MG Motors च्या ‘या’ SUV ची मार्केटमध्ये धुम, तीन आठवड्यात रेकॉर्डब्रेक विक्री, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

MG Motor India ने गेल्या महिन्यात आधुनिक फिचर्स असलेली फुल साईज SUV MG Gloster लाँच केली होती.

MG Motors च्या 'या' SUV ची मार्केटमध्ये धुम, तीन आठवड्यात रेकॉर्डब्रेक विक्री, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

मुंबई : MG Motor India ने गेल्या महिन्यात आधुनिक फिचर्स असलेली फुल साईज SUV MG Gloster लाँच केली होती. नुकतेच कंपनीने जाहीर केले आहे की, अवघ्या तीन आठवड्यांमध्ये या कारचे 2000 युनिट्स बुक झाले आहेत. (MG Gloster starts strong sold out for 2020 in 3 weeks; Record-breaking sales in three weeks)

एमजी ग्लॉस्टरची किंमत

MG Motors ने Gloster सुपर, स्मार्ट, शार्प आणि सॅवी ट्रिम्समध्ये लाँच केली आहे. या एसयूव्हीमध्ये पाच व्हेरिएंट आहेत. 7 सीटर वाल्या सुपर ट्रिमची किंमत 29.98 लाख रुपये आहे, स्मार्ट ट्रिम 7 सीटर व्हेरिएंटची किंमत 30.98 लाख रुपये आहे. शार्प व्हेरिएंटची किंमत 33.69 लाख रुपये आहे. तर एमजी ग्लॉस्टर 6 सीटर शार्प व्हेरिएंटची किंमत 33.98 लाख रुपये आहे. तसेच टॉप मॉडेल MG Gloster सॅवी व्हेरिएंट 6 सीटरची किंमत 35.38 लाख रुपये आहे.

MG Gloster मध्ये दोन इंजिनांचा पर्याय

कंपनीने या एसयूव्हीमध्ये दोन इंजिनांचे पर्याय दिले आहेत. 215bhp 2.0 लीटर 4 सिलिंडर टर्बो डिझेल इंजिन आणि 161 bhp 2.0 लीटर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन अशा दोन इंजिनांसह ही एसयूव्ही लाँच करण्यात आली आहे. या कारमध्ये तुम्हाला मॅन्युअल ट्रान्समिशनचा पर्याय दिलेला नाही. तसेच ही कार 8 स्पीड ऑटोमेटिक गियरबॉक्ससह लाँच केली आहे.

MG Gloster मध्ये अॅडव्हान्स फिचर्स

या एसयूव्हीचं टॉप असलेल्या व्हेरिएंट सॅवीमध्ये अॅडव्हान्स ड्रायव्हिंग असिस्टन्स सिस्टिम (ADAS) देण्यात आली आहे. यामध्ये फॉरवर्ड कोलीसन वॉर्निंग सिस्टिम, लेन डिपार्चर वॉर्निंग, ब्लाईंड स्पॉट डिटेक्शन, ऑटो हेडलाईट्स अँड वायपर ऑन-ऑफ, ऑटोमॅटिक इमरजन्सी ब्रेकिंग, पार्क असिस्ट, अडेप्टिव क्रूज कंट्रोल यासह अनेक फिचर्स देण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या

अवघ्या नऊ महिन्यात ‘या’ SUV चे सर्व युनिट्स विकले; जाणून घ्या कारची किंमत आणि फिचर्स

जगातील पहिली Flying Car चालवण्यास परवानगी, किंमत फक्त…

Hyundai All New i20 साठी बुकिंग सुरु, ‘या’ दिवशी कार लाँच होणार, जाणून घ्या फिचर्स

(MG Gloster starts strong sold out for 2020 in 3 weeks; Record-breaking sales in three weeks)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI