घरी ये राजा, तुला आयुष्यभर खाऊ घालेन, ‘कोरोना’च्या भीतीने पुण्यातील लेकाला माऊलीची आर्त हाक

“माझ्या राजा तू आताच्या आता पुण्यातून गावाकडं ये, मी तुझ्या पाया पडते", अशी विनवणी ही माऊली तिच्या मुलाकडे करत आहे.

घरी ये राजा, तुला आयुष्यभर खाऊ घालेन, 'कोरोना'च्या भीतीने पुण्यातील लेकाला माऊलीची आर्त हाक
प्रातिनिधिक फोटो

पुणे : जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ (Mother Call Son) घातला आहे. या आजारामुळे चीनमध्ये तब्बल साडे तीन हजार जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, जगभरात दीड लाखापेक्षा जास्त लोकांना या आजाराची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. मात्र, हा जीवघेणा कोरोना विषाणू आता महाराष्ट्रातही येऊन धडकला आहे. पुण्यात पुण्यात कोरोनाचे पाच रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे (Mother Call Son) संपूर्ण पुण्यात खळबळ उडाली आहे.

कोरोना विषाणूने  (Corona Virus In Maharashtra) अनेकांची तहान भूक पळवली आहे. अशातच पुण्यात शिक्षण घेणाऱ्या एका मुलाला त्याच्या आईने गावाकडून केलेला एक फोनकॉल चांगलाच व्हायरल होत आहे. “माझ्या राजा तू आताच्या आता पुण्यातून गावाकडं ये, मी तुझ्या पाया पडते”, अशी विनवणी ही माऊली तिच्या मुलाकडे करत आहे. डोळ्यात पाणी आणणारा हा फोनकॉल सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हेही वाचा : Corona Virus | महाराष्ट्रातही कोरोनाचा शिरकाव, कोरोनाला रोखण्यासाठी 10 सोपे उपाय

काय म्हणते ती ‘आई’?

मुलगा : हेलो मम्मी!

आई : हा! तू आताच्या आता गावाकडे परत ये आणि हे सर्व संपलं की मग जा परत माघारी

मुलगा : ठीक आहे…, तू ते टीव्हीमध्ये बघितलं व्हयं?

आई : हो! टीव्हीला देतयं की, टीव्हीला सांगतयं की…, माणसं मारुन टाकतिया…, झाला आहे रोग त्याचा इलाजही नाही, त्याचा उपचारसुद्धा नाही….

मुलगा : बरं… बरं…, बघू मग

आई : नको बाबा! येरं राजा घरी…, ये मी तुला (Mother Call Son) आयुष्यभर करुन घालती घरी बसून…

मुलगा : बरं… बरं…

आई : तू निघ आता…, नाश्ता केला की निघ बाबा…

मुलगा : हो…

आई : आणि इथं घरी झोपून खा, मी तुला एक शब्दसुद्धा बोलत नाही…, मी करुन घालती तुला रोज…

मुलगा : बरं… बरं…

आई : निघायचं बघ लवकर…, तोंडाला रुमाल बांधून बाहेर पड…

मुलगा : अग मम्मी…, तुझं बरोबर आहे. पण, आपल्याला पोरी कोण द्यायचं लग्नाला बसून राहिल्यावर…

आई : बघू…, हे एवढे एक दोन महिने जाऊ दे…, मग जा परत हे संपलं म्हणजे…, डोस देऊन मारतात ती माणसं, असं टीव्हीला दावतियां…. तू निघायचं बघ… आपल्याला नाही राहायचं तिथं, महिन्या दोन महिन्यांनी या रोगाचा निदान झाल्यावर मग परत आणिक जा तू…. तू लगेच निघ आता, तोंडाला रुमाल बांधून यं…

मुलगा : हा…

आई : कपडे घेऊन ये आणि आला की घरात कपडे नेऊ नको…, टाकीपाशी ठेव, मी उद्या त्याला चांगलं धुवीन औषधी घालून….

मुलगा : बरं… बरं…

आई : हा…, तू आल्याशिवाय मी जेवणार पण नाही आणि पाणीसुद्धा पेणार नाही…

मुलगा : नाही नाही…, येतो मी आज

आई : ठेऊ (Mother Call Son) का मग…?

मुलगा : हा… हा..

संबंधित बातम्या :

Pune corona case | दाम्पत्याला कोरोना, एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह, पुण्यात 200 खाटांचे रुग्णालय सज्ज

पुण्यातील दोघांना कोरोनाची लागण, तातडीने उपचार सुरु

Corona in Pune | पुण्यात गर्दीचे कार्यक्रम रद्द, अनेक शाळा बंद, रुग्णालयंही सज्ज

पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या 5 वर, दाम्पत्याच्या मुलीसोबत चालक आणि नातेवाईकालाही संसर्ग

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI