AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नोकरीवरुन काढल्यास तक्रारीसाठी हेल्पलाईन सुरु करा, सरनाईकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

व्यापाऱ्यांविरोधात तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक देण्याची मागणी प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे (Pratap Sarnaik demand Helpline number) केली आहे.

नोकरीवरुन काढल्यास तक्रारीसाठी हेल्पलाईन सुरु करा, सरनाईकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
| Updated on: Jun 24, 2020 | 5:24 PM
Share

ठाणे : लॉकडाऊनच्या काळात अनेक उद्योगपतींना, बिल्डरांसह इतर व्यावसायिकांना त्यांच्या कंपनीतील कामगारांना माणुसकीच्या दृष्टीने सांभाळून घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी केले होते. पण काही निगरगट व्यापाऱ्यांनी स्वतःचा स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून, वर्षानुवर्षं काम करणाऱ्यांना तडकाफडकी कामावरुन काढून टाकण्याचं पाप सुरु केलं आहे. अशा व्यापाऱ्यांविरोधात तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक देण्याची मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. (Pratap Sarnaik demand Helpline number for jobless during lockdown)

मराठी कामगारांना होणाऱ्या त्रासाबाबत खबरदारी घ्यावी, अन्यथा शिवसेनेच्या स्टाईलने आंदोलन करु असा असा इशारा आमदार प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.

प्रताप सरनाईक यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

“मुंबई महाराष्ट्राच्या जिवावर स्वतःचं बलाढ्य साम्राज्य निर्माण करायचे. मात्र कठीण काळात ज्या मराठी माणसाच्या घामाने हे सर्व वैभव उपभोगतोय, त्याला एका झटक्यात वाऱ्यावर टाकायचे अशी वृत्ती काही उद्योगपतींची झाली आहे. त्यांना वेळीच अंकुश घालणे महत्वाचे आहे. ओबेरॉय बिल्डरच्या बाबतीतही अशा अनेक तक्रारी माझ्याकडे येत आहेत. असे अनेक बिल्डर आहेत जे कुठलीही पूर्व कल्पना न देता, फोन वरून तुम्ही उद्यापासून येऊ नका असे सांगत आहेत. यामुळे मानसिक धक्का बसून अनेकजण बेजार झाल्याचे प्रताप सरनाईक यांनी निवेदनात म्हटले आहे.”

“मुलांचं शिक्षण, कर्जाचे हफ्ते, घर खर्च आणि पुढे अंधकार. यामुळे त्यांची कुटुंब जबरदस्त धक्क्यात आहेत. मराठी माणूस भावनिक व हळव्या मनाचा आहे. भविष्यात देव न करो, पण हे सर्व सहन न झाल्यामुळे नैराश्येतून आत्महत्येची पाऊल उचलली जाऊ शकतात. त्यामुळे हे थांबवणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.”

“लॉकडाऊनमुळे निश्चितच उद्योगासह सर्वच क्षेत्राला जबरदस्त आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावरही आर्थिक दडपण आहेत. ही बाब जरी सत्य असली, तरी कामगारांना कामावरुन अश्याप्रकारे काढून टाकणे हा त्यावरचा उपाय असू शकत नाही. आयुष्याची 20-25 वर्ष एखाद्या कंपनीसाठी काम करणारा कामगार नक्कीच अशा कठीण परिस्थितीत आपल्या कंपनीला होणार जबरदस्त आर्थिक नुकसान जाणतो.”

“त्यावर काही मार्ग काढण्यासाठी त्याच्याशी चर्चा करणे महत्वाचे असल्याकडे प्रताप सरनाईक यांनी लक्ष वेधले आहे. मोठ-मोठ्या संकटांचे मार्ग चर्चेतून निघू शकतात. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून तात्पुरत्या काळासाठी कमी पगारात होऊ शकत का? अथवा काही महिन्यांसाठी सामोपचाराने ब्रेक देऊ शकतो का ?? असे अनेक मार्ग आहेत. अर्थात कामगारांशी चर्चा करून आणि दोघांच्या संमतीनेच यातून मार्ग काढता येईल असेही प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.”

“मात्र नोकरी वरून काढून टाकणे हा स्थानिक मराठी माणसांवर अन्याय आहे. आपण सर्व उद्योगपतींना, बिल्डरांना, मॉल मालक, व्यावसायिक इत्यादींना मुख्यमंत्री योग्य ते निर्देश देतील याची खात्री असल्याचे प्रताप सरनाईक म्हणाले.”

“पण जर इतकं करूनही पुन्हा या सर्वांनी मराठी माणसांना नोकरीवरून काढण्याचा आणि त्यांच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला, तर या व्यापाऱ्यांची तक्रार करण्यासाठी अन्यायग्रस्तांना शासनाच्या वतीने एक हेल्पलाईन नंबर उपलब्ध व्हावा. जेणे करून या व्यापाऱ्यांवर त्या माध्यमातून कडक कारवाही होईल,” अशी मागणी प्रताप सरनाईक यांनी केली आहे. (Pratap Sarnaik demand Helpline number for jobless during lockdown)

संबंधित बातम्या : 

चार-पाच दिवसात सलूनबाबत निर्णय, मंत्री वडेट्टीवारांची माहिती, नाभिक समाजाची हायकोर्टात जाण्याची तयारी

खासदारांचं रिपोर्ट कार्ड : देशातील टॉप 5 मध्ये महाराष्ट्रातील तीन खासदार!

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.