मुंबई ते पारनेर लपून प्रवास, मृत्यूनंतर जावयाचा ‘कोरोना’ उघड, दोनशे जण क्वारंटाईन

अहमदनगरमधील एका गावात कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. लपून-छपून आलेल्या मुंबईच्या अतिउत्साही जावयाने साऱ्या गावाला भेट दिल्याचं समोर आलं आहे (Mumbai man travels to Ahmednagar Corona Report post his death turned to be Positive)

मुंबई ते पारनेर लपून प्रवास, मृत्यूनंतर जावयाचा 'कोरोना' उघड, दोनशे जण क्वारंटाईन
Follow us
| Updated on: May 15, 2020 | 1:06 PM

पुणे/अहमदनगर : लॉकडाऊन मोडत मुंबईहून लपून-छपून आलेल्या अतिउत्साही जावयाने अहमदनगरमधील पारनेर तालुक्याची झोप उडवली आहे. जावयाला ‘कोरोना’ झाल्याचं मृत्यूनंतर उघड झाल्याने दोनशे जणांवर क्वारंटाईन होण्याची वेळ आली आहे. (Son in Law of Parner travels to Ahmednagar from Mumbai Corona Report post his death turned to be Positive)

कोरोना व्हायरसच्या रुग्णांची आणि मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काही जण बरे होत आहेत, तर काही जणांना प्राण गमवावे लागत आहेत. मात्र अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास नागरिकांची हलगर्जी कारणीभूत ठरत आहे. या कोरोनाचा कशा पद्धतीने प्रसार आणि प्रादुर्भाव होत आहे, याबाबत पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी वास्तव समोर आणलं.

एका कोरोनाबाधित रुग्णमुळे किती नागरिकांना प्रादुर्भाव होऊ शकतो, याबत आपण अंदाजही बांधू शकत नाही. राज्यातच अशा प्रकारची अनेक उदाहरणं पाहायला मिळाली आहेत. नुकतच याचा प्रत्यय अहमदनगरमधील पारनेरच्या नागरिकांना येत आहे.

पारनेरच्या पिंपरी जलसेन या गावात एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. लपून-छपून आलेल्या मुंबईच्या अतिउत्साही जावयाने साऱ्या गावाला भेट दिली. या जावयाने मुंबईतील घाटकोपर ते पारनेर असा प्रवास केला होता. त्यानंतर सासुरवाडीला म्हणजे पिंपरी जलसेनपर्यंत जाऊन त्याने नातेवाईकांच्या भेटीगाठी घेतल्या.

हेही वाचा : सांगलीत अंत्यसंस्कार झालेली ‘ती’ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह नव्हती, सायन रुग्णालयाने अहवाल बदलला

मृत्यूनंतर जावयाला ‘कोरोना’ असल्याचं समजलं. त्यामुळे पारनेर तालुक्याची पाचावर धारण बसली. मृत जावयाच्या थेट संपर्कात आलेले आणि संपर्कात आलेल्यांच्या संपर्कातील किंवा माहितीतील किमान 200 जण संशयित रुग्ण झाले आहेत. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात घरात बसण्यात शहाणपण आहे आणि कोरोनापासून बचावाचा सर्वोत्तम मार्गही, हे पुन्हा सिद्ध झालं.

(Son in Law of Parner travels to Ahmednagar from Mumbai Corona Report post his death turned to be Positive)

Non Stop LIVE Update
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.