Maratha Reservation | सर्वोच्च न्यायालयात अंतरिम स्थगितीनंतर मराठा समाज आक्रमक, मुंबईत 18 ठिकाणी ठिय्या आंदोलन

मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक पावित्रा घेतला असून आज (20 सप्टेंबर) मुंबईत ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. (Maratha Kranti Morcha Agitation In Mumbai)

Maratha Reservation | सर्वोच्च न्यायालयात अंतरिम स्थगितीनंतर मराठा समाज आक्रमक, मुंबईत 18 ठिकाणी ठिय्या आंदोलन

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायद्याला अंतरिम स्थगिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक पावित्रा घेतला असून आज (20 सप्टेंबर) मुंबईत ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. मुंबईतील जवळपास 18 ठिकाणी हे आंदोलन केले जात आहे. सकाळी 11 ते दुपारी 1 पर्यंत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. (Maratha Kranti Morcha Agitation In Mumbai on Maratha Reservation)

मराठा समाजातर्फे मुंबईत होणाऱ्या या आंदोलनात कोरोनासदंर्भात सर्व नियमांचे पालन केले जाणार आहे. यावेळी आंदोलनकर्ते हे तोंडाला मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझर या सर्व दक्षतेचे पालन केले जाईल, असे सांगण्यात आले आहे. मराठा आरक्षणाच्या स्थगितीविरोधात मराठा क्रांती मोर्चा निषेध नोंदवणार आहेत. मुंबई लगतच्या शहरांमध्ये एकाच वेळी ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.

“मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. आज मुंबईमध्ये सर्वत्र मराठा समाजाची आंदोलने सुरु आहेत. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आंदोलने सुरु राहतील. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दडपशाही करत आहेत असा आरोप या आंदोलकांनी केला.

सरकारनध्ये समन्वयाचा अभाव आहे. ही भूमिका संशयास्पद आहे. मराठा आता रस्त्यावर उतरला आहे. पोलीस भरती ही रद्द झालीच पाहिजे. भाजप म्हणतं की त्यांनी सुप्रीम कोर्टात टिकेल असं आरक्षण दिल होतं. मग ते सुप्रीम कोर्टात का टिकलं नाही, ही फक्त टोलवाटोलवी आहे,” अशी टीका मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विरेंद्र पवार यांनी दिली.

मुंबईतील ठिय्या आंदोलनाची ठिकाणे

 1. प्लाझा सिनेमा, दादर
 2. भारतमाता टॉकीज,लालबाग
 3. शिवाजीराजे पुतळा, पांजरपोळ,चेंबूर
 4. वरळी नाका, वरळी
 5. गिरगाव चर्च, गिरगाव
 6. कलानगर जंक्शन, वांद्रे
 7. सांताक्रुज विमानतळ, पश्चिम दृतगती मार्ग,
 8. जोगेश्वरी रेल्वे स्थानक
 9. शामनगर तलाव, जोगेश्वरी
 10. दहिसर रेल्वे स्थानक
 11. शिवाजी चौक, वडाळा
 12. संगमेश्वर मंदिर, कुर्ला
 13. साईबाबा मंदिर, मानखुर्द
 14. मराठी विद्यालय, पंतनगर, घाटकोपर
 15. गणेश मंदिर, भटवाडी, घाटकोपर
 16. शिवाजी महाराज पुतळा, कन्नमवार नगर-२, विक्रोळी
 17. आयआयटी गेट समोर,पवई
 18. शिवाजी तलाव,भांडुप

दरम्यान मुंबईतील आंदोलनानंतर उद्या 21 सप्टेंबरला सोलापुरात बंदची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज रात्री (20 सप्टेंबर) सोलापुरातील एसटीची वाहतूक बंद ठेवली जाणार आहे.

कोल्हापुरात राज्यव्यापी गोलमेज परिषदेचे

तर येत्या 23 सप्टेंबरला कोल्हापुरात राज्यव्यापी गोलमेज परिषदेचे आयोजन केले जाणार आहे. यात विविध क्षेत्रातली सर्व तज्ञ मंडळी एकत्र येतील. या परिषदेत पुढील आंदोलनाची दिशा ठरणार, राज्यभरातून मराठा संघटनांचे नेते, याचिकाकर्ते, पदाधिकारी परिषदेत सहभागी होणार आहे.

मराठा आरक्षण सुनावणी घटनापीठाकडे वर्ग

मराठा आरक्षण कायद्याला सुप्रीम कोर्टाने अंतरिम स्थगिती दिली. मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठाकडे वर्ग करण्यात आली आहे. घटनापीठाच्या सुनावणी दरम्यान महाराष्ट्रात मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करता येणार नाही. मराठा आरक्षणाअंतर्गत 2020 आणि 2021 मध्ये वैद्यकीय प्रवेश प्रकिया आणि नोकरी भरती करता येणार नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. घटनापीठाच्या अंतिम निकालानंतरच मराठा आरक्षणाच्या कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकारला करता येणार आहे. (Maratha Kranti Morcha Agitation In Mumbai on Maratha Reservation)

संंबंधित बातम्या : 

डान्सबारच्यावेळी चार वेळा अध्यादेश काढले, मग मराठा आरक्षणाच्या बाबतीत का नाही? मराठा क्रांती मोर्चाचा सवाल

संपूर्ण राज्यात एकाच दिवशी आंदोलन नाही, मराठा क्रांती मोर्चाकडून आंदोलनाच्या तारखा जाहीर

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *