काळजी करु नका, बऱ्या व्हाल, जयंत पाटलांकडून 90 वर्षीय कोरोनाबाधित आजींना धीर

जयंत पाटील यांनी सांगलीत कोरोनावर उपचार घेणाऱ्या 90 वर्षांच्या आजींना धीर दिला आहे. (Jayant Patil Visit Sangli Corona Hospital)

काळजी करु नका, बऱ्या व्हाल, जयंत पाटलांकडून 90 वर्षीय कोरोनाबाधित आजींना धीर

सांगली : “आता कसं वाटतंय…. काही काळजी करु नका… दोन-तीन दिवसात बऱ्या व्हाल…” असं म्हणत सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी 90 वर्षीय आजींना धीर दिला. नुकतंच जयंत पाटील यांनी सांगलीतील मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोविड वॉर्डची पाहणी केली. यावेळी त्यांनी कोरोनावर उपचार घेणाऱ्या 90 वर्षांच्या आजींना धीर दिला आहे. (Jayant Patil Visit Sangli Corona Hospital)

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी कोव्हिड वॉर्डाला पीपीई किट घालून भेट घेतली. यावेळी त्यांनी रुग्णांना भेट देत त्यांची विचारपूस केली. त्यांना मानसिक आधार दिला.

गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण जग कोरोनाशी झुंज देत आहे. सांगली जिल्ह्याची परिस्थितीही काही वेगळी नाही. जिल्ह्यातील माझी माणसं कोरोनाशी दोन हात करत आहे, असे जयंत पाटील यावेळी म्हणाले.

नागराळे गावच्या 90 वर्षांच्या आजी इथे उपचार घेत आहेत. आजीच्या तब्येतीत आता सुधारणा होत आहे. आजी आणि इथला प्रत्येक रुग्ण जिद्दीने कोरोनावर मात करणार याची मला खात्री आहे. हे संकट मोठे असले तरी सांगलीकर या संकटाला हरवणार याचा मला विश्वास आहे, असे जयंत पाटील यावेळी म्हणाले. (Jayant Patil Visit Sangli Corona Hospital)

दरम्यान वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे रुग्णालयाच्या विभागप्रमुखांसह बैठकही घेतली. या रुग्णालयातील सद्य परिस्थितीचा आढावा घेतला.

यावेळी जिल्ह्यातील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे. लवकरच आपण परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी ठरु. यातील प्रत्येक रुग्ण रोगावर मात करणार आणि माझे सांगलीकर या संकटाला हरवणार याची मला खात्री आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (Jayant Patil Visit Sangli Corona Hospital)

संबंधित बातम्या :

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागपूरमधील 2 पोलीस कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची आर्थिक मदत

कोरोनामुक्त झाल्यानंतर प्रणिती शिंदे पुन्हा सक्रीय, विविध विकास कामांचा शुभारंभ

Published On - 8:24 pm, Sun, 13 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI