Lockdown | लॉकडाऊन वाढवल्यानंतर टप्प्याटप्याने शिथीलता, राज्यात काय सुरु, काय बंद?

लॉकडाऊनदरम्यान ‘मिशन बिगीन अगेन‘ अंतर्गत टप्याटप्याने शिथीलता दिली जाणार (Activities Allow Maharashtra during the lockdown period) आहे.

Lockdown | लॉकडाऊन वाढवल्यानंतर टप्प्याटप्याने शिथीलता, राज्यात काय सुरु, काय बंद?
Follow us
| Updated on: Jun 29, 2020 | 5:07 PM

मुंबई : राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवला आहे. मात्र या लॉकडाऊनदरम्यान ‘मिशन बिगीन अगेन‘ अंतर्गत टप्याटप्याने शिथीलता दिली जाणार आहे. यात प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर सर्व भागातील दुकाने आता सशर्त उघडणार आहेत. (Activities Allow Maharashtra during the lockdown period)

यात मुंबई महापालिका आणि एमएमआर क्षेत्र, पुणे अंतर्गत येणाऱ्या सर्व महापालिका, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूरमध्ये पुढील गोष्टीना मर्यादांसह मंजुरी देण्यात आली आहे. यात अनेक निर्बंधही लावण्यात आले आहे.

? लॉकडाऊनमध्ये ‘या’ गोष्टींना सशर्त परवानगी

  • अत्यावश्यक सेवांची दुकाने पूर्वीप्रमाणे सुरु राहणार
  • इतर दुकानेही संबंधित महापालिकांच्या सूचनेनुसार उघडतील.
  • मॉल आणि मार्केट कॉम्प्लेक्स वगळता सर्व बाजार, दुकाने सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत उघडतील.
  • मद्य दुकाने सुरु करण्यास परवानगी असल्यास उघडतील. अन्यथा होम डिलिव्हरीसाठी परवानगी
  • आवश्यक आणि इतर वस्तूंची ई-कॉमर्स विक्री
  • औद्योगिक काम सुरु राहतील
  • खाजगी आणि सार्वजनिक बांधकाम साईट किंवा मान्सूनपूर्व काम करण्यास परवानगी
  • रेस्टॉरंट/किचन होम डिलिव्हरी करण्यास परवानगी
  • ऑनलाईन/दूरशिक्षणास परवानगी
  • सायकलिंग, रनिंग, वॉक, व्यायाम या सर्व गोष्टींना परवानगी
  • वर्तमानपत्राची छपाई आणि वितरणास परवानगी
  • लग्नासंबंधी कार्यक्रमासाठी मेळावा मोकळ्या जागा, लॉन किंवा नॉन-एसी हॉलमध्ये घेण्यास परवानगी (Activities Allow Maharashtra during the lockdown period)

? सरकारी कर्मचाऱ्यांसह खासगी कर्मचाऱ्यांना अटी-शर्तींसह ‘या’ परवानगी 

  1. सरकारी कार्यालये (आपत्कालीन, आरोग्य आणि वैद्यकीय, आपत्ती व्यवस्थापन, पोलिस, अन्न आणि नागरी पुरवठा वगळता) 15 टक्के किंवा 15 कर्मचारी संख्येने (जे अधिक असेल ते) कार्यरत राहतील
  2. सर्व खासगी कार्यालये 10 टक्के किंवा 10 कर्मचारी संख्येने (जे अधिक असेल ते) कार्यरत राहतील
  3. टॅक्सी, कॅब, रिक्षा, चारचाकी – केवळ आवश्यक प्रवासासाठी चालक + 2 दुचाकी – केवळ चालक
  4. प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट कंट्रोल अशा तंत्रज्ञ यांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर याचा वापर करुन काम करावे, गॅरेजची वेळ घेऊन वाहन दुरुस्ती कामे करावीत.
  5. वर्तमानपत्राची छपाई आणि वितरणास परवानगी
  6. शैक्षणिक संस्थांचे कर्मचारी पेपर तपासणे किंवा निकाल जाहीर करणे या कामासाठी प्रवास करु शकतात
  7. केशकर्तनालय, स्पा, सलून, ब्युटी पार्लर यांना नियम पाळून कार्यरत राहण्याची मुभा
  8. एमएमआर क्षेत्रा अंतर्गत आवश्यक काम आणि कार्यालयासाठी आंतरजिल्हा प्रवास. खरेदीसाठी जवळच्या मार्केटमध्ये जाणे अपेक्षित. अनावश्यक कामासाठी लांब पल्ल्याचा प्रवास करण्याची मुभा नाही
  9. जिल्हांतर्गत बस सेवा 50 टक्के प्रवाशांसह

कार्यालयासाठी अतिरिक्त सूचना

  • सर्व सरकारी कार्यालये गरजेनुसार किमान 15 टक्के कर्मचारी वर्ग किंवा किमान 15 कर्मचारी (जे अधिक असेल ते) यामध्ये काम करतील.
  • शक्य तितक्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास प्रोत्साहन द्यावे.
  • थर्मल स्क्रीनिंग, हँड वॉश, सॅनिटायझर प्रत्येक प्रवेशद्वाराजवळ ठेवणे अनिवार्य
  • दोन शिफ्टच्या दरम्यान, दरवाजे यासारख्या सर्वाधिक मानवी स्पर्श होणाऱ्या जागा सॅनिटाईझ कराव्यात.
  • दोन कर्मचाऱ्यांमध्ये पुरेसे अंतर राहील, दोन शिफ्ट आणि लंच ब्रेकमध्ये गर्दी जमणार नाही, याची काळजी बाळगावी. (Activities Allow Maharashtra during the lockdown period)

संबंधित बातम्या : 

Lockdown Extension | कन्फ्युजन नको, 31 जुलैपर्यंत वाढवलेल्या लॉकडाऊनबद्दल सर्व काही

Maharashtra Lockdown Extension | महाराष्ट्रात लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवला

Non Stop LIVE Update
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.