AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sai Lokur | सई लोकूरचा साखरपुडा, जोडीदारासोबतचे फोटो शेअर

सईने केलेल्या इंन्स्टाग्राम पोस्टमध्ये तिच्यासोबत तिचा जोडीदारही दिसतो आहे. तिच्या जोडीदाराचं नाव तीर्थदीप रॉय आहे.

Sai Lokur | सई लोकूरचा साखरपुडा, जोडीदारासोबतचे फोटो शेअर
| Updated on: Oct 02, 2020 | 6:38 PM
Share

मुंबई : ‘मराठी बिग बॉस’ फेम सई लोकूरने तिच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे (Sai Lokur Engaged With Tirthadeep Roy). सईचा साखरपुडा  पार पडला आहे. काही दिवसांपूर्वी सईने प्रेमात पडल्याची कबुली देत सोशल मिडियावर काही फोटो शेअर केले होते. मात्र, तिचा जोडीदार पाठमोरा असल्याने, तो कोण असेल याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली होती. त्यानंतर तिने तिच्या मेहंदीचे फोटो शेअर केले. त्यामुळे सई विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, आता सईने तिच्या साखरपुड्याचे फोटो शेअर करत या सर्व चर्चांवर पूर्णविराम लावला आहे (Sai Lokur Engaged With Tirthadeep Roy).

View this post on Instagram

I love you and that’s the beginning and end of everything ❤️ @tirthadeep_roy #mydimpledguy #engaged? #oneforlife ?

A post shared by Sai Lokur (@sai.lokur) on

सईने केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये तिच्यासोबत तिचा जोडीदारही दिसतो आहे. तिच्या जोडीदाराचं नाव तीर्थदीप रॉय आहे. सईने तिच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले आणि त्याला “माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि हीच खरी सगळ्याची सुरुवात आणि शेवट आहे”, असं कॅप्शन दिलं.

सईने साखरपुड्याला पिवळ्या आणि लाल रंगाचा लेहंगा घातला होता. तसेच, तीर्थदीपनेही पिवळ्या रंगाची शेरवानी घातली आहे (Sai Lokur Engaged With Tirthadeep Roy).

बिग बॉसच्या घरात रंगीली होती सई-पुष्कर मैत्रीची चर्चा

कलर्स मराठी वाहिनीचा ‘मराठी बिग बॉस’ (Bigg Boss) हा कार्यक्रम प्रेक्षकांना चांगलाच भावला होता. मराठी बिग बॉसचे पहिले पर्व, त्यातील स्पर्धकांमुळे खूपच चर्चेत आले होते. त्यातील एक स्पर्धक अभिनेत्री सई लोकूर (Sai Lokur) हिनेदेखील या कार्यक्रमातून स्वत:चा असा एक चाहता वर्ग निर्माण केला आहे. स्पर्धेदरम्यान, ‘बिग बॉस’च्या (Bigg Boss) घरात तिची मेघा धाडे, पुष्कर जोग यांच्यासोबत असलेली मैत्री देखील चांगलीच गाजली होती. विशेषतः सई लोकूर आणि पुष्कर जोग यांच्या मैत्रीची चर्चा बिग बॉसच्या घराबाहेर देखील चांगलीच रंगली होती.

लॉकडाऊन दरम्यान चाहत्यांशी संवाद

कोरोना लॉकडाऊन दरम्यानच्या काळात सई लोकूर (Sai Lokur) तिच्या चाहत्यांशी सोशल मिडियाद्वारे संवाद साधत होती. या काळात येणार ताणताणाव, नैराश्य यातून बाहेर पडण्यासाठी ती चाहत्यांशी संवाद साधून त्यांचे मार्गदर्शन करत होती. सोशल मिडियाच्या माध्यमातूनच तिने, आपण प्रेमात पडलो असून आपल्याला आपला योग्य जोडीदार मिळाल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

कपिल शर्मासह चित्रपटात झळकली होती सई

बिग बॉसमध्ये येण्यापूर्वी सई लोकूर 2015 साली प्रदर्शित झालेल्या ‘किस किसको प्यार करु’ या हिंदी चित्रपटात देखील झळकली होती. या चित्रपटात कॉमेडी किंग कपिल शर्मा देखील होता. यात सईने कपिल शर्माच्या पत्नीची भूमिका साकारली होती (Sai Lokur Engaged With Tirthadeep Roy).

संबंधित बातम्या :

Sai Lokur | ‘मराठी बिग बॉस’ फेम सई लोकूर प्रेमात, चाहत्यांसोबत शेअर केला आनंद

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.