आगामी विधानसभेचा गडी ठरला, खेळ कुस्तीचा, धडे राजकीय, धस पिता-पुत्राची कुस्ती

आमदार सुरेश धस आणि त्यांच्या मुलामध्ये कुस्तीचा डाव रंगला असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे.

आगामी विधानसभेचा गडी ठरला, खेळ कुस्तीचा, धडे राजकीय, धस पिता-पुत्राची कुस्ती
Follow us
| Updated on: Nov 02, 2020 | 6:17 PM

बीड : मुरब्बी राजकारणी म्हणून भाजप नेते सुरेश धस यांची राज्यभरात ओळख आहे. राजकारणाचा कुठला ओळंबा कधी आणि कसा फिरवायचा हे सुरेश धस यांना चांगलंच माहिती आहे. त्यानुसार सुरेश धस त्यांच्या राजकीय वाटचालीची रणनिती सगळ्या राज्यासमोर खेळले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा मुलगा जयदत्त धस यांचं वय निवडणूक लढवण्याकरिता कमी होतं. त्यामुळे त्यांना विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरता आलं नाही. मात्र 2024 च्या विधानसभा निवडणुकीचा आखाडा डोळ्यासमोर ठेऊन सुरेश अण्णांनी मुलगा जयदत्त धस यांना कुस्तीच्या फडात राजकीय डावपेचांचे धडे द्यायला सुरुवात केली आहे. धस बापलेकाचा कुस्तीचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय.

सुरेश धस आणि त्यांच्या मुलामध्ये कुस्तीचा डाव रंगला असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडीओ नेमका कधी, कुठे शूट झाला, याची माहिती नाही, मात्र सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे. मुलगा जयदत्त यांना आमदार करण्याचा चंगच धस यांनी बांधला आहे. सुरेश अण्णा आपल्या मुलासाठी दररोज दोन तास वेळ काढतात. यादरम्यान  कुस्ती असो वा त्यांची भाषणबाजी स्पर्धा असो, यांचे धडे ते मुलाला त्यांच्या स्टाईलने देत आहेत.

राज्यातील राजकीय वातावरण पाहून निर्णय घेणारा नेता म्हणून सुरेश धस यांच्याकडे पाहिले जाते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून सुरेश धस तर भाजपकडून दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे हे आमनेसामने होते. या लढतीत सुरेश धस यांचा पराभव झाला. त्यानंतर बीड जिल्हा परिषदेत त्यांनी भाजपशी सख्य साधलं. काही दिवसांनी पंकजा मुंडे यांच्याशी जवळीक साधत सुरेश धस यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला. गतवेळी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत थोड्याशा मतांनी सुरेश धस यांना पराभव स्वीकारावा लागला.

सुरेश धस 2019 च्या निवडणुकीत मुलाला आमदार करण्यासाठी कामाला लागले होते. त्यादृष्टीने त्यांनी तयार देखील केली होती. मात्र तांत्रिकदृष्ट्या अडचण असल्याने शेवटच्या काही दिवसांत त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहेब आजबे यांना पडद्यामागून मदत करुन त्यांच्या विजयात हातभार लावला, अशी चर्चा बीडच्या राजकीय वर्तुळात मोठ्या खुबीने होत असते.

दरम्यान, आगामी विधानसभेच्या निवडणुका पाहता धस कुटुंबातील एक सदस्य पुन्हा एकदा गुडघ्याला बाशिंग बांधून उभा आहे आणि त्याची तयारी हे स्वतः आमदार सुरेश धस करुन घेत आहेत. त्यामुळे जयदत्त हे सुरेश अण्णांच्या तालमीत तावून सुलाखून निघणार हे नक्की…

(MLC Suresh Dhas Plays Kusti With His Son jaydatta Dhas)

संबंधित बातम्या

राजकीय आखाड्यातील बापलेकात ‘डावपेच’, सुरेश धस यांची मुलासोबत कुस्ती

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.