पारनेर नगरसेवकांचे नाराजीनाट्य सुरुच, माजी आमदाराची शिवसेनेतून हकालपट्टी करा, उद्धव ठाकरेंना पत्र

माजी आमदार विजय औटी यांची पक्षातून हकालपट्टी करुन निष्ठावान शिवसैनिकाकडे धुरा सोपवावी, असे पत्र पारनेरच्या नगरसेवकांनी लिहिले आहे.

पारनेर नगरसेवकांचे नाराजीनाट्य सुरुच, माजी आमदाराची शिवसेनेतून हकालपट्टी करा, उद्धव ठाकरेंना पत्र

अहमदनगर : अहमदनगरमधील पारनेरच्या नगरसेवकांची नाराजी काही केल्या संपताना दिसत नाही. शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी करणारे पत्र नगरसेवकांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. (Parner Corporators writes to CM Uddhav Thackeray asks Expulsion of Ex MLA Vijay Auti from Shivsena)

“माजी आमदार विजय औटी यांच्यामुळे पक्ष संपण्याची चिन्हं आहेत. त्यांची पक्षातून हकालपट्टी करुन निष्ठावान शिवसैनिकाकडे धुरा सोपवावी, अन्यथा तालुक्यात एकही शिवसैनिक शिल्लक राहणार नाही.” असे पत्र नगरसेवकांनी लिहिले आहे.

काय आहे पत्र?

“आम्ही पारनेर नगरपंचायतमधील शिवसनेचे नगरसेवक आपल्या निदर्शनास काही गोष्टी आणून देऊ इच्छितो. विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नीलेश लंके हे आमदार म्हणून विजयी झाले. शिवसेनेचे उमेदवार विजय औटी यांचा 60 हजार मतांनी पराभव झाला. नगरपंचायतीच्या कारभाराबाबत औटी यांनी नेहमीच स्वयंकेंद्रीत राजकारण केल्यामुळे गेल्या साडेचार वर्षात शहरात काहीही विकास होऊ शकला नाही.

नगर पंचायत स्थापन झाल्यानंतर अडीच वर्षे शिवसेनेच्या ताब्यात सत्त्ता होती. नगरविकास खात्याकडे मोठा निधी असूनही औटी यांनी नगरपंचायतीस जाणीवपूर्वक निधी उपलब्ध करुन दिला नाही. अडीच वर्षांनंतर नगराध्यक्ष निवडीच्या वेळी काही नगरसेवक नाराज होते. त्याची कल्पना आ. औटी यांना होती. तरीही औटी यांनी त्या नगरसेवकांना रोखले नाही. परिणामी नगरपंचायतीची सत्ता शिवसेनेच्या हातून गेली.

औटी हे पराभूत झाल्यानंतर त्यांनी नगरसेवकांना वाऱ्यावर सोडून दिले. शिवसेनेच्या उमेदवाराचा ज्यांनी पराभूत केले त्यांच्याशी हातमिळवणी करुन शिवसेनेच्या नगरसेवकांना अडचणीत आणण्याचा त्यांनी वारंवार प्रयत्न केला.

हेही वाचा : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, नंतर समजलं ते शिवसेनेचे : अजित पवार

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर औटी यांनी घरात बसून राहणे पसंत केले. त्याविरुद्ध आमदार नीलेश लंके यांनी आमच्यापर्यंत किरणा मालाचे किट पोहचवून ते गोरगरीब जनतेपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला. आमच्या प्रभागातील नागरीकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्हाला विविध योजना राबवणे क्रमप्राप्त होते. औटी यांच्याकडून मात्र आम्हाला अजिबात प्रतिसाद मिळाला नाही. अखेर आम्ही आमदार नीलेश लंके यांच्याशी संपर्क केला असता विकासासाठी नगरविकास खात्यातून हवा तेवढा निधी उपलब्ध करुन देण्याचे त्यांनी अभिवचन दिले.

आम्ही विजय औटी यांच्या नेतृत्वास कंटाळलो असून अम्हाला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश द्या, अशी विनंती त्यांना केली. आपले आघाडीचे सरकार असल्याने पक्षप्रवेश करणे बरोबर नसल्याचे आमदार लंके यांनी सांगितले. तरीही आघाडीतील पक्षाचे नगरसेवक म्हणून मदत करण्याचे त्यांनी मान्य केले होते.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

औटी यांच्याकडून मदत होत नसल्याने आम्हाला पक्षातून बाहेर पडायचे आहे, राष्ट्रवादीने प्रवेश दिला नाही तर आम्ही भाजपमध्ये प्रवेश करु, अशी भूमिका मांडल्यानंतर लंके यांनी अजितदादा पवार यांच्याशी संपर्क साधला. आम्हाला प्रवेश देणार नसाल तर आम्ही भाजपमध्ये प्रवेश करतो, असे सांगितल्यानंतर अजितदादा यांनी पक्ष प्रवेशास मान्यता दिली.

पारनेरचे पहिले आमदार कम्युनिष्ट पक्षाचे कै. भास्कराव औटी यांचे विजय औटी हे चिरंजीव. त्यामुळे त्यांची विचारसरणीही आजही कम्युनिष्टच आहे. 1985 मध्ये औटी यांनी समाजवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली, त्यात ते पराभूत झाले. पुढे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राजकरण करताना त्यांनी नेहमीच शिवसैनिकांना शिव्यांच्या लाखोल्या वाहिल्या.

काँग्रेसकडून विधानसभेची उमेदवारी मिळणे दुरापास्त असल्याने औटी यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी 2004 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. शिवसैनिकांच्या जीवावर औटी विजयी झाले व त्यानंतर त्यांनी शिवसैनिकांना पुन्हा विचारलेच नाही. काही काम घेऊन गेलेल्या शिवसैनिकांना त्यांनी नेहमीच अपमानित केले. त्याउलट खुशमस्करी करणाऱ्या, शिवसेनेशी निष्ठा नसणाऱ्याना त्यांनी नेहमीच सन्मान दिला, पदे दिली. कम्युनिष्ट, काँग्रेस विचारसरणीला पाठबळ दिले. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीत कम्युनिष्ट, काँग्रेस उमेदवारांना उमेदवाऱ्या दिल्या. शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडून दिले.

2004 मध्ये शिवसेनेचा आमदार झाला. तेव्हापासून आजपर्यंत औटी यांनी शिवसेनेची एकही शाखा उघडू दिली नाही. तालुकाप्रमुख नीलेश लंके यांनी शाखा सुरु करण्याची भूमिका घेतल्यावर त्यांनाही अपमानित करण्यात आले. शिवसेना पक्ष वाढवण्याऐवजी स्वतःच्या नातेवाईकांना बळ देण्यासाठी इतर पक्ष जिवंत कसे राहतील याची त्यांनी जाणीवपूर्वक काळजी घेतली.

शिवसैनिकांचे श्रद्धास्थान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी कधीही उपक्रम राबवले नाहीत. पक्षाची सत्ता आल्यावर, मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे यांची निवड झाल्यानंतर औटी यांनी अभिनंदनाचा एकही फलक लावला नाही. पक्षाचे मुखपत्र सामनाचे प्रतिनिधी जाहिराती मागण्यासाठी आले असता अंकाचा खप किती याची विचारणा करुन कार्यालयातून अपमानित करुन हाकलून देण्याच्या घटनाही घडल्या आहेत.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अस्थी तालुक्यात आल्या असता विजय औटी हे दर्शनालाही आले नाहीत. अस्थींची मिरवणूक काढून सत्ता मिळत नसते अशी दर्पोक्ती करुन सच्च्या शिवसैनिकांना अपमानित केले. गेल्या विधानसभेत उद्धव ठाकरे यांनी विजय औटी यांनी विधानसभेचे उपाध्यक्षपद दिले. पक्षाचा आमदार विधानसभेच्या मोठ्या पदावर बसलेला असताना औटी यांनी शिवसैनिकांना विधीमंडळात फिरकूही दिले नाही. विधानसभेचे कामकाज कसे चालते हे पाहण्यासाठी कार्यकर्त्यांनी मुंबई येथे येण्याची इच्छा प्रकट केल्यावर अपमानित करण्यात आले. मुंबईत कामानिमित्त गेलेल्या नागरिकांना राहण्यासाठी आमदार निवासातील खोलीही कधी दिली नाही. पक्षाचे संपर्कप्रमुख, जिल्हा प्रमुख यांना औटी यांनी तालुक्यात येऊ दिले नाही. ते अपघाताने आलेच तर इतर पदाधिकारी तसेच शिवसैनिकानी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना अपमानित करण्यात आले. पक्षाचे तालुक्यातील तसेच उपजिल्हाप्रमुख पदे स्वतःच्या पतसंस्थेच्या संचालकांनाच देण्यात आले.

औटी हे संघटना स्वतःच्या आखत्यारित राहण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील होते. शाखा सुरु करण्यास औटी हे विरोध करत असल्याने तालुकाप्रमुख नीलेश लंके यांनी मात्र तालुक्यात शिवसैनिकांचे संघटन टिकवून ठेवले. औटी हे शिवसैनिकांना झिडकारत असताना नीलेश लंके यांनी शिवसैनिकांच्या प्रत्येक अडचणीस धावून जात मदत केली. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूकीतही उमेदवार निवडून आणण्यासाठी नीलेश लंके यांनीच जिवाचे रान केले. त्याउलट नीलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके या सुपे गटात पराभूत करण्यासाठी विजय औटी व त्यांचे चिरंजीव अनिकेत यांनी विरोधी उमेदवारांशी संधान साधले. जिल्हा नियोजन मंडळाच्या निवडणुकीत पुरेसे संख्याबळ नसतानाही शिवसेनेच्या एकमेव उमेदवार राणी लंके सर्वाधिक मतांनी विजयी झाल्या. परंतु तेथेही शिवसैनिकांच्या जिवावर निवडून आलेल्या कम्युनिष्ट सदस्या उज्वला ठुबे यांना लंके यांना पुढे करण्याचे पाप औटी यांनी केले. (Parner Corporators writes to CM Uddhav Thackeray asks Expulsion of Ex MLA Vijay Auti from Shivsena)

औटी यांच्या 61 व्या वाढदिवसासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमापासून औटी यांनी निलेश लंके यांना जाणीपूर्वक दूर ठेवले. या कार्यक्रमात नीलेश लंके यांना बसण्यासाठी व्यवस्थाही करण्यात आली नाही. कार्यक्रम संपल्यावर उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यातील गाडीवर औटी यांच्याच कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. ती दगडफेक नीलेश लंके समर्थकांनी केल्याचे भासवून लंके यांचे तालुकाप्रमुख पद काढून घेण्यात आले. पुढे त्यांची पक्षातून हकालपट्टीही करण्यात आली.

औटी यांच्या प्रत्येक वाढदिवसासाठी नगरसेवक तसेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून सक्तीने वर्गणी गोळा करण्यात येत असे. काही कारणास्तव एकदा वाढदिवसानिमित्त आयोजित उपक्रम रद्द करण्यात आल्यानंतरही संकलीत पैशांतून स्वतःसाठी सोन्याचे कडे मागणारे हे राज्यातील एकमेव लोकप्रतिनिधी असावेत.

गेल्या तिन्ही विधानसभा निवडणुकीत नीलेश लंके यांच्या संघटनामुळे औटी यांच्या रुपाने शिवसेनेचा आमदार विधानसभेत गेला. औटी यांनी षडयंत्र करुन लंके यांना पक्षातून बाहेर काढले. पुढे विधानसभा निवडणुकीत नीलेश लंके यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली. निष्ठावान शिवसैनिकांनी लंके यांनाच पाठबळ दिले. त्यामुळे तब्बल 60 हजार मतांच्या फरकाने शिवसेनेच्या उमेदवाराला पराभवास सामोरे जावे लागले.

औटी हे पक्षापेक्षा स्वतःचाच स्वार्थ पाहत असल्यामुळे आम्ही नगरसेवक त्यांच्या कार्यपद्धतीला कंटाळले आहोत. आमचा पक्षावर काडीचाही राग नाही. औटी यांच्या हातून पक्षाची सूत्रे काढून घेऊन एखादया खंदया शिवसैनिकांच्या हाती सूत्रे दिल्यास शिवसेनेस तालुक्यात पुन्हा सुवर्ण दिन येतील अशी अम्हाला आशा आहे. शिवसेनेच्या जिवावर 15 वर्षे आमदारकी, विधानसभेचे उपाध्यक्षपद देऊनही औटी यांनी नेहमीच पक्षविरोधी भूमिका घेतलेली आहे. विधानसभा निवडणुकीत तब्बल साठ हजार मतांनी पराभव झाल्याने औटी हे सक्रिय राजकारणात राहण्याची सुताराम शक्यता नाही.

आता शिवसेनेच्या संघटनेचा उपयोग स्वतःच्या नातेवाईकांसाठी करण्यासाठी, अधिकाऱ्याना दमबाजी करण्यासाठी करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करुन निष्ठावान शिवसैनिकाकडे पक्षाची धुरा सोपवावी अन्यथा तालुक्यात एकही शिवसैनिक शिल्लक राहणार नाही.”

आपले विश्‍वासू,

उमाताई नरहरी बोरुडे, तालुकाध्यक्ष, महिला आघाडी, पारनेर तालुका
डॉ. मुदस्सिर रफीक सय्यद, नगरसेवक
नंदकुमार गणपतराव देशमुख, नगरसेवक
किसन भिमाजी गंधाडे, नगरसेवक
वैशाली आनंदा औटी, नगरसेवक
नंदा साहेबराव देशमाने, नगरसेवक

संबंधित बातम्या 

शिवबंधन-घड्याळ-शिवबंधन, चार दिवसात पारनेरच्या पाच नगरसेवकांबाबत काय-काय घडले?

निलेश लंकेंनी राष्ट्रवादीत आणलं, मिलिंद नार्वेकरांनी ‘करुन दाखवलं’, पारनेरच्या नगरसेवकांची घरवापसी

(Parner Corporators writes to CM Uddhav Thackeray asks Expulsion of Ex MLA Vijay Auti from Shivsena)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *