AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल गांधी वायनाडचे खासदार, केरळमधील हत्तीणीच्या मृत्यूप्रकरणी अद्याप कारवाई का नाही? मेनका गांधी संतप्त

मलप्पुरममध्ये दररोज अशी एखादी घटना घडते. ते केवळ हत्तींनाच ठार मारत नाहीत, तर विष टाकून हजारो प्राण्यांचे एकत्र जीव घेतात, असा दावाही मेनका गांधी यांनी केला (Maneka Gandhi questions Rahul Gandhi on elephant death in Kerala after being fed cracker-stuffed pineapple)

राहुल गांधी वायनाडचे खासदार, केरळमधील हत्तीणीच्या मृत्यूप्रकरणी अद्याप कारवाई का नाही? मेनका गांधी संतप्त
| Updated on: Jun 04, 2020 | 8:50 AM
Share

नवी दिल्ली : केरळमध्ये गर्भार हत्तीणीचा बळी गेल्यानंतर देशभरात संतापाची लाट उमटली आहे. त्यातच भाजप खासदार मेनका गांधी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जाब विचारला आहे. “राहुल गांधी वायनाडचे खासदार आहेत, त्यांनी कारवाई का केली नाही?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. (Maneka Gandhi questions Rahul Gandhi on elephant death in Kerala after being fed cracker-stuffed pineapple)

“केरळमध्ये दर तिसर्‍या दिवशी एका हत्तीचा मृत्यू होतो. विशेषत: मलप्पुरम जिल्हा, केवळ प्राणीच नाही तर माणसांवर होणाऱ्या हल्ल्यांसाठीही कुख्यात आहे. कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी त्याच भागातील आहेत, त्यांनी अद्याप कारवाई का केली नाही?’ असा प्रश्न मेनका गांधी यांनी विचारला.

‘मलप्पुरम हा असा जिल्हा आहे, जिथे कदाचित सर्वाधिक हिंसाचार होतो. मलप्पुरममध्ये दररोज अशी एखादी घटना घडते. ते केवळ हत्तींनाच ठार मारत नाहीत, तर विष टाकून हजारो प्राण्यांचे एकत्र जीव घेतात. पक्षी, कुत्रे दररोज गतप्राण होतात’ असं मेनका गांधी यांनी सांगितलं.

नेमकं काय झालं? : विकृतीचा कहर, गर्भार हत्तीणीला फटाक्यांनी भरलेलं अननस दिलं, तीन दिवसांनी तडफडून गतप्राण

केरळ सरकारवर मेनका गांधी यांनी गंभीर आरोप केले. “मलप्पुरममध्ये कोणतीही कारवाई करण्यास पिनराई विजयन सरकार घाबरत आहे. कोणाचाही जीव घ्या, सरकार कोणतीही कारवाई करणार नाही, यासाठी केरळची ख्याती वाढली आहे. वन सचिव आशा थॉमस, मुख्य वन्यजीव वॉर्डन सुरेंद्रन आणि पर्यावरण मंत्री के. राजू यांच्याशी बोलून हैराण झाले. हे पहिले प्रकरण नाही. तीन-पाच दिवसांत एखादा हत्ती मारला जात आहे.” असा दावाही मेनका गांधी यांनी केला.

केरळमध्ये गर्भार हत्तीणीला काही समाजकंटकांनी फटाके भरलेलं अननस खाऊ घातलं. अननसातील फटाके हत्तीणीच्या तोंडात फुटल्याने तिला गंभीर इजा झाली होती. त्यानंतरही कुठलाही आकांडतांडव न करता हत्तीण शांतपणे नदीच्या पाण्यात जाऊन उभी राहिली. तिला बाहेर काढण्याचे अतोनात प्रयत्न करण्यात आले, मात्र ती निश्चल राहिली. अखेर तीन दिवसांनी तिने प्राण सोडले. त्यावेळी ती गर्भार असल्याचं समोर आलं. हत्तीण 14 ते 15 वर्षांची असल्याचा अंदाज वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

(Maneka Gandhi questions Rahul Gandhi on elephant death in Kerala after being fed cracker-stuffed pineapple)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.