महापुराचा फटका शाळांनाही, तब्बल 2177 शाळांचं नुकसान, 1 लाख 63 हजार 275 विद्यार्थी बाधित

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आलेल्या महापुराचा जिल्हा परिषदेच्या शाळांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. राज्यातील 21 जिल्ह्यात तब्बल 2177 शाळांचं पुराने नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्यातील तब्बल 1 लाख 63 हजार 275 विद्यार्थी पुराने प्रभावित झाले आहेत.

महापुराचा फटका शाळांनाही, तब्बल 2177 शाळांचं नुकसान, 1 लाख 63 हजार 275 विद्यार्थी बाधित
Follow us
| Updated on: Aug 11, 2019 | 8:45 PM

पुणे: महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आलेल्या महापुराचा जिल्हा परिषदेच्या शाळांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. राज्यातील 21 जिल्ह्यात तब्बल 2177 शाळांचं पुराने नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्यातील तब्बल 1 लाख 63 हजार 275 विद्यार्थी पुराने प्रभावित झाले आहेत. या शाळांची दुरुस्ती आणि शैक्षणिक साहित्याची नुकसान भरपाई यासाठी एकूण 57 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी दिली. ते रविवारी पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पूरग्रस्त शाळांचा आढावा घेतला. यावेळी शेलार यांनी राज्यात अतिवृष्टीने 8 शिक्षण विभागांपैकी 6 विभागांना पुराचा फटका बसल्याचं सांगितलं. 21 जिल्ह्यातील 155 तालुक्यांच्या शाळांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. यात 53 वर्गखोल्यांचं संपूर्ण बांधकाम करावं लागणार आहे. तसेच 2177 शाळांच्या वर्गखोल्यांची दुरुस्ती करावी लागले.

पुरात 260 शाळांमधील 27 हजार 905 विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकांचंही नुकसान झालं आहे. पूर परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्याची माहिती घेऊन या जिल्ह्यांना देखील निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती शेलार यांनी दिली.

पूर ओसरल्यावर शाळांच्या थेट खात्यावर पैसे वर्ग करु, असेही आश्वासन यावेळी शेलार यांनी दिले. ते म्हणाले, “धोकादायक शाळांची पुनर्बांधणी केली जाईल. पिण्याच्या टाक्या देखील दुरुस्ती केली जाईल. विद्यार्थ्यांना वैद्यकीय उपचार पुरवले जातील. तसेच शाळांमध्ये जाण्यासाठी पुल दुरुस्तीसाठीही प्रयत्न करु. पुस्तके वाहून गेलेल्या 260 शाळांमधील 27 हजार 905 विद्यार्थ्यांना पुस्तके दिले जाणार आहेत. हिंदी, उर्दू आणि अन्य भाषांची पुस्तके उपलब्ध आहेत. वीज आणि डिजीटल वस्तूंची दूरुस्ती देखील केली जाईल.”

Non Stop LIVE Update
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.