राज ठाकरेंचा रॉयल कारभार, सरकारने सुरक्षेत कपात करताच मनसेकडून ‘महाराष्ट्र रक्षक’ तैनात

prajwal dhage

|

Updated on: Jan 12, 2021 | 1:10 PM

राज्य सरकारने सुरक्षा व्यवस्थेत कपात केल्यानंतर आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेसा ‘महाराष्ट्र रक्षक’ करणार आहेत. मनसेचे सरचीटणीस नयन कदम यांनी खास राज ठाकरेंच्या रक्षणासाठी ही टीम तयार केली आहे. (MNS Maharashtra rakshak Raj Thackeray)

राज ठाकरेंचा रॉयल कारभार, सरकारने सुरक्षेत कपात करताच मनसेकडून ‘महाराष्ट्र रक्षक’ तैनात
राज ठाकरे यांच्या रक्षणासाठी मनसेने अशा प्रकारचे सुरक्षा रक्षक तैनात कले आहेत.

Follow us on

मुंबई : राज्य सरकारने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात केल्यानंतर आता यांची सुरक्षा ‘महाराष्ट्र रक्षक’ करणार आहेत. मनसेचे सरचीटणीस नयन कदम यांनी खास राज ठाकरेंच्या रक्षणासाठी ही टीम तयार केली आहे. मनसेचे सरचिटणीस नयन कदम यांनी ही टीम तयार केली आहे. (MNS established team Maharashtra rakshak for the protection of Raj Thackeray)

राज्य सरकारने 10 जानेवारीला राज्यातील भाजपचे बडे नेते आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेच्या कपातीचा निर्णय घेतला. या निर्णयांतर्गत राज यांची झेड (Z) दर्जाची सुरक्षा काढून त्यांना वाय (Y) दर्जाची सुरक्षा पुरवली गेली. या निर्णयामुळे राज्य सरकारवर सर्व स्तरातून टीका झाली होती. आम्हाला सरकारच्या सुरक्षेची गरज नसून राज ठाकरे यांचे रक्षण करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत, असे मनसेच्या नेत्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता मनसेचे सरचिटणीस नयन कदम यांनी राज यांच्या संरक्षणासाठी खास ‘महाराष्ट्र रक्षक’ नावाची टीम तयार केली आहे.

महाराष्ट्र रक्षक टीम काय करणार?

मनसेने तयार केलेली ही महाराष्ट्र रक्षक टीम राज यांचे संरक्षण करणार आहे. यापुढे ही टीम काळे टी-शर्ट्स घालून राज यांच्या आजूबाजूला दिसेल. राज ठाकरे ज्या-ज्या ठिकाणी जातील त्या सर्व ठिकाणी मनसेची ही महाराष्ट्र रक्षक टीम उपस्थित असेल.

आगामी महानगरपालिका आणि सध्याच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची आज महत्त्वाची बैठक आहे. राज ठाकरे हे या बैठकीला उपस्थित असतील. यावेळीसुद्धा राज यांच्या संरक्षणासाठी हे महाराष्ट्र रक्षक तैनात असतील.

कुणाकुणाच्या सुरक्षेत कपात

ठाकरे सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत कपात केलेली आहे. त्याच्या सुरक्षा ताफ्यात असलेली बुलेटप्रुफ कार काढून घेतली आहे. तसेच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप आमदार प्रसाद लाड तसेच भाजप नेते आशिष शेलार यांच्याही सुरक्षेत कपात केली आहे.

कोणत्या नेत्याच्या सुरक्षेत काय बदल?

> विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, पत्नी अमृता फडणवीस, मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची सुरक्षा महाराष्ट्र सरकारने कमी केली आहे.

> फडणवीसची सुरक्षा झेड + होती ती आता वाय + केली आहे.

> अमृता फडणवीस यांची सुरक्षा अगोदर वाय + ती आता एक्स केली आहे.

> देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यात यानंतर बुलेटप्रूफ कार नाही.

> राज ठाकरे यांच्याकडे पूर्वी झेड सुरक्षा होती. जी आता Y + करण्यात आली आहे.

> रामदास आठवलेंची वाय + सुरक्षा आत्ता विना एस्कॉर्टशिवाय असेल.

> भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि खासदार नारायण राणे यांच्याकडे वाय + सुरक्षा होती जी आता रद्द करण्यात आली आहे.

भाजप नेते आशिष शेलार यांना वाय + सुरक्षा होती. ती आता वाय करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

राज ठाकरेंचे चाहते हेच त्यांचं कवच, सरकारने डोकं ठिकाणावर ठेवावं, सुरक्षा कपातीवर रुपाली पाटील भडकल्या

राणेंची सुरक्षा काढली, मग वैभव नाईकांना सुरक्षा कशी, कोकणात जाऊन शेलारांचा ठाकरेंना सवाल

राज ठाकरेंची मुंबईत मनसेच्या नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक; आगामी निवडणुकांसाठी काय आदेश देणार?

(MNS established team Maharashtra rakshak for the protection of Raj Thackeray)

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI