महिंद्रा देशातील सर्वात स्वस्त Electric vehicle सादर करणार, कार लाँचिंगसाठी सज्ज

प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. त्यामुळे 2021 मध्ये अनेक दिग्गज कार कंपन्या इलेक्ट्रिक कार्स लाँच करण्याच्या तयारीत आहेत.

महिंद्रा देशातील सर्वात स्वस्त Electric vehicle सादर करणार, कार लाँचिंगसाठी सज्ज
Follow us
| Updated on: Jan 05, 2021 | 1:19 PM

मुंबई : प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. त्यामुळे 2021 मध्ये अनेक दिग्गज कार कंपन्या इलेक्ट्रिक कार्स लाँच करण्याच्या तयारीत आहेत. पूर्वी इलेक्ट्रिक कार्सच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिले नाही. कार कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स लाँच करत आहेत. (Electric car will launch in 2021 in India)

भारतात इलेक्ट्रिक कार्स लाँच करण्यासाठी Mahindra & Mahindra कंपनी सज्ज आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार Mahindra कंपनीने इलेक्ट्रिक कार्सवर लक्ष केंद्रित केलं आहे. कंपनी यंदा Mahindra EKUV100 ही कार लाँच करु शकते. या कारची किंमत 8.25 लाख रुपये इतकी असेल. ही भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असेल असा दावा करण्यात आला आहे. (Mahindra e-KUV100 will be its cheapest electric car in India, know when it is going to launch)

महिंद्राने ही कार Auto Expo 2020 मध्ये सादर केली होती. तेव्हापासून कारप्रेमी या कारची वाट पाहात आहेत. महिंद्राच्या या कारमध्ये लिक्विड कूल्ड बैटरी पॅक आहे. ही बॅटरी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. त्यामुळे अवघ्या 55 मिनिटांमध्ये ही कार 80 टक्के चार्ज होईल. यामध्ये 15.9 किलोवॅटची लिक्विड कूल मोटर देण्यात आली आहे, जी 54Ps पॉवर आणि 120NM टॉर्क जेनरेट करते. एकदा चार्ज केल्यानंतर ही कार 147 किलोमीटरपर्यंत धावू शकते.

शानदार डिझाईन

Mahindra eKUV100 चा फ्रंट फेसिंग लुक या कारच्या स्टँडर्ड वेरिएंटसारखाच आहे. केवळ या कारच्या फ्रंट फेसमध्ये eFalcon चे बॅजेस दिले आहेत. तसेच या कारमध्ये फुल टचस्क्रिन इन्फोटेन्मेंट सिस्टिमही मिळेल. सोबतच या कारमध्ये स्टियरिंग माऊंटेड ऑडियो कंट्रोल फिचर, मॅनुअल एयर कंडिशनिंग, रिमोट आणि सेंट्रल लॉक असे अनेक फिचर्स देण्यात आले आहेत.

महिंद्रा अजून एक इलेक्ट्रिक कार लाँच करणार

महिंद्रा कंपनी e-KUV100 सोबत अजून एक इलेक्ट्रिक कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. Mahindra XUV300 Electric असं या करचं नाव आहे. कंपनीने ही कार गेल्या वर्षी ऑटो एक्सपो मध्ये सादर केली होती. कंपनी आता ही कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही एसयूव्ही 40kWh (स्टँडर्ड) आणि 60kWh (लाँग रेंज) बॅटरी ऑप्शनसह लाँच केली जाऊ शकते. कंपनीने दावा केला आहे की, एकदा चार्ज केल्यानंतर ही कार 370 ते 450 किलोमीटरपर्यंत धावेल. या कारची किंमत तब्बल 15 ते 29 लाख रुपये असू शकते.

दरम्यान महिंद्राच्या दोन इलेक्ट्रिक कार लाँच होण्यासाठी सज्ज असल्या तरी कंपनी या कार्स कधी लाँच करणार आहे, याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.

संबंधित बातम्या

देशात इलेक्ट्रिक कारची मागणी वाढली, टाटा मोटर्सच्या Nexon EV च्या 2,200 युनिट्सची विक्री

पेट्रोल पंपप्रमाणेच इलेक्ट्रिक गाड्यांसाठी ‘चार्जिंग’ स्टेशन उघडणार, चार्जिंगसाठी येणार ‘इतका’ खर्च!

2021 मध्ये येणार जबरदस्त इलेक्ट्रिक कार, एकदाच चार्ज करून 500 किमी धावणार

(Mahindra e-KUV100 will be its cheapest electric car in India, know when it is going to launch)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.