AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सावधान! मुंबईकरांच्या जीवाशी खेळ, N95 बनावट मास्कच्या कारखान्याचा पर्दाफाश

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतर्फे असाच एक मोठा घोटाळा उघडकीस आणला गेला आहे. ज्यामध्ये बनावट N95 मास्कचा कारखानाच बांधला गेल्याचं सांगण्यात आलं आहे.

सावधान! मुंबईकरांच्या जीवाशी खेळ, N95 बनावट मास्कच्या कारखान्याचा पर्दाफाश
| Edited By: | Updated on: Oct 31, 2020 | 5:52 PM
Share

मुंबई : जगभरात सध्या करोना या जीवघेण्या संसर्गापासून रक्षण करण्यासाठी मास्क हा अतिशय महत्वाचा उपाय आहे. त्यात सरकार मान्य N95 मास्कचा वापर चांगला आणि सुरक्षित आहे. मात्र, बाजारात बनावट N95 मास्क वापरला जात असल्याचं समोर आलं आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतर्फे असाच एक मोठा घोटाळा उघडकीस आणला गेला आहे. ज्यामध्ये बनावट N95 मास्कचा कारखानाच बांधला गेल्याचं सांगण्यात आलं आहे. (Mumbai police crackdown on fake N95 mask factory)

बनावट फेस मास्क प्रकरणी मुंबई पोलिसांनी सफदर हुसेन याला मुंबईतून तर मोहम्मद सोहेल याला उत्तर प्रदेश राज्यातील गाझीयाबाद इथून अटक केली आहे. तर N95 हे V-4400, NIOSH, TC-84A- 8126, N95 vlk VENUS या कंपण्यांचे बनावट लोगो, बनावट मास्क, मास्क करता लागणारे प्लास्टिक आणि काही कागदपत्र पोलिसांनी जप्त करून बनावट मास्क बनवणारा कारखाना सील केला आहे.

पूर्व लोअर परळ भागात विनससारख्या प्रतिष्ठित कंपण्यांचे बनावट फेस मास्क विकले जात आहेत. तसंच याच भागात या प्रतिष्ठित कंपण्याच्या फेस मास्कचा मोठा साठादेखील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर सापळा रचून पोलिसांनी कारखान्यावर छाप टाकला आणि बनवाट मास्क तयार करणाऱ्या कंपन्यांचा पर्दाफाश केला.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश इथून अटक केलेला मोहम्मद सोहेल हा या बोगस मास्क रॅकेटचा मुख्यसुत्रधार आहे. ज्याचा शोध मुंबई पोलीस अनेक महिन्यांपासून घेत होते. तर देशभरातील अनेक मोठं मोठे मास्क डिलर आणि मेडिकल विक्रेते हे सोहेलच्या संपर्कात असल्याचंही पोलीस चौकशीत समोर आलं आहे. त्यांचीही चौकशी होणार असल्याची माहिती मुंबई पोलीस डीसीपी पीआरओ चैतन्य एस यांनी दिली आहे.

खरंतर, देशातच नव्हे तर जगभरात कोरोनानाने थैमान घातलं आहे. कोरोना सारख्या महामारीपासुन वाचण्याकरता तुम्ही दुकानात जाऊन चांगल्या क्वालिटीचा मास्क घेता. खासकरून अशा काही नामचीन मास्क बनवणाऱ्या कंपन्या आहेत ज्यांचे मास्क तुम्ही डोळे झाकून घेता. पण आता अशा बड्या कंपण्याचे बनावट मास्कच बाजारात येवू लागले आहेत. ज्यामुळे तुमचे आर्थिक नुकसान तर होतंच आहे पण करोनापासून तुमचा बचाव देखील होणं अवघड आहे.

इतर बातम्या – 

कोरोना, परतीच्या पावसानंतर शेतकऱ्यांवर आणखी एक संकट, उभं पिक दिलं पेटवून

US Election 2020: ट्रम्प यांचा जय-पराजय सोन्याच्या किमतीवर अवलंबून?, दिवाळीत 3 ते 6 टक्क्यांनी वाढेल सोनं?

(Mumbai police crackdown on fake N95 mask factory)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.