीप्रदर्शन [/svt-event]

[svt-event title=”ओव्हरलोड रेती तस्करांना मदत, नागपूरच्या कोराडी पोलीस ठाण्यातील चार पोलीस निलंबित” date=”12/11/2020,7:37AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : नागपूरच्या कोराडी पोलीस ठाण्यातील चार पोलीस निलंबित, ओव्हरलोड रेती तस्करांना करत होते मदत, पोलीस उपायुक्त निलोत्पल यांच्या सतर्कतेने पोलिसांचा भांडाभोड, पोलीस विभागात खळबळ, काही दिवसांपूर्वी रेती तस्करांकडून पोलिसांवर हल्ला झाला होता, तरी पोलिसांची रेती तस्करांना मदत सुरूच [/svt-event]

[svt-event title=”नागपुरात दिवाळीच्या दिवशी वीज कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा, दिवाळीचं बोनस आणि वेतनवृद्धीतील दुसऱ्या हप्त्याची मागणी” date=”12/11/2020,7:35AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : दिवाळीच्या दिवशी वीज कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा, दिवाळीचं बोनस आणि वेतनवृद्धीतील दुसऱ्या हप्त्याची मागणी, महावितरण, महाजेनको आणि महापारेषणच्या कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा, वीज कर्मचाऱ्यांच्या विविध 16 संघटनांनी दिलं होतं मागण्यांचं निवेदन, तिन्ही कंपन्यातील 86 हजार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा संपाचा इशारा, वीज कर्मचारी संपावर गेल्यास दिवाळी अंधारात जाण्याची भिती [/svt-event]

[svt-event date=”12/11/2020,7:30AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें