AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sushant Singh Rajput | ‘काहीतरी विपरीत घडण्याचा अंदाज आला होता’, सुशांतच्या आत्महत्येनंतर मुकेश भट्ट यांची प्रतिक्रिया

'काहीतरी विपरीत घडणार आहे याचा अंदाज मला आला होता', अशी प्रतिक्रिया निर्माते मुकेश भट्ट यांनी दिली आहे.

Sushant Singh Rajput | 'काहीतरी विपरीत घडण्याचा अंदाज आला होता', सुशांतच्या आत्महत्येनंतर मुकेश भट्ट यांची प्रतिक्रिया
| Updated on: Jun 14, 2020 | 6:51 PM
Share

Sushant Singh Rajput Suicide मुंबई : अभिनेता इरफान खान आणि ऋषी कपूरनंतर (Mukesh Bhatt On Sushant Singh Rajput) आता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या बातमीने अवघं बॉलिवूड हादरलं आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या करत स्वत:चं जीवन संपवलं. सुशांतने वांद्र्याच्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. मात्र, ‘काहीतरी विपरीत घडणार आहे याचा अंदाज मला आला होता’, अशी प्रतिक्रिया निर्माते मुकेश भट्ट यांनी दिली आहे (Mukesh Bhatt On Sushant Singh Rajput).

मुकेश भट्ट यांनी सुशांतच्या आत्महत्येवर एका वृत्त वाहिनीशी बोलताना ही माहिती दिली. “मला याचा अंदाज आला होता. मी त्याच्याशी बोललोही होतो. तेव्हाच मला वाटलं होतं की, त्याच्यासोबत काहीतरी चुकीचं होत आहे. आम्ही ‘सडक 2’ मध्ये सोबत काम करण्याची योजना आखत होतो”, असं मुकेश भट्ट यांनी म्हटलं.

दिग्दर्शक महेश भट्ट यांचा सुपरहिट सिनेमा ‘सड़क’चा रिमेक येणार आहे. यामध्ये अभिनेत्री आलिया भट्ट, कुणाल रॉय कपूर, संजय दत्त आणि पूजा भट्टही दिसणार आहे.

सुशांतच्या आत्महत्येची बातमी कळताच बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला. अक्षय कुमार, कियारा आडवाणी, करण जोहर, एकता कपूर, दिशा पाटणी, अजय देवगन सारख्या कलाकारांनी सुशांतच्या निधनावर शोक व्यक्त केला. अवघ्या 34 व्या वर्षी सुशांतने या जगातून अचानक एक्झिट घेतल्याने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे (Mukesh Bhatt On Sushant Singh Rajput).

सुशात सिंह राजपूतची आत्महत्या

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी आत्महत्या करुन स्वत:चं जीवन संपवलं. सुशांतने वांद्र्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येमागील कारण सध्या अस्पष्ट आहे. प्राथमिक माहितीनुसार, सुशांतने गळफास घेत आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. फोटोतही त्याच्या गळावरील व्रण दिसत आहेत. त्याच्या आसपासच्या लोकांची , मित्रांची पोलिसांनी चौकशी केली, प्राथमिक चौकशीत तणावाखाली येऊन त्याने आत्महत्या केल्याचं समोर आलं. मानसिक तणाव हे कारण समोर असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. कुठल्याही प्रकारची सुसाईड नोट अद्याप पोलिसांना सापडलेली नाही.

Mukesh Bhatt On Sushant Singh Rajput

संबंधित बातम्या :

Sushant Singh Rajput | गळ्यावर दोरीचा व्रण, सुसाईड नोट नाही, सुशांतच्या आत्महत्येचं प्राथमिक कारण पोलिसांनी सांगितलं!

सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर अंकिता लोखंडेला धक्का, दुसऱ्या क्षणी फोन ठेवला

Sushant Singh Rajput Chhichhore | शेवटच्या सिनेमात आत्महत्या न करण्याचा मंत्र, आठ महिन्यांनी स्वत:चं जीवन संपवलं

Sushant Singh Rajput | अंधुक भूतकाळ अश्रूवाटे ओघळतोय, आईच्या आठवणीतील सुशांतची अखेरची पोस्ट

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.