नागपुरात काँग्रेसला सुरुंग, दुष्यंत चतुर्वेदींच्या नेतृत्वात पदाधिकारी शिवसेनेत

आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या मदतीने या काँग्रेस कार्यकर्त्यांनी भगवा झेंडा हाती घेतला आहे. (Nagpur Congress Activist Join ShivSena) 

नागपुरात काँग्रेसला सुरुंग, दुष्यंत चतुर्वेदींच्या नेतृत्वात पदाधिकारी शिवसेनेत

नागपूर : नागपूर महापालिकेच्या राजकारणात सध्या काँग्रेस आणि भाजप हेच दोन प्रमुख पक्ष आहे. पण नागपुरात शिवसेना महाविकासआघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसला सुरुंग लावत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. नुकताच नागपुरातील शहर काँग्रेस कमिटीचे महासचिव अंगद हिंदोरे यांच्यासह 50 ते 60 कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या नेतृत्वात या काँग्रेस कार्यकर्त्यांनी भगवा झेंडा हाती घेतला आहे. (Nagpur Congress Activist Join ShivSena)

आगामी नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना पक्षबांधणीसाठी जोरात प्रयत्न करत आहे. त्याचाच भाग म्हणून शिवसेनेनं काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांना आपल्या गळाला लावलं आहे. पण यामुळे नागपुरात शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वादाची ठिंणगी पेटण्याची शक्यता वर्तवली जातं आहे.

काही दिवसांपूर्वी पारनेरच्या पाच शिवसेनेच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे सेनेत नाराजीनाट्य रंगलं होतं. महाविकासआघाडीतील या दोन्ही पक्षात यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे शेवटी त्या नगरसेवकांना शिवसेनेत परत जावं लागलं होतं.

त्यानंतर आता राज्याच्या उपराजधानीत शिवसेना काँग्रेसला सुरुंग लावत असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्येही नाराजीचा सूर उमटण्याची शक्यता वर्तवली जातं आहे.(Nagpur Congress Activist Join ShivSena)

संबंधित बातम्या : 

पारनेर नगरसेवकांचे नाराजीनाट्य सुरुच, माजी आमदाराची शिवसेनेतून हकालपट्टी करा, उद्धव ठाकरेंना पत्र

शिवबंधन-घड्याळ-शिवबंधन, चार दिवसात पारनेरच्या पाच नगरसेवकांबाबत काय-काय घडले?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI