‘रेशन वेळेत न दिल्यास दुकान सील’, डोंबिवलीत आमदार रविंद्र चव्हाणांकडून झाडाझडती

सर्वसामान्य जनतेला रेशन वेळेवर दिलं नाही तर दुकान सील होईल, असा इशारा आमदार रविंद्र चव्हाण (BJP MLA Ravindra Chavan) यांनी रेशन दुकान चालवणाऱ्या महिलेला दिला.

'रेशन वेळेत न दिल्यास दुकान सील', डोंबिवलीत आमदार रविंद्र चव्हाणांकडून झाडाझडती

ठाणे : डोंबिवलीच्या ठाकूरवाडी परिसरातील एका रेशन दुकानतून धान्य वाटप योग्यप्रकारे केला जात नसल्याची तक्रार काही नागरिकांनी आमदार रविंद्र चव्हाण यांच्याकडे केली. या तक्रारीची दखत घेत रविंद्र चव्हाण संबंधित रेशन दुकानात दाखल झाले. त्यांनी रेशन दुकान चालवत असलेल्या महिलेला याबाबत जाब विचारला. सर्वसामान्य जनतेला रेशन वेळेवर दिलं नाही तर दुकान सील होईल, असा इशारा रविंद्र चव्हाण (BJP MLA Ravindra Chavan) यांनी यावेळी महिलेला दिला.

“प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेआधी गोडाऊनमधून धान्य आणायची जबाबदारी रेशन दुकानदाराची असते. तिथून वेळेवर धान्य आणून पुढच्या सहा महिन्यात सर्वसामान्य गरिब आणि मध्यमवर्गीय नागरिकांना रेशन देण्याची जबाबदारी तुमची आहे. त्यामुळे यापुढे रेशन वेळेवर न दिल्यास दुकान कायमचं सील करु”, असा इशारा आमदार रविंद्र चव्हाण यांनी दिला.

“रेशनिंग दुकानदारांनी दहा तारखेच्या आत गोडाऊनमधून धान्य उचलावं, पुढच्या सहा दिवसांमध्ये लोकांपर्यंत ते धान्य पोहोचायला हवं, असा नियम मोदी सरकार आल्यापासून लागू झाला आहे”, असं रविंद्र चव्हाण (BJP MLA Ravindra Chavan) यांनी सांगितलं.

“तुमच्याकडे धान्य नाही. ही चूक लोकांची नाही. ती तुमची जबाबदारी असते. आम्ही जर आक्रमक पवित्रा घेतला, अधिकाऱ्यांना आणूम तपासणी केली तर तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल. आपण महिला आहात. मला या सर्व गोष्टी करायच्या नाहीत. गरिब लोकांना त्यांच्या हक्काचं धान्य मिळायला हवं”, असं रविंद्र चव्हाण यांनी ठणकावून सांगितलं.

हेही वाचा : Raj Thackeray | टीशर्ट-गॉगल आणि दाढी, राज ठाकरे यांचा न्यू लूक

Published On - 7:23 pm, Sun, 30 August 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI