अनेकांना कोरोना होऊन गेला, पण कळलंही नाही, अँटीबॉडी टेस्ट करा, मनसेची राज्य सरकारला सूचना

चेतन पाटील, Tv9 मराठी

|

Updated on: Aug 30, 2020 | 8:34 PM

राज्य सरकारने आता अँटीबॉडी टेस्टवर जास्त भर द्यावी, अशी विनंती मनसे नेते बाळा नांदगावकर (MNS Bala Nandgaonkar) यांनी ट्विटरवर केली आहे.

अनेकांना कोरोना होऊन गेला, पण कळलंही नाही, अँटीबॉडी टेस्ट करा, मनसेची राज्य सरकारला सूचना
Follow us

मुंबई : राज्य सरकारने आता अँटीबॉडी टेस्टवर जास्त भर द्यावी, अशी विनंती मनसे नेते बाळा नांदगावकर (MNS Bala Nandgaonkar) यांनी ट्विटरवर केली आहे. काही लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला. मात्र, त्यांच्यात कोणतेही लक्षणे आढळले नाहीत. त्यांच्या शरीरातील रोगप्रतिकार क्षमतेमुळे कोरोना नष्टही झाला. तरीही त्यांना याबाबत जाणवलं नाही, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्य सरकारने अँटीबॉडी टेस्ट करुन अशा लोकांवर बंधनं न ठेवता त्यांना काम करण्याची मुभा द्यावी, अशी सूचना बाळा नांदगावकर यांनी केली आहे.

“राज्य सरकारला आमची विनंती आहे की, त्यांनी आता पूर्ण राज्यात अँटीबॉडी टेस्ट करण्यावर जोर द्यावा. काही लोकांना कोरोनाची लागण होऊनसुद्धा गेली आणि ते अनेकांच्या लक्षातदेखील आलं नाही, अशी माहिती अनेक सर्वेक्षणातून समोर आली आहे. त्यामुळे अशा टेस्टद्वारे एकूण लोकसंख्येच्या किती लोकांनी कोरोनावर मात केली ते आपल्या लक्षात येईल”, असं बाळा नांदगावकर (MNS Bala Nandgaonkar) म्हणाले.

“अशा लोकांना घरात थांबण्याची काहीच आवश्यकता नाही. कारण ही लोक कोरोनाचा प्रसारदेखील करत नाहीत. त्यामुळे अशा लोकांना त्यांची कामे पूर्वीप्रमाणे करु देण्याची मुभा दिल्यास अर्थव्यवस्था रुळावर आणण्यास खूप मोठी मदत होईल”, असं बाळा नांदगावर यांनी राज्य सरकारला सूचवलं.

“खासगी लॅब चालकांना अँटीबॉडीचे दर जे सध्या जवळपास हजार रुपये आहेत ते कमी करण्याचे निर्देश दिल्यास अनेक लोक स्वतःहून ती टेस्ट करतील. त्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात पूर्वपदावर येण्यास मदत होईल”, असंदेखील बाळा नांदगावकर यावेळी म्हणाले.

हेही वाचा : Raj Thackeray | टीशर्ट-गॉगल आणि दाढी, राज ठाकरे यांचा न्यू लूक

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI