लॉकडाऊनमध्ये मुंबईहून कंटेनरने प्रवास, कोल्हापुरात तरुणापाठोपाठ महिलेलाही ‘कोरोना’

कोल्हापुरात पहिल्यांदाच सलग दोन दिवस 'कोरोना' पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील 'कोरोना'बाधित रुग्णांची संख्या सहावर पोहोचली आहे. (Mumbai Kolhapur Container Travel Lady Corona)

लॉकडाऊनमध्ये मुंबईहून कंटेनरने प्रवास, कोल्हापुरात तरुणापाठोपाठ महिलेलाही 'कोरोना'
अनिश बेंद्रे

|

Apr 20, 2020 | 11:15 AM

कोल्हापूर : लॉकडाऊन असताना मुंबईहून कोल्हापूरला कंटेनरने लपतछपत प्रवास करणं दोघांना महागात पडलं आहे. तरुणानंतर आता कोल्हापूरला आलेल्या महिलेचे ‘कोरोना’ रिपोर्टही पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे कोल्हापूरमधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सहावर गेली आहे. (Mumbai Kolhapur Container Travel Lady Corona)

लॉकडाऊनच्या काळात कंटेनरमध्ये लपून मुंबईहून कोल्हापूरला आलेल्या एका कामगाराला ‘कोरोना’ची लागण झाल्याचं कालच समोर आलं होतं. आता, याच कंटेनरमधून प्रवास केलेल्या 42 वर्षीय महिलेचे रिपोर्टही पॉझिटिव्ह आले आहेत.

कोल्हापुरात पहिल्यांदाच सलग दोन दिवस ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ‘कोरोना’बाधित रुग्णांची संख्या सहावर पोहोचली आहे.

इचलकरंजीमध्ये ‘कोरोना’चा शिरकाव

दरम्यान, हातकणंगले तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे. कोले मळा परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने इचलकरंजी शहरामध्ये ‘कोरोना’चा शिरकाव झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

हेही वाचा | होम क्वारंटाईनचा शिक्का घेऊन अंबाबाईच्या दर्शनाला, कोल्हापूरच्या दीडशहाण्यावर गुन्हा

कोले मळा परिसर पालिका प्रशासनाने सील केला असून रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. रुग्ण आढळल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा, पोलीस, पालिका प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. (Mumbai Kolhapur Container Travel Lady Corona)

याआधी, कोल्हापूर जिल्ह्यातील पहिले दोन कोरोनाबाधित रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. भाऊ-बहीण असलेल्या या रुग्णांवर अथायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते. या दोघांचेही दुसरे तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना दोन दिवसांपूर्वी डिस्चार्ज देण्यात आला.

हेही वाचा | Lockdown : अखेर ऊसतोड कामगार त्यांच्या गावी रवाना होणार!

हॉस्पिटल प्रशासनाकडून टाळ्या वाजवत तसेच फुलांचा वर्षाव करत त्यांना निरोप देण्यात आला. तर जिल्हा प्रशासनाकडून दोघांनाही तुळशीचं रोप देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. परंतु पुन्हा रुग्ण वाढल्याने प्रशासनाची धाकधूक वाढली आहे.

(Mumbai Kolhapur Container Travel Lady Corona)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें