संत बाळूमामाचा वंशज असल्याचं सांगणारे मनोहर भोसले पोलिसांच्या ताब्यात, पुणे पोलिसांची साताऱ्यात कारवाई

फसवणूक केल्याप्रकरणी मनोहर मामा भोसले (रा. उंदरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) याला अखेर पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी साताऱ्यात ही कारवाई केलीय. स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती तालुका पोलिसांनी मनोहर भोसले यांना ताब्यात घेतलं आहे.

संत बाळूमामाचा वंशज असल्याचं सांगणारे मनोहर भोसले पोलिसांच्या ताब्यात, पुणे पोलिसांची साताऱ्यात कारवाई
मनोहर भोसले
Follow us
| Updated on: Sep 10, 2021 | 5:10 PM

बारामती : संत बाळूमामाचा अवतार असल्याचे सांगत फसवणूक केल्याप्रकरणी मनोहर मामा भोसले (रा. उंदरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) याला अखेर पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी साताऱ्यात ही कारवाई केलीय. स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती तालुका पोलिसांनी मनोहर भोसले यांना ताब्यात घेतलं आहे. पोलिस अटकेची कारवाई करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी ही माहिती दिली आहे. (Manohar Bhosale is in the custody of Pune Police)

मनोहरमामा विरोधात बलात्काराचा गुन्हा

मनोहर मामा भोसले विरोधात करमाळा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. पीडित महिलेने करमाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी याप्रकरणी कलम 376 2 n,‌ 376 d, 354 385 आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायदा कलम 3 नुसार गुन्हा दाखल केला. मनोहर मामाच्या अटकेसाठी करमाळा पोलिसांचे स्वतंत्र पथक रवाना झाले आहे.

मनोहर मामा विरोधात बारामती पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल

विशेष म्हणजे मनोहर मामा यांच्या विरोधात नुकतंच बारामती पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संत बाळूमांमाचा अवतार असल्याचे सांगत फसवणूक केल्याप्रकरणी मनोहर मामा भोसले (रा. उंदरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांच्यासह त्यांच्या दोन अन्य साथीदारांविरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्करोग बरा करतो असे सांगत बाभळीचा पाला, साखर, भंडारा देत आरोपींनी लोकांची फसवणूक केली.

याप्रकरणी तिघांवर फसवणुकीसह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ठ-अघोरी प्रथा व जादूटोणा व उच्चाटन कायदा तसेच औषध चमत्कारी उपाय अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा आणि ओंकार शिंदे यांचाही गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे.

मनोहर मामांविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल

बारामती तालुक्यातील महेश आटोळे यांनी मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले यांनी अंधश्रद्धेतून फसवणूक झाल्याची तक्रार 31 ऑगस्ट 2021 रोजी बारामती तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे. या तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलं आहे की, माझ्याकडून त्यांनी जवळपास 40 लाख रुपयाचा रो हाऊस घेतला होता. मात्र माझी कुठलीच कामे मार्गी लागली नाहीत. त्यामुळे मी दिलेला रो हाऊस मनोहर मामा यांना परत मागितला. मात्र रो हाऊस मी तुला देणार नाही, कारण तुझ्या तंत्रविद्या करण्यात माझे लाखो रुपये खर्च झाले आहेत. तू मला ते पैसे परत कर त्यावेळेसच मी रो हाऊस परत करेन, असं मनोहर मामा यांनी सांगितले. यामुळे आटोळे यांनी फसवणूक झाल्याची तक्रार बारामती तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली होती.

मनोहर मामांनी आरोप फेटाळले

दरम्यान, मनोहर मामा यांनी आटोळे यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. मनोहर मामा यांच्यावर गेल्या काही दिवसांत अनेक प्रकारचे आरोप झाले आहेत. सध्या ते फरार असल्याचं बोललं जात होतं. या पार्श्वभूमीवर स्वत:ची बाजू मांडण्यासाठी ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. मी कुठेही फरार झालो नाही. तिरुपतीला गेलो होतो. आज आपल्यासमोर आहे. माझ्यावरील आरोप तथ्यहीन आहेत. माझ्याकडून खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न आहे. करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. माझी विनाकारण बदनामी सुरु असल्याचं मनोहर मामा यांनी म्हटलंय.

इतर बातम्या :

माध्यमांवर दबाव तयार करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न, फडणवीसांचा आरोप; संबंधित पोलिसांवर कारवाईची मागणी

दादागिरी करणाऱ्या PI संजय निकम यांच्यावर तात्काळ कारवाई करा, गुणरत्न सदावर्तेंची पोलीस आयुक्त, गृहमंत्र्यांकडे तक्रार

Manohar Bhosale is in the custody of Pune Police

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.