कोरोनामुक्त झाल्यानंतर प्रणिती शिंदे पुन्हा सक्रीय, विविध विकास कामांचा शुभारंभ

कोरोनामुक्त झाल्यानंतर प्रणिती शिंदे या पुन्हा विकास कामांसाठी रुजू झाल्या आहेत. (Praniti Shinde get Back to Work After corona Free)

कोरोनामुक्त झाल्यानंतर प्रणिती शिंदे पुन्हा सक्रीय, विविध विकास कामांचा शुभारंभ
Follow us
| Updated on: Sep 12, 2020 | 11:56 PM

सोलापूर : कोरोनातून मुक्त झाल्यानंतर आमदार प्रणिती शिंदे या सोलापूर शहरात पुन्हा कामाला लागल्या आहेत.  प्रणिती शिंदे यांनी आज लक्ष्मी विष्णू मिल चाळ परिसरात विविध विकास कामांचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी कोरोनापासून घाबरुन न जाता, घरात न थांबता, हॉस्पिटलशी संपर्क करुन उपचार घेण्याचे आवाहन केलं. (Praniti Shinde get Back to Work After corona Free)

आमदार प्रणिती शिंदे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. लॉकडाऊनच्या काळात लोकांच्या संपर्कात जास्त आल्याने चाचणी केली. त्यावेळी त्यांना त्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. त्यांना कोणत्याही प्रकारची लक्षणे नव्हती. त्यांनी योग्य उपचार घेतल्यानंतर त्या कोरोनामुक्त झाल्याचं जाहीर केलं.

कोरोनामुक्त झाल्यानंतर प्रणिती शिंदे या पुन्हा विकास कामांसाठी रुजू झाल्या आहेत. प्रणिती शिंदेंनी लक्ष्मी विष्णू मिल चाळ परिसरात विविध विकास कामांचा शुभारंभ देखील केला. यावेळी लोकांनी कोरोनापासून घाबरुन जाता, घरात न थांबता हॉस्पीटलशी संपर्क करुन उपचार घेण्याचे आवाहन त्यांनी लोकांना केले.

अभिनेत्री कंगना रनौत हिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल एकेरी भाषा वापरली, तसेच सोनिया सेना असे देखील म्हटलं, याबाबत त्यांना विचारले असता, त्यांनी यावर बोलणं टाळलं.

“सोलापुरात आणि देशात या पेक्षा जास्त महत्वाचे विषय आहेत. गोरगरिबांचे अनेक प्रश्न आहेत. मला हा विषय महत्वाचा वाटत नाही. त्यामुळे या विषयावर बोलणे किंवा टिपण्णी करणे मला उचित वाटत नाही,” अशी प्रतिक्रिया आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली. मात्र विकास कामाच्या कार्य़क्रमात केंद्र सरकारवर आमदार प्रणिती शिंदे यांनी निशाणा साधला.(Praniti Shinde get Back to Work After corona Free)

संबंधित बातम्या : 

कुशल बद्रिकेने इशारा दिलेल्या ठाण्यातील ‘त्या’च जागी ट्रकने महिलेला उडवले

अब मै चल पडा मेरे राह की ओर… अलविदा…! तुकाराम मुंढेंची फेसबुक पोस्ट

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.