मालेगावात दिवसभरात तब्बल 48 नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 171 वर

मुंबई पुण्यानंतर आता नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहर राज्यातील कोरोना हॉटस्पॉट (Malegaon Corona Patient Increase) बनलं आहे.

मालेगावात दिवसभरात तब्बल 48 नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 171 वर

नाशिक : मुंबई पुण्यानंतर आता नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहर (Malegaon Corona Patient Increase) राज्यातील  कोरोना हॉटस्पॉट बनलं आहे. मालेगावात आज दिवसभरात तब्बल 48 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकट्या मालेगावातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 171 वर पोहोचला आहे.

मालेगावमध्ये कोरोनाचा आकडा झपाट्याने वाढत आहे. दिवसभरात तब्बल 48 नवे रुग्ण आढळले आहेत. मालेगावात आज सकाळी 36 नवे रुग्ण आढळले होते. त्यानंतर काही तासांमध्ये आणखी 12 नवे रुग्ण आढळले आहेत. यात एका 9 वर्षीय मुलाचाही समावेश आहे.

हेही वाचा – Corona : मालेगाव ‘कोरोना’ हॉटस्पॉट कसं बनलं?

काही दिवसांपूर्वी मालेगावातील 7 जण कोरोनामुक्त झाले होते. त्यामुळे मालेगावात नागरिकांच्या चिंता काहीशी कमी झाली होती. पण त्यानंतर आज पुन्हा 48 नवे रुग्ण आढळल्याने प्रशासनाला धक्का बसला आहे. मालेगाव शहरातील एकूण 14 परिसर कंटेन्मेंटझोन म्हणून घोषित करण्यात आले आहे.

मालेगावमधील मोमीनपुरा, कमालपुरा, मदिना बाग, इस्लामाबाद, आझाद नगर, दत्त नगर हे भाग झोपडपट्टीचे आहे. तर इतर भाग हा चांगला, तर काही दाट लोक वस्ती असलेला भाग आहे. त्यामुळे ही रुग्णांची संख्या वाढत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मालेगाव शहरातील हॉटस्पॉट

 • मोमीनपुरा
 • कमालपुरा,
 • नयापुरा
 • अक्स कॉलनी
 • गुलाब पार्क
 • मदिना बाग
 • नूर बाग
 • अपना सुपर मार्केट
 • हजार खोली
 • इस्लामाबाद
 • खुसमत पुरा
 • बेल बाग
 • मोतीपुरा
 • झाद नगर
 • दत्त नगर

(Malegaon Corona Patient Increase)

संबंधित बातम्या : 

मिरा भाईंदरमध्ये दीड वर्षाचा मुलगा कोरोनामुक्त, एका दिवसात 15 जणांना डिस्चार्ज

महाराष्ट्रात 522 नवे कोरोना रुग्ण, एकूण आकडा 8 हजार 590 वर

Published On - 6:46 pm, Tue, 28 April 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI