हायवेवर बाईकवरुन रिक्षाचा पाठलाग, महिलांना लुटणारी टोळी जेरबंद

मुंबई: पश्चिम दुतग्रती मार्ग अर्थात वेस्टर्न एक्स्प्रेस वेवर धावत्या रिक्षातून महिला प्रवाशांची बॅग आणि सोनसाखळीवर डल्ला मारणारी टोळी जेरबंद झाली आहे. खेरवाडी पोलिसांनी मोठ्या शिताफीने या टोळीला बेड्या ठोकल्या. हे चोरटे रिक्षामधून प्रवास करणाऱ्या महिलांना सावज करत. धावत्या रिक्षात हात घालून त्यांची बॅग आणि सोनसाखळी चोरुन मोटर सायकलवरुन क्षणार्धात नाहीसे होत. या वाढत्या घटनांनी पोलीस […]

हायवेवर बाईकवरुन रिक्षाचा पाठलाग, महिलांना लुटणारी टोळी जेरबंद
सचिन पाटील

|

Jul 05, 2019 | 4:44 PM

मुंबई: पश्चिम दुतग्रती मार्ग अर्थात वेस्टर्न एक्स्प्रेस वेवर धावत्या रिक्षातून महिला प्रवाशांची बॅग आणि सोनसाखळीवर डल्ला मारणारी टोळी जेरबंद झाली आहे. खेरवाडी पोलिसांनी मोठ्या शिताफीने या टोळीला बेड्या ठोकल्या. हे चोरटे रिक्षामधून प्रवास करणाऱ्या महिलांना सावज करत. धावत्या रिक्षात हात घालून त्यांची बॅग आणि सोनसाखळी चोरुन मोटर सायकलवरुन क्षणार्धात नाहीसे होत. या वाढत्या घटनांनी पोलीस बेजार झाले होते. अखेर सातत्याने आणि तांत्रिक तपास करुन खेरवाडी पोलिसांनी या चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या.

आशिष वझुलाल मावदिया असं या टोळीच्या म्होरक्याचं नाव आहे. आशिष आणि त्याचा साथीदार दुतग्रती मार्गावर सुझुकी कंपनीच्या नवीन अतिवेगवान मोटरसायकलवरुन रिक्षाचा पाठलाग करत. रिक्षामधून प्रवास करणारी कुठली महिला दिसली, तर तिचा पाठलाग करुन, मोबाईल,बॅग किंवा सोनसाखळी खेचून पळून जात.

हायवेवर वाढलेल्या गुन्ह्यांमुळे पोलिसांची झोप उडाली होती. पोलिसांनी प्रत्येक फिर्यादीवरून माहिती काढली आणि सापळा रचला. आरोपी हे पोलिसांच्या जाळ्यात फसत गेले. या आरोपींकडून पोलिसांनी एकूण 27 मोबाईल हस्तगत केले आहेत.  आरोपींनी 7 गुन्ह्यांची कबुली दिली. या गँगमध्ये आणखी काहींचा समावेश असण्याचा संशय पोलिसांना आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें