Maratha Reservation Agitation Live | खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या मठाबाहेर आंदोलन

राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केल्यानंतर आज मराठा समाजातर्फे सोलापुरात आंदोलन केले जात आहे. (Maratha Kranti Morcha Agitation In Solapur on Maratha Reservation)

Maratha Reservation Agitation Live | खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या मठाबाहेर आंदोलन

सोलापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केल्यानंतर आज मराठा समाजातर्फे सोलापुरात आंदोलन केले जात आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. माढ्यात काही ठिकाणी टायर जाळत जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. मराठा समाजाकडून राज्य आणि केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला जात आहे. (Maratha Reservation Agitation In Solapur Live Update)

Maratha Agitation LIVE मराठा आंदोनल लाईव्ह

[svt-event title=”मराठा आरक्षण घंटानाद, मुंबईत शिवसेना आमदार-खासदारांना निवेदन” date=”21/09/2020,12:02PM” class=”svt-cd-green” ] मुंबई : मराठा क्रांती मोर्चाचं आरक्षण कोर्टानं स्थगित केल्यानंतर आज मराठा मोर्चाकडून आज गोरेगाव दिंडोशी येथे घंटा नाद आंदोलन करण्यात येत आहे . दिंडोशीत घंटानाद करून त्या नंतर स्थानिक शिवसेना आमदार सुनील प्रभू आणि शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांना निवेदन दिलं जाणार आहे . आम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींकडे आम्ही आमची मागणी करण्यासाठी त्यांना निवेदन देत असल्याच मोर्चेकरांचं म्हणणं आहे . [/svt-event]

[svt-event title=”खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या मठाबाहेर आंदोलन” date=”21/09/2020,11:57AM” class=”svt-cd-green” ] भाजप खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या मठाबाहेर सकल मराठा समाजाने आंदोलन केलं. खासदार जयसिद्धेश्वर स्वामी दिल्लीत असल्याने त्यांच्या मठाचे सचिव जयशंकर शेट्टी यांनी सकल मराठा समाजाचे निवेदन स्वीकारले. यानंतर मठाबाहेरचं आंदोलन स्थगित करण्यात आलं. केंद्रातून लवकरात लवकर आरक्षणाचा वटहुकूम काढला नाही तर अधिक तीव्र आंदोलन करु असा इशारा सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी दिलाय. [/svt-event]

सोलापुरात माढा तालुक्यात टायर जाळून आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सोलापूर बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. चौकाचौकात पोलिसांचं पथक उभं असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

तर पंढरपुरातही मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. माळशिरस-पंढरपूर रस्त्यावर टायर जाळत मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन केले जात आहे. यावेळी आंदोलनकर्त्यांकडून राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरसह अनेक भागात बंद पाळण्यात आला आहे. शहरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुमारे 2 हजार पोलीस तैनात केले आहेत.

दरम्यान काल (20 सप्टेंबर) मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक पावित्रा घेत मुंबईत ठिय्या आंदोलन करण्यात आले. मुंबईतील जवळपास 18 ठिकाणी हे आंदोलन केले गेले. मराठा आरक्षणाच्या स्थगितीविरोधात मराठा क्रांती मोर्चा निषेध नोंदवला. मुंबई लगतच्या शहरांमध्ये एकाच वेळी ठिय्या आंदोलन करण्यात आले.

कोल्हापुरात राज्यव्यापी गोलमेज परिषदेचे

तर उद्या 23 सप्टेंबरला कोल्हापुरात राज्यव्यापी गोलमेज परिषदेचे आयोजन केले जाणार आहे. यात विविध क्षेत्रातली सर्व तज्ञ मंडळी एकत्र येतील. या परिषदेत पुढील आंदोलनाची दिशा ठरणार, राज्यभरातून मराठा संघटनांचे नेते, याचिकाकर्ते, पदाधिकारी परिषदेत सहभागी होणार आहे.

मराठा आरक्षण सुनावणी घटनापीठाकडे वर्ग

मराठा आरक्षण कायद्याला सुप्रीम कोर्टाने अंतरिम स्थगिती दिली. मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठाकडे वर्ग करण्यात आली आहे. घटनापीठाच्या सुनावणी दरम्यान महाराष्ट्रात मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करता येणार नाही. मराठा आरक्षणाअंतर्गत 2020 आणि 2021 मध्ये वैद्यकीय प्रवेश प्रकिया आणि नोकरी भरती करता येणार नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. घटनापीठाच्या अंतिम निकालानंतरच मराठा आरक्षणाच्या कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकारला करता येणार आहे. (Maratha Reservation Agitation In Solapur Live Update)

संबंधित बातम्या : 

Maratha Reservation | सर्वोच्च न्यायालयात अंतरिम स्थगितीनंतर मराठा समाज आक्रमक, मुंबईत 18 ठिकाणी ठिय्या आंदोलन

संपूर्ण राज्यात एकाच दिवशी आंदोलन नाही, मराठा क्रांती मोर्चाकडून आंदोलनाच्या तारखा जाहीर  

Maratha Reservation ग्राऊंड रिपोर्ट | रोखठोक मराठा, आरक्षणावर पंढरपूरमधील मराठा समाजाला काय वाटतं? 

Published On - 11:04 am, Mon, 21 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI